आखाड गटारी अमावस्या

आखाड गटारी अमावस्या
आखाड गटारी अमावस्या

आखाड गटारी अमावस्या

आखाड गटारी अमावस्या
       (दीप अमावस्या)
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
***********************
… नानाभाऊ माळी

आज मी रस्त्याने जात होतो!माणसांची गर्दी पाहात होतो!त्यांच्या हातात पिशव्या होत्या!सर्वचं आपल्या नादात,धावपळीत होते!त्यांच्या हातात जातांना रिकामी पिशवी होती!येतांना काहीतरी भरून आणलेलं असायचं!मला प्रश्न पडला होता!आपल्या घरचे एकही सदस्य पिशवी घेऊन गेला गेलें नाही बरं? मी माझ्या सौभाग्यवतीनां सहज विचारलं,’का ग,आज आहें तरी काय?बरेचजन रिकामी पिशवी घेऊन जात आहेत!पिशवीत भरून काहीतरी घेऊन येत आहेत!तुम्ही का गेलें नाही?’ माझ्याकडे पाहात पटदिशी उत्तरली देखील,’अगं बाई..तुम्हाला निरीक्षण शक्तीचं नाही मुळी!अहो तुम्हाला सर्वसामान्य ज्ञान तरी आहें का?साधं अवलोकन करता येतं नाही? इकडे तिकडे गड-किल्ले,निसर्ग रंगवत बसता फक्त!’🌹

लग्नानंतर काही वर्षं मागे मुकी असणारी पत्नी काहीं वर्षांनी माणसाला मुका समजायला लागते!मुखात जीभ नावाचा चटबट्या अवयव बोलका होतो!बाई बोलायला लागली की नवरा मुका व्हायला लागतो!मी बोललो,’बरंय बाई सांग तरी तुझं अवलोकन!’ ती पटदिशी बोलली,’तुम्ही काही खात नाही म्हणजे लोकांनी खाऊ नये का?आज काय आहें हे तरी माहिती आहें का तुम्हाला?हो..मुळी कळणारचं नाही बाई तुम्हाला!आज आषाढी अमावस्या आहें म्हटलं!’ मला राहवलं गेलं नाही!बोललो,’हो आहें नां, आषाढी अमावस्या आहें आज!त्यात काय आहें एवढं?’माझं बोलणं मध्येचं थांबवत बाई कडाडली,’अहो आखाड सुरू आहें म्हटलं!त्यात आज आखाडाचा शेवटचा दिवस आहें!लोकं घरोघरी आखाड साजरा करीत आहेत!कोणी मटण आणतंय, कोणी चिकन आणतोय!कोणी काही…तर कोणी काही!तुम्ही घासफूस खात बसा!’🌹

आखाड गटारी अमावस्या
आखाड गटारी अमावस्या

सौभाग्यवती बोलत होती!मी ऐकत होतो!तीच्या बोलण्यातला अर्थ कळत नव्हता!पण तीच्या अंगुलीनिर्देशाने कळलं होतं!जाणाऱ्या येणाऱ्यांच्या हातातील पिशवीचं खरं कोडं सुटलं होतं!मी विचार करायला लागलो,’म्हणूनच आज भाजी मंडईत शुकशूकाट दिसत होता!गोसावळी, दोडकी, भेंडी, पालक, कोबी स्वस्तात विकली जात होती!’ सर्व गिऱ्हाईक रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात होती!मटणाच्या दुकानांसमोर लोखंडी पिंजरें होते!त्यात कोंबड्या फडफड करुन उडत होत्या!काही दुकानासमोर कापलेलें बोकडं, मेंढी  टांगलेले दिसत होते!नेमकी तिथंच गर्दी दिसत होती!🌹

आज आखाड अमावस्या आहें!दिप अमावस्या आहें!गतहारी अमावस्या आहें!आजपर्यंत जो आहार केला तो श्रावण लागल्यावर करता येणार नाही!पावसाळ्यातील दमट हवामानात जीवजंतूचं प्रमाण जास्त असल्याने खाता येणार नाही!पण आजच्या दिवशी तें सोडायचं देखील नाही!ओळीने उभं राहून बकरं-कोंबडं घरी आणायचं!मनसोक्त खायचं आहें!आज आपला दिवस आहें!थोडं गाढव होऊन लाथाडायचं!पडायचं!उठायचं!लोळायचं!कधी कधी आडवं होऊन कोणीतरी अंगावर थंडगार पाणी फेकेसतोवर पडायचं!आज आखाड अमावस्या आहें नां!!!

