भीमरावांचा नारा
भीमरावांचा नारा
नारा हा भीमरावांचा जयघोष हा भीमरावांचा
दुमदुम दुमदुम दुमला हो दुमदुम दुमदुम दुमला
ह्या धरतीवर दुमला हो तिन्ही लोकी दुमला !!धृ!!
!! जयभीम !!
आंबेडकर घराण्यात जन्म घेतला
रात्रंदिवस अभ्यास केला
उच्च शिक्षण घेऊन बॅरिस्टर झाला
संविधान लिहून नावलौकिक मिळवला
असा घटनाकार हा जन्मला हो
त्याचा जयघोष हा दुमला !!१!!
बहूजनांसाठी हो लढला
बौद्ध धर्म स्विकारूनी समाजाला प्रवाहात आणला
असा बहूजनांचा उद्धारकर्ता झाला हो
त्याचा जयघोष हा दुमला !! २!!
महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला
राम मंदिर प्रवेशासाठी उभा ठाकला
त्याने जातीभेदाचा नायनाट केला हो
त्याचा जयघोष हा दुमला !! ३!!
भीमराव बहुजनांसाठी झटले म्हणूनी
त्यांच्या जयंतीला जनसागर हा लोटला
असा महामानव हा देवरूप आम्हा लाभला हो
त्याचा जयभीम जयघोष दुमला !! ४!!
!!जयभीम!!
कवी :-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
8208667477.
7588318543.
![dr babasaheb ambedkar](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/inshot_20240414_192622448171188975134583764-1024x575.jpg)