डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आधुनिक सनातन हिंदू धर्म
आधुनिक सनातन हिंदू धर्माला शुद्ध आणि सक्षम करणाऱ्या भीम स्मृतिचे जनक भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर!
दि 14 एप्रिल 2024 ही भारत रत्न डॉ बाबासाहेब यांचीं 133 वी जयंती आहे. त्या जयंती निमित्त बाबासाहेबाना कोटी कोटी प्रणाम!महू लष्करी छावणी मध्यप्रदेश इथे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या रामजीबाबा आणि भीमाई मातेच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी जन्माला आलेले अनमोल रत्न म्हणजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर. आज देशोदेशी त्यांची जयंत मोठ्या धूम धडक्यात साजरी केली जातं आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वस्तरावरील प्रकांड पंडित होते. त्यांनी शिक्षणात मिळविलेल्या पदव्या म्हणजे अचंबित करणारे विश्व विक्रम आहेत. बाबासाहेब परदेशातून अर्थ शास्त्रात डॉक्टरेट(पीएचडी) मिळवीणारे पहिले भरतीय आहेत. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएचडी व डीएससी) पदव्या मिळवीणारे पहिले दक्षिण आशियायी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठ, कोलंबीया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ ईकोनॉमिक्स आणि ग्रेज इन या विश्वातील नामांकित संस्थातून शिक्षण घेतले आहे.
बाबासाहेबानी या दरम्यान, बीए, दोन वेळा एम ए, पीएचडी, एमएससी, बार ऍट लॉ आणि डीएससी एवढ्या पदव्या मिळविल्या आहेत. या सर्वं पदव्या त्यांनी तिशीच्या आत बाहेर असताना मिळविल्या आहेत. 1950 च्या दरम्यान त्यांना एलएल डी आणि डी लिट यां दोन सन्माननियम पदव्या मिळाल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील सर्वात प्रतिभाशाली वं सर्वात उच्चं विद्याविभुषीत विद्वान होते.
बाबासाहेब यांना आपण प्रकांड पंडीत, घटनेचे शिल्पकार, कायदे पंडित, अर्थतज्ज्ञ, धुरंदर राजकारणी, कायदे मंत्री, समाज सुधारक, एवढ्याच बाजू पाहतो, ऐकतो. पण या व्यतिरिक्त बाबासाहेब इतिहास संशोधक, मानव वंश संशोधक वं आध्यात्मिक क्षेत्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी जगातील सर्वं प्रमुख धर्माचा अभ्यास केला होता. हिंदू धर्मातील सर्वं वेद उपनीषद यांचा अभ्यास त्यांनी केला होता.
बाबासाहेबांनी जेंव्हा धर्मांतराचीं घोषणा केली तेंव्हा अनेक देशी विदेशी विविध धर्म गुरूंनी बाबासाहेबानी त्यांच्या धर्मात यावे म्हणून त्यांनी बाबासाहेबाना विनंती केली. त्याचं सोबत त्यांच्या समोर धनाच्या प्रचंड राशी उभ्या केल्या. याचा मोह त्यांना झाला नाही. या सर्वं धार्मिक अध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी बौद्ध धर्माची निवड करून आपल्या लाखो अनुयायासह बौद्ध धम्माचीं दिक्षा घेतली.
त्यातूनच स्वतःच्या जन्मभूमितून हद्दपार झालेल्या बौद्ध धम्माच पुनर्जीवन केले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात तीन गुरु मानले आहेत. बुद्ध, कबीर आणि फुले. यातील एकाही गुरु सोबत त्यांची समोरासमोर भेट झाली नाही. पण त्यांच्या विचारांचा वारसा स्वीकारत त्यांनी या तिघांना गुरुस्थानी मानले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचीं अध्यात्मिक क्षेत्रातील दुसरी अत्यंत महत्वाचीं कामागिरी म्हणजे सनातन हिंदू धर्माचे शुद्धीकरण होय.सनातन हिंदू धर्म जगाती सर्वात जुना आणि उदारमतवादी धर्म होता. पण काळाच्या ओघात त्यात अनेक अमानुष प्रथा जुळत गेल्या आणि त्यातून धर्म अमानुष आणि कलंकित होतं गेला.
सर्वात वाईट प्रथा म्हणजे माणसा माणसातील उच्चं निचता, त्या अनुषंगाने येणारी शिवाशिव. बहू पत्नीत्व, स्त्रियाना शिक्षण घेण्यास बंदी. त्यांना पिढीजात मिळणारी संपत्ती वाटा नसणे ज्यात वडील आणि पती यांची मिळकत यातून बेदखल केले होते. तों अधिकार बाबासाहेब यांनी स्त्रियाना मिळवून दिला. द्विभार्या प्रतिबंधक कायदा केला. त्यांना शिक्षणा सोबत ईतर सर्वं अधिकार पुरुषांच्या बरोबरीनें दिले. विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
शूद्रना संपत्ती मिळविण्याचा अधिकार होता पण शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला. अस्पृश्य बहिष्कृत वर्गाला तर भयंकर वाईट वागणूक होती. त्यांना विहिरी, तळी, नदी नाल्यांना शिवू देत नव्हते. त्यांचा स्पर्श अपवित्र समजत होते. त्यांना शिक्षण, संपत्ती मिळविण्या वर बंदी होती. त्यांच्या वरील या सर्वं बंदी उठविल्या.
