सगेसोयरे
सगेसोयरे
सगेसोयरे प्रेम दावून गेले,
जगाच्या पसाऱ्यात वाहून गेले.
किती मी बुडालो जलाच्या तळाशी,
तळ्याभोवती फक्त पाहून गेले.
मनी खूप होते जगा सांगण्याला,
तरी शब्द ओठात राहून गेले.
जशी सुन्न झाली पहाटेस मैफल,
तिचे लाजणे गीत गावून गेले.
तिच्या आठवांचे फवारे हवेसे,
मनी चंदनीगंध लावून गेले.
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)
![मराठी गझल](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/cropped-img-20240330-wa00237860023748316073198.jpg)
![मराठी अभंग](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/img-20240331-wa00392697631912131301985-704x1024.jpg)