होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
आज होळीचा सण!पौर्णिमा!…मनातले वाईट विचार जाळण्याचा दिवस!अशा दिवसाला मागचे मागे ठेवून पुढे वाटचाल करण्याचा दिवस!राग,लोभ,मत्सर सगळं सगळं सोडून देण्याचा दिवस!
आनंद देत!आनंद घेत!दुःखास विसरण्याचा दिवस!आपण जगत राहू!इतरांनाही जगण्याची उमेद देऊ!हात देऊ!हसत राहू!इतरांना हसवू!
सगळं सगळं इथंच ठेवून जायचं आहे!कोणाशी कायमचा अबोला ठेवून दुःखी राहण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्याचा मोठेपणा दाखवू!अहंकारांने जग जिंकता येत,माणसं जिंकता येत नाहीत!आज होळीच्या दिवशी मनातल्या अहंकाराला जाळून टाकू!
माणसातील माणसाला ओळखत राहू!त्यांचे हात हातात घेऊ!आपले हात त्यांच्या हाती देऊ!निर्मळ मनाच्या तलावात स्वच्छ पाणी वाहू देऊ!
जगणं सुंदर करू!आनंदी करू!आज आम्ही देखील पुण्याजवळील बापदेव येथील कानिफनाथ गडावर पहाटे पाच वाजता जाऊन आलो!दम घेत!घाम गाळत उंचावर जातांना इतरांना हात देत घेत वरती पोहचलो!खरचं प्रसन्न वाटतं!दम लागल्यावर आपली शरीरिक कुवत कळत असते!आनंद होत असतो!
अशा प्रसन्न क्षणी साक्षात देवाचं दर्शन होत असतं!देव आपल्या कुडीतच आहे!शोधत शोधत त्याच्याशी बोलू “देवा आज होळी निमित्त आमचा राग तूझ्या पायाशी ठेवतो!तू आरोग्यदायी जीवन प्रदान कर!आम्हास सुखी ठेव!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
…नानाभाऊ माळी
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४ मार्च २०२४