या सर्वं सुधारणामुळे हिंदू समाजातील सर्वं स्त्री पुरुष समान पातळीवर आले. जातीजातीतील विभक्त पणाची भावना नष्ट होऊन एकोपा निर्माण झाला. या सर्वं सुधारणा आणि शुद्धते मुळे आजचा मानवतावादी सनातन धर्म आपण स्वाभिमानाने जगत आहोत. मनुस्मृतीचीं अभद्र चौकट उखडून त्यावर मानवतावादी भीमस्मृतीचीं चौकट उभारली गेले आहे. आणि त्याचं पायावर आता हिंदू धर्माचा विशाल डोलारा उभा आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडं बील नावाने आणलेल्या या सर्वं सुधारणा आपल्याला सहजासहजी मिळ्याल्या नाहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं सर्वं शिक्षण आणि बुद्धिमत्ता पणाला लावून हे हिंदू कोडं बील आणि भारतीय संविधान बनविले आहे. आज ज्याला आपण जगातील सर्वोच्च मानवी मूल्य जोपसणारे हिंदू कोडं बील म्हणून ज्याचा उदो उदो करतो. ते बील कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबानी जेंव्हा संसदेत मांडल तेंव्हा ते संसदेने बहूमताने फेटाललं. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांनी सपसेल नाकारलं. तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यातील मानवता पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला कायदे मंडळातील कोणीही सदस्य तेंव्हा तयार नव्हते.
मग बाबासाहेबानी हिंदू कोडं बिलासाठी सर्वोच्च त्याग करायचं ठरविले. त्यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्या मंत्र्याला राजिनामा का दिला याचा खुलासा करण्यासाठी संसदेत भाषण करण्याचा अधिकार असतो. ते भाषण करण्याचा अधिकार तात्कालीन पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांनी नाकारला हां अन्याय सुद्धा बाबासाहेबानी सहन केला.
कालांतराने हेच हिंदू कोडं बील, त्याच महत्व सर्वांच्या डोक्यात शिरू लागले. आणि टप्या टप्यानें नंतर त्याचा घटनेत समावेश झाला. पण त्या आधी एका कायदे पंडित कायदेमंत्र्याला देश मुकला हे नुकसान भरून आले नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. म्हणून त्यांनी नेहरुनी सांगितलेले काश्मीर बाबतचे 370 वं 35 अ कलमाचा मसुदा तयार करण्यास नकार दिला. त्यांना हे देशविघातक कलम मान्यच नव्हतं. बाबासाहेबांनी नकार दिल्यावर मग नेहरुनी कलम 370 वं 35 अ चा मसुदा दिवान बहादूर सर नरसीम्हा गोपालस्वामी अयंगर यांच्या कडून तयार करून घेतला. आज हे कलम रद्द झाले आहे. बाबासाहेब यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, “मी आधी भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयचं आहे.”
सुरवातीला संसद आणि मंत्री मंडळाने फेटाळलेल हिंदुकोड बील जसच्या तस संसदने स्वीकार आणि काश्मीरच 370 कलम रद्द केलं ही उदाहरणे बाबासाहेबांची दूर दृष्टी आणि प्रचंड बुद्धिमत्ता सिद्ध करतात.
बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म सुद्धा अभ्यासं पूर्वक व देशाची एकात्मिका लक्षात घेऊन स्वीकारले आहे. एक तर हां धर्म बुद्धिप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी तर आहेच, पण तों भारतीय धर्म आहे हे महत्वाचे आहे. बौद्ध आणि हिंदू यात उपासनेचा फरक तक्कीच आहे. पण भाषा, वेशभूषा, नावं धारण करणे, संस्कृती आणि खाद्य संस्कृती ही एकच असल्यामुळे दोन धर्मात खूप मोठी दरी निर्माण होणार नाही.
बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्यासाठी विजया दशमी हां दिवस सुद्धा विचार पूर्वक निवडला आहे. विजया दशमी ही बौद्ध धर्मात अशोक दशमी म्हणून ओळखली जाते. याच दिवशी सम्राट अशोकाने वैदिक धर्म सोडून बौद्ध धम्मात प्रवेश केला होता. बाबासाहेबांनी दसरा निवडण्याचे हे एक कारण आहे आणि दुसरे कारण या दिवशी भारतीय संस्कृतीत सिमोलंघन करतात हे आहे. त्या मुहूर्तावर बाबासाहेबानी हिंदू धर्माची सीमा ओलांडून बौद्ध धम्म प्रदेशात प्रवेश केला हे कारण आहे.
या साम्यतेचा फायदा असा होतो कीं, बौद्ध आणि हिंदू हे समूह वेगळे वेगळे दिसत नाहीत. याचा प्रत्येय आपण नेहमीच घेत असतो. बुध्दाच्या त्रिशरणात कोणीही हिंदू सहज सहभागी होत हात जोडून उभा राहतो, तर गणपतीच्या आरतीत कोणीही बुद्ध बांधव सहज टाळ्या वाजवतो.
आज त्या महामानवाची जयंती आहे. त्यांच्या चरणी पुन्हा कोटी कोटी प्रणाम!
बापू हटकर
Pingback: dr babasaheb ambedkar यांच्या जयंतीनिमित्त काव्य स्पर्धा - मराठी 1