नात्यागोत्यातील अनेकांनी एकमेकांना आखाड खायला बोलवलं आहें!मलाही एका मित्राने बोलवलं आहें!नवीनच मैत्री झालेली आहें!मला आखाड खायला बोलवलं आहें!म्हणत होता, ‘नानाभाऊ अरे मित्रा संपूर्ण आषाढ महिना निघून गेला राव!घरात काही चमचमीत खायला मिळालं नाही!रस्सा पोटात गेला नाही!जिभेला चव नाही!जीभ नुसती वळवळतेयं!तूला काल सांगितल्या प्रमाणे आज बेत केला आहें!मस्त हासडून खाऊ राव!’🌹

 मित्र कोल्हापूरचा आहें!तांबडा-पांढरा रस्सा भाकरीत कुस्करून खाणारा आहें!मित्राच्या आमंत्रणाला होकार दिला अन जेवायला जावं लागणार आहें!मित्राने पहिल्यांदाच बोलवलं आहें!जेवायचा आग्रह,शब्दाला मान द्यायचा होता!

 राजाभाऊ दारावरून जातांना थांबला,हातात पिशवी होती!मला बोलला,’नानाभाऊ चांगलं एक-दिड किलो आणतो राव!आमची मंडळी लयी हुशार आहें!रस्सा म्हणजे रस्सा बनवते!खाल्ल्यावर आजार पळून जातो म्हणते!उकळत्या रश्यात बोट्या खालीवर होतांना पाहिलं की तोंडाला पाणी सुटत राव!तें जाऊ दे…..तूं एक तासात तयार होऊन घरी यें!आजचा आखाड गाजवायचा आहें!’ मित्राचं बोलणं ऐकून आमची सौभाग्यवती आम्हा दोघांकडे पाहात होती!एकदा त्याच्याकडे पाहात होती!पुन्हा माझ्याकडे पाहात होती!माझ्या डोळ्याला डोळा भिडवून पाहात होती!वटारलेल्या डोळ्यांच्या भीतीने माझी नजर वळवून दुसऱ्याकडे पाहू लागलो!मित्र हळूच उठला, हिची नजर टाळत,जातांना पिशवी हलवीत बोलला,’नानाभाऊ यें रें वेळेवर!वाट पाहतो!’🌹

 मित्र निघून गेल्यावर सौभाग्यवतीचं रौद्र पाहात होतो!रागात बोलली,’तुम्ही भाऊजींकडे जेवायला जाणारं आहात नाही का!जेवन तरी कुठलं आहें?त्या रस्त्यावर टांगलेल्या बोकडाचं मटण नां!शी बाई,मला तर किळस येतेयं!आता बोलवत देखील नाही!जन्मापासून खात नाही असं म्हणता नां तुम्ही?म्हणे चालले बोट्या कुस्करून  खायला!’ तिच्या हातात पाण्याची कळशी होती!दणकन खाली आपटली अन घरात निघून गेली!मला सौभाग्यवतीच्या रागावर थोडं हसू आलं अन थोडा रागही आला होता!मित्र मटणदुकानावर गेला होता!सौभाग्यवती पाय आपटत घरात निघून गेली होती!मीहळूचकन खिशातून मोबाईल काढला अन आकडे दाबून बोलू लागलो,’हॅलो वहिणीसाहेब नानाभाऊ बोलतोय!राजाभाऊ गेलें पिशवी हलवत!जेवणाविषयी आपलं आधी बोलणं झालंच आहें!तुम्हाला आठवण करुन देतोय फक्त!’ तिकडून होकारार्थी शब्द कानावर पडला,’होय नानाभाऊजी आहें लक्षात!’ मी मोबाईल खिशात ठेवला अन घरात गेलो!बाई रुसवा फुगवा घेऊन बसली होती!🌹

