२०२४ मध्ये विश्वात घडलेल्या घटनांचा लेखा जोखा
बेधडक रोखठोक जनसामान्याचा प्रश्न
नव्या वर्षाचे स्वागत करू या. नव्या आशा, आकांशा ,ध्येय ,स्वप्ने घेऊन तयारीला लागू या! वर्ष २०२४ मध्ये विश्वात घडलेल्या घटनांचा लेखा जोखा!
वर्ष २०२४ मध्ये विश्वातील भारत
देशात आश्चर्यकारक घटना घडली! जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून जीचा गवगवा होतो त्या भारत देशात मा. मोदींनी भारताचे तिसऱ्यांदा पंत प्रधान म्हणून निवडून आले. ही विश्वातील संस्मरणीय घटना घडली आहे! कारण इतर अनेक देशात
बंडखोरी, लष्कराचा उठाव, जनतेचा उद्रेक यामुळे सत्तांतर झाले आहे. श्रीलंका, पाकिस्तान,
म्यानमार, सीरिया, आफ्रिकन राष्ट्रे यात मोठ्या प्रमाणात सैनिक
व जनतेचा सत्तेविरुद्ध उठाव होऊन क्रांती झाली.बांगला देशात सर्वात वाईट ,क्रूर, रानटी ,रक्त रंजित क्रांती झाली.
ही क्रांती नसून धर्मांध रक्त रंजित क्रांती चालू आहे असे अनेक माध्यमातून समजते. ऑगस्ट
२४ पासून सुरू असलेली क्रांती
आज सुद्धा चालू आहे. ही क्रांती
नसून, सत्तांतर नसून अल्पसंख्याक समाजाचा नरसंहार करण्यासाठीं केलेला
सत्ता बदल आहे!बांगला देशात झालेला सत्ता बदल धार्मिक बदल आहे! हिंदू, ख्रिश्चन या समाजावर रानटी अत्याचार आजही सुरू असून
स्त्रियांची अब्रू लुटली जात आहे.
त्यांची घरे दारे जाळली जात आहे. तरुण मुलींना पळवून नेले
जात आहे. मंदिरांची मोडतोड सुरू असून मुर्तीची विटंबना होत
आहे. तेथील सत्ताधाऱ्यांचा त्यास
पाठिंबा आहे .
भारतात पुन्हा तिसऱ्यांदा मोदी शासन आरूढ झाले हे जगाला खूप आश्चर्य वाटले. कारण भारतातील तीस विरोधी पक्ष एकत्र येऊन सुद्धा जनतेने मोदींना पुन्हा सिंहासनावर विराजमान केले ही मोठी
चमत्कारिक घटना मानली जात
आहे! त्यानंतर अमेरिका मध्ये
अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर २४ मध्ये होऊन त्यात ट्रम्प
विजयी झाले. ट्रम्प यांची निवड
होणे सुद्धा विश्वाला बसलेला
आश्चर्याचा धक्काच होय.कारण जनमत त्यांच्या विरुद्ध होते. ट्रम्प रागीट, उद्धट व संतापी आहे. काय बोलून जातील हे सांगता येत नाही.
ते निवडून आले याचे
जगाला आश्चर्य वाटले. निवडणूक प्रचारात त्यांच्यावर
गोळीबार झाला ,त्यात ते वाचले
त्या सहानुभुतीचा राजकीय फायदा त्यांना मिळाला.
रशिया व युक्रेन या राष्ट्रामध्ये अजून युद्ध सुरू आहे. रशियाने
युक्रेन ची पूर्ण राखरांगोळी केली
आहे. युद्धाची व्याप्ती वाढत असून तिसरे महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच हमास ने इस्राएल वर
अचानक हल्ला करून अरब विरुद्ध इस्राएल मध्ये घमासान युद्ध सुरू आहे. हे युद्ध म्हणजे
चीन, रशिया ,इराण विरुद्ध पाश्चिमात्य राष्ट्रे असा प्रकार आहे. म्हणून तिसऱ्या जागतिक
महायुद्धाची ठिणगी पडू शकते.आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून विचार केला काल म्हणजे २६ डिसेंबर रोजी भारताचे माजी पंत प्रधान डॉक्टर मनमोहनसिंह यांचे
निधन झाले. भारताने महान अर्थशास्त्रज्ञ आपण गमाविला आहे. त्यांच्या ज्ञानाचा देशाला खूप उपयोग झाला आहे.त्यांनी देश जेव्हा आर्थिक आणीबाणी मध्ये होता त्यावेळेस
सुज्ञ विचारांनी त्यांनी देशात नवीन आर्थिक धोरणे अंमलात
आणली. त्याचा देशास फायदा
झाला ,देश गंभीर समस्येतून बाहेर निघाला. त्यांच्या निधनाने
देश सुन्न झाला.२९ जून मध्ये भारताने ट्वेंटी ट्वेंटी मध्ये अजिंक्यपद पटकावले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले.
