मराठी कविता परिक्षा
आली परिक्षा परिक्षा
आली परिक्षा परिक्षा
आता अभ्यासाची शिक्षा
त्यात तापल्या उन्हाच्या
भोवताली तप्त दिशा॥धृ॥
उद्या पेपर मराठी
प्रारंभीच मातृभाषा
म्हणूनच वाटे सोपा
पुर्या मार्कांचीच आशा॥१॥
मग इतिहास ना. शा.
सनावळी कळेनाशा
गोल गोल भूगोलाचा
आता आठवू नकाशा ॥२॥
आला गणित भुमिती
बिंदू प्रतलात रेषा
काय किती साठवावे
बालमेंदू इवलासा॥३॥
हिन्दी आवडीची भाषा
गौरवाची राष्ट्रभाषा
काय सांगू विज्ञानाच्या
किती विस्तारल्या दिशा॥४॥
इंग्रजीत चीत् आम्ही
कशी यावी परभाषा
आता हवी घोकंपट्टी
नाही तरीच निराशा॥५॥
आई बाबा ताई दादा
यांनी चालविला घोषा
कर अभ्यास ऐकून
जीव झाला वेडापिसा॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३
![मराठी कविता संग्रह कवीयत्री सौ.मंगला मधुकर रोकडे](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/img-20240309-wa00304899607112340719177-1024x772.jpg)
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/03/inshot_20240315_1036129136147521446502292144.webp)