जागर नवरात्रोत्सव
जागर नवरात्रोत्सव
॥सर्व मंगल मांगल्ये
ज्ञान सर्वार्थ साधिके
क्रांतीज्योती सावित्री
ज्योतिर्मयी नमोस्तुते॥
नऊ दिवस उत्सव
नऊ रात्रींच्या नौरात्री
नित आमुचा उत्सव
नित्य पुजितो सावित्री ॥धृ॥
मुर्ती स्थापिली हृदयी
जोति आणखी सावित्री
विश्व बनवू साक्षर
आम्ही शिक्षणाचे यात्री॥१॥
क्षण क्षण शिक्षणाचा
शिका म्हणे ग सावित्री
आम्हा साठी शिक्षणाची
गेली राखून गंगोत्री॥२॥
आजवरी अखंडीत
नित वाहते गंगोत्री
अस्त हिला न ठाऊक
सदा वाहण्याची खात्री॥३॥
हिला नको कोणत्याही
नऊ दिन नऊ रात्री
हिचा जागर जागर
पहा चाले अहोरात्री॥४॥
–निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३