टेस्ट मॅच मध्ये भारताचे खच्चीकरण झालेले दिसते. आता सुद्धा ऑस्ट्रेलिया बरोबर
खेळ सुरू असून ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व सिद्ध होत आहे. खेळ
म्हटला की छाप काटा चालू असतो. जम्मू काश्मीर मध्ये
दहा वर्षांनी राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होऊन
त्यात नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस ने बहुमत मिळवून सत्ता हस्तगत केली आहे.
या वर्षी लोकसभेच्या निकालानंतर देशात देशद्रोही कृत्ये वाढली आहेत. काही
धार्मिक अतिरेक्यांनी गैर मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमावर दगडफेक करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुस्लिम समाजाच्या काही अतिरेक्यांनी
रेल्वे अपघात घडवून आणले.
देशाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत
घातक प्रवृत्ती आहे. देशाची एकता भंग होऊ शकते.
हरियाणा, झारखंड व महाराष्ट्रात
पंचवार्षिक विधानसभा निवडणुका होऊन हरियाणा व महाराष्ट्रात NDA गठ बंधन ने
सत्ता हस्तगत केली आहे. झारखंड मध्ये इंडी आघाडीची
सत्ता अबाधित राहिली आहे.माननीय पंत प्रधान मोदींनी विश्वात शांतता निर्माण व्हावी म्हणून रशिया व युक्रेन मध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते स्वतः युक्रेन ला
गेले व राष्ट्राध्यक्ष श्री. झेलेस्की यांची भेट घेतली .तेथून मोदींनी
मोठी जबाबदारी घेऊन रेल्वेने दहा तास प्रवास केला. पुतीन
यांच्याशी बातचीत केली.अशा प्रकारे मोदींनी विश्वात युद्ध बंदीसाठी प्रयत्न केले .२०२४ मधील देशातील सर्वात गंभीर व वाईट घटना असेल ती बंगाल मध्ये स्त्री डॉक्टर वर झालेला बलात्कार व तिची हत्या!
या घटनेमुळे सारा देश हळहळला. देशात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. नुकतीच
बातमी वाचण्यात आली की
जर्मनी मध्ये सरकार बरखास्त
झाले आहे. तसेच कॅनडा शासन
सुद्धा डळमळीत झाले आहे.
२०२४ म्हणजे विश्वातील अनेक
देशात झालेले सत्तांतर व क्रांती होय! भारतात परकीय नागरिक
विरुद्ध शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. कारण घुसखोरांनी भारतात बेकायदेशीर
प्रवेश केला आहे.आता नुकतीच टीव्ही वर बातमी पाहण्यात आली की अफगाणिस्तान ने पाकिस्तानी सैनिकांवर अग्निबाण ने हल्ला करून त्यांचे सैनिक ठार केलें आहे. त्या आधी पाक ने अफगाणिस्तानवर रॉकेट चा
मारा केला होता.
ह्या वर्षी अनेक देशात भरपूर पाऊस झाला आहे. भारतात सुद्धा भरपूर पाऊस पडला आहे.
पण भारतातील दिल्ली शहर सर्वात वाईट वातावरणाने घेरले गेले आहे. नागरिकांना तेथे राहणे
असहाय होत आहे. श्वसनाचे विकार जडत आहे. ज्या उद्योगपतीने भारत देशाला औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर सर्वोच्च स्थानी नेले व देशाचे नाव
आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावले त्या रतन टाटांचे दुःखद निधनामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले ! सारा देश त्यांच्या निधनामुळे हळहळला! ते केवळ महान उद्योगपती नव्हते तर देशातील महान दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती. उद्योग क्षेत्रातील
कामगारांच्या कल्याणासाठी
अनेक योजना अंमलात आणून
एक कामगार मित्र म्हणून त्यांचा
नावलौकिक होता. कामगारांना त्यांनी कधीही दुखविले नाही. म्हणून देशातील सर्व थरातील समाज त्यांच्या निधनाने दुखी झाला!असा उद्योगपती पुन्हा होणे शक्य नाही इतके थोर त्यांचे व्यक्तिमत्त्व होते ही एक मोठी घटना झाली आहे व नुकसान ही झाले आहे ते कधीच भरुन न निघणारे आहे.
एक चांगलीं बातमी रशियाने जगाला दिली आहे की २०२५ मध्ये कॅन्सर ची लस जागतिक बाजारात उपलब्ध होणार आहे.
कॅन्सर पेशंटांना मोठा दिलासा मिळाला आहे. असाध्य आजारावर उपाय मिळाल्याने
जगाला दिलासा मिळाला आहे.
२०२४ चे वर्ष विश्वाला कभी खुशी, कभी ग़म या नुसार लाभले
आहे.
हेमंत जगदाळे खान्देश सम्राट संपादक धुळे