मराठी कवीता पाणीपुरीची मौज
पाणीपुरीची मौज
काय भरोसा आयुष्याचा
केव्हाही येईल यम द्वारी
मौजमजा करुन घेते आज
मनसोक्त खाते पाणीपुरी..!
गोंधळ-जावळांना म्हातारा
खाऊनच येतो मटण-तरी
मी माळकरी तो खांडकरी
आज करते माझी हौस पुरी..!
आंबट-गोड पाणीपुरीची
चव लागते भलतीच भारी
खाईल त्यालाच देव देईल
हीच गोष्ट आहे खरीखुरी..!
भरल्या कुटुंबात मुले-सुना
तिथे खाण्याची मला चोरी
इथेचं सफल करते मी आता
पाणीपुरीची ही खाद्यवारी..!
दोन दिसांचे जीवन गड्यांनो
काय उरेल माझ्या माघारी
का ठेवू मी हा जीव उपाशी
तृप्त होवून जाईल देवाघरी..!
सुगंधानुज देवदत्त बोरसे
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.
Pingback: मराठी कविता संग्रह (Marathi Kavita) - मराठी 15/03/2024
Pingback: अशीच असतें आई (Aai) - मराठी 16/03/2024
Pingback: महात्मा ज्योतिबा फुले - मराठी
Pingback: जल जिथे जीव तिथे - मराठी
Pingback: पाणी हेच जीवन कविता - मराठी 1