gudi padwa festival शिवगुढी

gudi padwa festival
शिवगुढी

शिवगुढी gudi padwa festival

शिवगुढी


थोर शिव विचारांची
दारी उभारूया गुढी
नवी अंधश्रद्धा मुक्त
करु सुसंस्कृत पिढी..!

कडू लिंबाच्या पर्णांनी
रोग मिटवू देहांचे
गोड खडी साखरेने
बंध जुळवू स्नेहाचे.. !

वस्त्र भगवे काठीला
चैतन्याने फडकू द्या
नव वर्षाच्या प्रारंभी
सुखपर्व झळकू द्या..!

माळ सुंगधी पुष्पांची
घट्ट गुढीला बांधूया
नाती गुंफू सुवासिक
मने प्रेमाने सांधूया..!

माती ही मऱ्हाटमोळी
भिन्न सण-उत्सवांची
इतिहास निर्मिणारी
भूमी शूर सुपुत्रांची..!

राष्ट्रमाता जिजाऊंनी
शिव-शंभू घडविले
दीन दुःखीचे तयांनी
अश्रू मायेने पुसले..!

मर्द शिव मावळ्यांनी
दिले आम्हाला स्वराज्य
पुण्यमय या मातीत
चला निर्मूया सुराज्य..!

शत्रू नाही मित्र बनू
पुस्तकांचे वाटू वाण
शस्त्र फेकू शास्त्र शिकू
चला रुजवू विज्ञान..!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

सुगंधानुज.
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *