मराठी व्यक्ती विशेष लेख श्रीमंत आप्पासाहेब विश्राम बिरारी

मराठी व्यक्ती विशेष लेख श्रीमंत आप्पासाहेब विश्राम बिरारी

श्रीमंत आप्पासाहेब विश्राम बिरारी मराठी व्यक्ती विशेष लेख

श्रीमंत ज्ञानयोगी

नानाभाऊ माळी

            हृदयातल्या खोल तळातून श्रीमंत असणारा व्यक्ती श्रीमंती कमवलेला असतो!’स्व’ चीं तपस्या फळाला आली ती दान दिली तर अशा सतपुरुषाला स्वर्गानंद होत असतो!स्वकष्ट दान श्रीमंतीचं सर्वोच्च शिखर असतं!शिखर!श्रीमंतीचा गवगवा न करता झाकल्या मुठी राहावे असे त्यांना वाटतं!कोणी कवच कुंडलं देतो!सर्वस्व देतो!देता देता कफ्फलक झाला तरी त्याच्या श्रीमंतीची तुलना होऊ शकत नाही!

ज्ञानी ज्ञानदान करीत असतात!स्वर्जित ज्ञानश्रीमंती विचार श्रीमंतीकडे नेत असतें!ज्ञानी नावलौकिकाचं आराध्य असतं!आराध्य पूजनीय असतं!आपल्याकडील सर्व काही वाटून तू लक्ष्मी उपासक राहात नाही तर सरस्वती उपासक असतो!ती गुरुपदाकडे वाटचाल असतें!

काल दिनांक २७ मार्चला रात्री आठ वाजता एका गर्भश्रीमंत व्यक्तीकडे गेलो होतो!श्रीमंतीच तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं!विलसत होतं!श्रीमंती दिसत होती,श्रीमंती अनुभवत होतो,तेथे श्रीमंतीचा गर्व नव्हता!मिथ्याभिमान नव्हता!पायाला काळी माती घट्ट चिकटलेली दिसतं होती!मातीवर पाय घट्ट रोवलेले दिसतं होते!बोलण्यात मुलायमता होती!गोडवा होता!आपुलकी होती!आपुलकी हृदयातून होती!कमवलेली श्रीमंती कधीतरी अहंकारातून उफाळून येत असतें!विकारांना जन्म देत असतें!यांची श्रीमंती स्वाभाविक होती!विकारमुक्त होती!विचारांची गर्भ श्रीमंती होती!जी माणसं कमाविलेली श्रीमंती हृदयात ठेवून जमिनीवर चालतात,इतरांचें आदर्श होतात!इतरांसाठी स्वतःचा बोट पुढे करतात!इतर त्यांचा बोट धरून पुढे जाऊ लागतात!त्यांच्या मनात किल्मीश नसतो!अशी माणसं श्रीमंतीकडून देवत्वाकडे वाटचाल करतं असतात!अशा श्रीमंत व्यक्तिमत्वाकडे काल गेलो होतो!

मी रात्री आठ वाजता श्रीमंत महापुरुषाचां बोट धरायला गेलो होतो!त्यांचा बोट घट्ट मुठीत धरला होता!माझ्या मुठीतून अंगात विशिष्ट संवेदना जाणवली होती!मी अंतर्रबाह्य संवेदनेचा दास झालो होतो!अंगात वीज संचारली होती!मी अंतरर्बाह्य बदलत होतो!त्यांच्या विशाल वैभवाच्या परीघानें मी दिपून गेलो होतो!श्रीमंत देवमाणसं समृद्ध ज्ञानगुरु असतात!मी ज्ञानगुरूंच्या पायावर डोकं ठेवायला गेलो होतो!

एक काळ होता त्यांच्या श्रीमंतीत आम्ही न्हाऊन निघत होतो!एक काळ होता त्यांचें रसस्वाद शब्द कविता व्हायचें!प्रतिभा जादूनीं कविता गीतं व्हायचीं!गीतातला स्वर हृदयाला भिडायचा!त्यांच्या कर्णमधुर संगीतानें कान तृप्त व्हायचे!आजही त्यांच्या आवाजात ‘तोचं’ गोडवा आहे,तोचं गोडवा आहे!उत्सहानें भरलेला जोश आहे!ऐकत राहावंसं वाटतं!कान, मन तृप्त होत जातात!आवाज जणू शिव गाभाऱ्यातील ओंकार धून असावी!

पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचं मुखपृष्ठ किती सुंदर होतं!एक मुलगा अन मुलगी पुस्तक उघडून बसलेलें काल दिनांक २७ मार्चला रात्री आठ वाजता एका श्रीमंत व्यक्तीकडे गेलो होतो!श्रीमंतीच तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं!विलसत होतं!श्रीमंती दिसत होती,श्रीमंती अनुभवत होतो,पण श्रीमंतीचा गर्व नव्हता!मिथ्याभिमान नव्हता!पायाला काळी माती घट्ट चिकटलेली दिसली!मातीवर पाय घट्ट रोवलेले दिसतं होते!बोलण्यात मुलायमता होती!कमवलेली श्रीमंती कधीतरी अहंकारातून उफाळून येत असतें!विकारांना जन्म देत असतें!यांची श्रीमंती स्वाभाविक होती!विचारांची गर्भ श्रीमंती होती!जी माणसं कमाविलेली श्रीमंती हृदयात ठेवून जमिनीवर चालतात,इतरांचें आदर्श होतात!इतरांसाठी स्वतःचा बोट पुढे करतात!इतर त्यांचा बोट धरून पुढे जाऊ लागतात!त्यांच्या मनात किल्मीश नसतो!अशी माणसं श्रीमंतीकडून देवत्वाकडे वाटचाल करतं असतात!अशा श्रीमंत व्यक्तिमत्वाकडे काल गेलो होतो!

