अशीच असतें आई (Aai)

अशीच असतें आई
अशीच असतें आई

अशीच असतें आई

कुणा दंडावर चित्र पाहिले
पाठीवरती गोंधनं पाहिले
रंगविलेली चित्र तुझी गं
हृदयात आई ठेवून पाहिले!

डोळ्यात कशी दिसत असतें आई
कधी तर बघूनि हसत असतें आई
जगत जननी आई कधी दूर नसते?
हृदयात अमुच्या हळूच येऊन बसते!

संसारवेडी आई असतें
वाळवंटीही हसत दिसते
वर्ष मोजीत आईचं राबते
संसारी खोल फसत असतें!

आयुष्य एकदाच मिळत असतं!कस जगावं ठरवायचं असतं!जन्म  साक्षात दान असतो!उपकाराच पान असतं!जन्मासोबत जोडलं असतं!आई नावाचीहीं खान असतें!शांत, खोल, अद्भुत असतें!ईश्वरानें जोडली असते!ईश्वराजागी आई असतें!आई नातं अतूट असतं!ईश्वराच्याही पटीत असतं!शांत,खोल सागर असतें!आई स्वतःची कधीच नसते!आयुष्य आईचं अर्पण असतं!जन्मोजन्मी नाव असतं!जगात फक्त आईचं असतें!तिच्यासवे कोणीही नसतं!आई सारखी आईचं असते!सहन शक्तीची पूजा असतें!अशीच आमुची आई असतें!

डोळ्यात आई उभी दिसतें!कोपऱ्यात बसुनी अश्रू गाळते!कधी अश्रूत आई अंधुक दिसते!जगात आई विकत नसते!विकणाऱ्याकडे अक्कल नसते?आईचा तराजू मिळत नसतो!मोल आईचं होतं असतं? घेणाराही हसत असतो!डोळ्यालाही दिसत नसतो!साक्षात्कारी ईश्वर असतो!आईचाचं तो पुत्र असतो!आई आमुची अशीच असतें!आई आमुची अशीच असतें!

फुफुस माझं,आईने दिलं!हृदय मज आईनें दिलें!कान ऐकण्या आईचं देते!चांगलं ते देत जाते!नकोसं ते गाळूनी घेते!श्वासात आई फिरत असतें!संस्कार चांगले भरत असतें!आई माझी दुध होते!जगण्यासाठी कामी येते!शुद्ध रक्त आईचं असतें!वरूनी भरण्या कामी नसते!आई अमुच्या हृदयी बसतें!कधीतरी तू दूर जाते!अश्रूत भिजते तेव्हा नाते!रागावलीस तू,का गं माते?अश्रूत भिजवूनी तूच वाहते?आमुची आई अशीच असतें!आमुची आई अशीच असतें!

कधी माडीवर दिसते आई
कुणा बंगल्यावर हसतें आई
सोसायटी गेटवर असतें आई
भिंतीत कोरलेली असतें आई!

मुलांच्या पोटात बसते आई
वाट्यात भेटत असतें आई
काटे उचलत असतें आई
पाठ वाकलेली दिसते आई!

सुरकुतलेली दिसते आई
भांडी घासत बसतें आई
दुःख झेलीत असतें आई
सहन करीत असतें आई!

अथक राबत असतें आई
सुरकुतलेली दिसते आई
    देवभोळी असतें आई
शुद्ध तुपाचे संस्कार आई!

तुझ्या कटेवर बसलो होतो आई!बालपणी खेळणे होती आई!हट्ट पुरवणारी कनवाळू आई!रात्रंदिन जागत होती आई!मी ऊबदार कुशीत बाळ होतो आई!माझ्या जगण्याची आसं होते आई!तरीही मी खुद्दार झालो आई!तुझ्याशी गद्दार झालो आई!व्यथांच्या बाजारी सोडले आई!रक्त-दुधाचे उपकार जाणले होते?बालपणी संस्कार मानले होते!परतफेड मागत नसते आई!हळवी ममता जागत असतें!देवापाशी मुलांचं आयुष्य मागत असतें!आई दूरदर्शी वागत असतें!अशीच असतें आमुची आई!

आई घरा बाहेर राबते!देवापाशी आयुष्य मागते!रात्रंदिन आई जागते!पदरा आड मुलाला जपते!कधी अर्ध चंद्र दाखवते!आयुष्यभर  उन्हा तान्हात खपते!दुःखातही आई खपते!कधी डोळ्यातूनी वाहते!कधी घामात आई न्हाते!कधी मुलांना सुखी पहाते!मिटते भूक माझी,तू उपाशी असतें तेव्हा!डोळ्यात अश्रू येती,तुझी वणवण होते तेव्हा!संसारात सुख पाही,पौर्णिमेचां चंद्र हसतो तेव्हा!संत मुखे अभंग गोड, आई हसते तेव्हा!अशीच आमुची आई!उपकार दानी आई!

जन्मीजन्मी नातं पवित्र जपत असतें आई!सर्वस्वाचं दान देत जगत असतें आई!रक्ताच्या थेंबाचं नातं जपत असतें आई!जगातलं हे श्रेष्ठ नातं अजुनी कोणतं नाही!आई बदलता येते कुणाला? सारखा जगात मूर्ख नाही!बदलूनि जगतो मुलगा नाते त्याची जिंदगी हराम होते!नऊ महिन्याच्या  गोळयास अर्पण,आईची हयाती निघूनी जाते!गर्भाशी नाळ जोडते घट्ट,आई ईश्वराहुन मोठी होते!आई नावाचं दैवत आजही घराघरात राहते!आई आमुची अशीच असतें!

मुलगा कितीही मोठा होऊद्या!मान, सन्मान,किर्ती, पैसा अन वयाने कितीही मोठा झाला तरी आईच्या पोटी जन्म घेतल्याचे उपकार अनमोल असतात!पांग फेडण्यास मुलगा हयातीभर राबला तरी तरी ईश्वराची आई कळत नाही!अशीच असतें आई आमुची!

आयुष्य झिजलेली आई
काटे वेचत दिसतें आई
कुणाचे अश्रू पुसते आई
घरात राबत असतें आई!

कुणा पाण्यात दिसते आई
कुणाच्या अश्रूत बसते आई
झिजतं स्वतःस नसते आई
कुणास अडगळ होते आई!

जगात आहेत किती कंस
कोणी कितीही मारु द्या दंश
दूध काढेल पाण्यातूनी हंस
आई ईश्वरचा असतें अंश!



रंग बदलणाऱ्या सरड्यास ही पोटात घेते आई!जहरी-विषारी विषास ही घोटात पिते आई!घराची रें अब्रू वाचविन्या लाटात वाहते आई!संस्काराचे बाळकडू पिऊनी थाटात जगतो आम्ही!शहीदांची जन्म भू तू प्रणाम तुजला आई!
   
नानाभाऊ माळी

हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१४ मार्च २०२४

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *