आयुष्य मराठी कविता

मराठी कविता
मराठी कविता

आयुष्य मराठी कविता

आयुष्य :
“”””””””””””””
आज उद्या करता करता,
आयुष्य हे संपून जातं.
मनासारखं जगायचं मग,
आयुष्यात राहून जातं.

आयुष्याचा खडतर रस्ता,
जीवन हे अवघड असतं.
ज्यास्तव खाव्या खस्ता,
त्यांनाच त्याचं मोल नसतं.

केलं कुणासाठी काही,
परतफेड मागू नका.
कढ आपली मनातली,
येता जाता सांगू नका.

आपलं परकं कुणी नसतं,
नाती सारी फसवी असतात.
जणू प्लॅस्टीकची फुलंच ती,
शोभेसाठी बरी असतात.

लेखाजोखा आयुष्याचा,
उगाच रोज मांडू नये.
हाती काहीच उरत नाही,
नशिबाशी भांडू नये.

जन्मा येणं निघून जाणं,
हाती आपल्या काहीच नसतं.
जीवनाचं रहाट गाडगं,
आपल्या विनाही फिरत असतं !

© प्रा.बी.एन.चौधरी.
     देवरुप, धरणगाव.
     (९४२३४९२५९३)

मराठी कविता
मराठी कविता