एक काळ होता त्यांच्या श्रीमंतीत आम्ही न्हाऊन निघत होतो!एक काळ होता त्यांचें रसस्वाद शब्द कविता व्हायचें!प्रतिभेची जादूनीं कविता गीतं व्हायचीं!गीतातला स्वर हृदयाला भिडायचा!त्यांच्या कर्णमधुर संगीतानें कान तृप्त व्हायचे!आजही त्यांच्या आवाजात ‘तोचं’ गोडवा आहे,ऐकत राहावंसं वाटतं!आवाज जणू शिव गाभाऱ्यातील ओंकार धून असावी!

पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचं मुखपृष्ठ किती सुंदर होतं!एक मुलगा अन मुलगी पुस्तक उघडून बसलेलें असायचे!चित्र अभ्यासास प्रेरित करीत असतं!पूर्वीच्या कार्यानुभव वहीचं मुखपृष्ठ किती आखीव रेखीव रेखाटन असायचं!कित्येक महापुरुषांची चित्र आपल्या सिद्धस्त ब्रशानें रंग भरून जीवंत केलेली वाटतात!अनेक देवदेतांची चित्र भक्ती रसात डुंबायला लावतात!श्रद्धेनें नतमस्तक व्हायला लावतात!

सूर,गीत,संगीत,चित्र,एकत्र आले की माणसातील श्रीमंतीची लक्षणं काय असतात हे अंतकरणाला भिडतं!असे सर्व ‘गूण’, अष्टपैलू व्यक्तिमत्वास मग शब्द, सूर, गीत अन संगीताचा जादुई संत म्हणूया!

वरील गूण जी व्यक्ती आपल्या सोबत घेऊन फिरते त्या व्यक्तीचं वय कितीही झालं तरी अंतरमानानें तरुण वाटतात!वय वाढलं तरी भ्याकड वृद्धत्व त्यांच्याजवळ आलेलं नाहीये!अशी माणसं गोळा करीत इतरांना श्रीमंतीचं अमृत वाटणाऱ्या श्रीमंताचं वय किती असावं बरं? फक्त ८३ वर्ष!या वयात देखील त्यांचा गाण्याचा स्वर तरुणांईच्या श्रीमंतीकडे नेत आहे!

अशी श्रीमंती भाग्याने भेटत असतर !मी भाग्यशाली ठरलो होतो!अशा सर्वगुण संपन्न श्रीमतांच्या चरणाववर डोकं ठेवलं!परीसाने मी श्रीमंत झालो होतो!

श्रीमंती चितत्राभ्यासास प्रेरित करीत असते!पूर्वीच्या कार्यानुभव वहीचं मुखपृष्ठ किती आखीव रेखीव रेखाटन असायचं!कित्येक महापुरुषांची चित्र आपल्या सिद्धस्त ब्रशानें रंग भरून जीवंत केलेली वाटतात!अनेक देवदेतांची चित्र भक्ती रसात डुंबायला लावतात!श्रद्धेनें नतमस्तक व्हायला लावतात!

सूर,गीत,संगीत,चित्र,एकत्र आले की माणसातील श्रीमंतीची लक्षणं काय असतात हे अंतकरणाला भिडतं!असे सर्व ‘गूण’ अष्टपैलू व्यक्तिमत्वास मग शब्द, सूर,गीत अन संगीताचा जादुई संत म्हणूया!

अनेक भक्ती गीतं,देवी देवतांच्या आरत्या, जात्यावरील गाणी, ग्रामीण संस्कृतीजीवन विषयी कर्णमधुर गाणी!अक्षयतृतीयेची भावस्पर्शी गाणी प्रत्येक कन्येला माहेरचीं आठवण करून देत असतात!अस्सल मराठी, अस्सल अहिराणी अशी समृद्ध प्रतिभा  घेऊन हिंडणारे,अद्वितीय शब्दधनिक अशा आदरणीय व्यक्तिमत्वाच्या द्वारी गेलो होतो!त्यांच्या वैभवशाली श्रीमंतीला वंदन करण्यासाठी काल रात्री धुळ्यातील १४व्या गल्लीतील घरी गेलो होतो!रस्त्यावरील अंधार बाजूला सारीत तेजस्वी सूर्याच्या प्रकाश वाटेवर गेलो होतो!त्यांच्या प्रकाशाने मी दिपून गेलो होतो!श्रीमंत असूनही त्यांचा लवलेश नसणारे महापुरुष भाग्याने भेटत असतात!मी भाग्यशाली ठरलो होतो!सर्वगुण संपन्न श्रीमतांच्या चरणी डोकं ठेवलं होतं!ज्ञानीयाच्या स्पर्शाने रोमांचित होतं गेलो!धन्य धन्य झालो!

‘श्रीमंत आप्पासाहेब विश्राम बिरारी’… सरांकडे रात्री गेलो होतो!त्यांच्या आशीर्वाद हस्तस्पर्शाने माझी रीती झोळी भरून गेली होती!ती
ज्ञानझोळी काखोटीला बांधून रात्रीचं नऊ वाजता पुण्याकडे प्रयाण केलं होतं!


… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२८ मार्च २०२४
(छत्रपती शिवराय जयंती, संकष्टी चतुर्थी)

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *