happy eid mubarak
रमजान रोजा आणि ईद-उल-फत्र! happy eid mubarak eid al-fitr
हिंदू धर्मात श्रावण महिना वा नऊ रात्रीला जे महत्व असत, ख्रिस्ती धर्मात नाताळ वं डिसेंबर महिन्याला जे महत्व असत, तसाच हिजरी इस्लामी कॅलेंडर मधील 9 रमजान महिना हां मुसलमान बांधवासाठी तेवढाच महत्वाचा आणि पवित्र आहे.
रमजान महिन्यातचं पैगंबर महंमद साहेब यांची अल्लाह म्हणजे ईश्वराशी पहिली भेट झाली. इस्लामच्या मान्यते नुसार कुराण हां पवित्र ग्रंथ देवाने तयार केलेला धर्मग्रंथ आहे. त्याला ते आस्मानी किताब सुद्धा म्हणतात. हे कुराण देवाने रमजानच्या महिन्यातच महंमद साहेबाना दिले आहे अशी मान्यता आहे.
याच महिन्यात महंमद साहेबानी मक्के वरून मदिने कडे स्थलांतर केले, याला हिजरी म्हणतात. या हिजरी वरून इस्लामिक काल गणना सुरु झाली. त्या काल गणनेंला हिजरी संवत्सर म्हणतात. या वेळी महमंद साहेब यांना जंग-ए-बद्र मध्ये विजय प्राप्त झाला तो महिना ही माहे-ए-रमजान होता. या विजया प्रित्यर्थ महंमद साहेबांच्या अनुयायानी मिठाई वाटून आनंद साजरा केला. तेंव्हा पासून रमजान महिन्यातील रोजाचीं पद्धत सुरु झाली आहे.
ईश्वराची इबादत म्हणजे भक्ती करण्यासाठी, दानधर्मासाठी हां महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. या महिन्यात केलेली भक्ती वा दानधर्म ईतर महिन्या पेक्षा कैक पटीत पुण्य देऊन जाते.
![happy eid mubarak](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/04/pexels-chattrapal-shitij-singh-2989625-1024x668.jpg)
म्हणून मुस्लिम बांधव या महिन्यात अधिक दानधर्म आणि उपवास करतात. दान धर्माला ते जकात खैरात म्हणतात. ही जकात खैरात दिली तर, त्यामुळे ईश्वर भक्तावर अत्यंत प्रसन्न होऊन त्याला स्वर्गात जागा देतो.
रमजानच्या उपवासाला रोजा म्हणतात. सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत कडकडीत उपवास करतात. या वेळेत पाणी तर काय थुंकी सुद्धा गिळत नाहीत. उपवास सुरु होण्या पूर्वी म्हणजे सूर्योदया आधी जे अन्न ग्रहण करतात, त्याला सुहूर म्हणतात तर दिवस भर केलेला उपवास सोडताना सूर्यास्ता नंतर अन्न भक्षण करतात त्याला इफ्तार म्हणतात.
उपवास सोडताना गोड फळ उदा खजूर खाऊन तो सोडतात, त्याला रोजा खोलना म्हणतात. इमाने इतबारे रोजा केला तर अल्लाह सर्वं पापातून माणसाला मुक्त करतो अशी मान्यता आहे.
हिजरी संवत्सरा नुसार रमजानचा 9 महिना संपल्यावर रोजेही संपतात. मग शव्वाल हा 10 महिना सुरु होतो, त्याच्या पहिल्याच दिवशी ईद-उल-फत्र हां सण साजरा करतात. याचा अर्थ गोड ईद असाही आहे. कोणी हिला छोटी ईदही म्हणतात. आमावस्येच्या दुसऱ्या दिवशी चंद्र कोर दिसली तर त्या दिवशी ईद साजरी करतात. चंद्र दिसल्याची अधिकृत घोषणा कोणीतरी धर्म गुंरु करतो. मुल्ला, मुफ्ती वा ईमामं पदावरील धर्मगुरु चंद्र दिसल्यांचीं घोषणा करतो.
ईद-उल-फत्र हां सण म्हणजे रोजाचीं सांगता असतें. हां यक्म शवाल-अल- मुकर्रम्म च्या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे शव्वाल महिन्याचा पहिला दिवस. या दिवशी नवे कपडे घालतात. गोडधोड करून खातात. आप्त, स्वकीय वा मित्र ज्यात ईतर धर्मीय सुद्धा असतात. त्यांनाही गोड शीरकुर्मा खायला देतात. गोरगरिबाना अन्न वस्त्र दान करतात. या रमजानंच्या महिन्यात गोर गरिबाना खैरात जकात वाटप केलं तर अल्लाह आपल्याला सर्वं गुन्हे माफ करतो. अशी इस्लामचीं मान्यता आहे.
सुनो फिर रमजान आया हैं,
खुदाकीं रहेमते और बरकते लेकरं!
तु चाहे जिसे वो तेरे करीब हो!
मक्का और मदिनाकीं जियारत नशीब हो!
असा हां धार्मिक आनंद उत्सव असतो. सर्वं मुस्लिम बांधवाना ईद-उल-फित्र मुबारक!