आखाड गटारी अमावस्या
आखाड गटारी अमावस्या

मी मनातल्या मनात हसत होतो!फुगलेला अबोला कठीण होता!सौभाग्यवती स्वयंपाक घरात होती!मी हॉलमध्ये बसलो होतो!हळूहळू तिचं फुंदूफंदुणं रडणं कानावर पडू लागलं!माझे कान तिचं फुंदणं ऐकत होते!कानाच्या योग्य चाळणीतून फुंदणं फिल्टर होत होतं!तेचं माझ्या काळजाला पोहचलं होतं!तिच्या जवळ जाऊन गोडीत बोललो,’रुसूबाई तुझं फुंदणं खरचं गोड वाटतं गं!आज आखाडाचा शेवटचा दिवस!पाऊस फवारणी करतो आहें!त्यात तुझा चेहरा रडका आहें!निसर्ग हसतो आहें!तूं सुंदर दिसते आहें…!’ तेवढ्यात मोबाईलचा आवाज खणखणला!राजाभाऊचाचं आवाज होता,’नानाभाऊ लवकर यें रें!वाट बघतोय!बायको म्हणतेय ताट वाढून तयार आहें!.. अजून काही स्पेशल बेत ठेऊ का?’… त्याच्या बोला सरशी मी फोन कट केला!सौभाग्यवतीला चिडवण्यासाठी सांगीतलं,’तुझं जेवण स्पेशल नाही!माझं आहें!मी निघतो गं!’🌹

 राजाभाऊच्या घरी पोहचलो!तें दोघेही वाट पाहात बसले होते!राजाभाऊ बोलला,’आरे काय राव किती उशीर केलास!!हातपाय धुवून घे अन बस माझ्याजवळ!’ मी हातपाय धुवून जागेवर बसलो!वहिणी ताटं वाढत होत्या!रामभाऊच्या ताटात चमचमीत तर्रीबाज पिवळा रस्सा दिसत होता!मटनाचे तुकडे पिवळ्या रष्यातून डोकं वर काढतं होते!राजाभाऊ एकदम खुश होता!माझं ताट आलं!त्यात आमटी होती!ताटात भजी दिसत होती!बाजरीची भाकरी,भजीची आमटी, पापड, लोंचं अहाहा काय झकास बेत केला होता वहिणींनी!माझ्या ताटातील आमटीभजी पाहून राजाभाऊ चक्रावल्यागत पाहात होता!माझ्याकडे-वहिणीकडे पाहात होता!गोंधळल्यागत पाहात होता!

आखाड गटारी अमावस्या
आखाड गटारी अमावस्या

राजाभाऊ वहिनींकडे पाहात बोलला,’यें बये..हे काय वाढतेय त्याला?भजी केव्हा केली तूं?मटण कोणासाठी आणलंय मग?दे त्याला!तुकडे तुकडे टाक त्याच्या ताटात!हे नानाभाऊ मटणाचे तुकडे चघळून दातांनी भुगा करुन खा!’ मी बोललो,’राजाभाऊ..आरे वहिणीनीं किती छान भजींची आमटी बनवलीय राव!वा,आमटीच्या आस्वादिक सुगंधानें पोट भरल्यागत झालंयं माझं!राजाभाऊ आज आखाडाचां शेवटचा दिवस आहें!गटारीचा आनंद घेणारी मंडळी लोळताहेतं!अर्थच कळला नाही हो लोकांना!गतहारीचा शब्द भ्रष्ट होत गटारी केला आहें!तूं बस राजाभाऊ!मटणाचे तुकडे खा!मी पक्का शाकाहारी आहें!तुझं आमंत्रण माझ्यासाठी अनमोल होतं!’

आम्ही दोघे मित्र एकमेकांच्या शेजारी बसलो होतो!तो मटणाच्या तुकड्यांचा आस्वाद घेत होता!मी आमटीत भजी कुस्करून बाजरीच्या भाकरीसंगे खाऊन आस्वादिक आनंद घेत होतो!मन पवित्र पाहिजे!मन स्वच्छ पाहिजे!गतहारी दीप आमवस्या घरंगळुनी झाली गटारी!शब्द चंचल घोडं असतं!लगाम ओढली की उधळत नसतं!मनास जन्मलगाम लावली असेल तर आपल्या शेजारी कोणी काहीही खात असला तरी मन किंचितही ढळणार नाही!ओढ अतृप्तीचं लक्षण असतं!संतुष्टी आनंदाचं शिखर असतं!दोन्ही मित्र भिन्न ताटात मनसोक्त जेवलो!ते गटारी डोक्यात ठेवून जेवत होता!मी दीप आमावस्या समजून सात्विक जेवत होतो!🌹

जन्माने शाकाहारी असल्याने कुणाच्या ताटातील गंध चव माझ्या ताटाला स्पर्श करून शकणार नव्हते!मला त्या गोष्टींचा गंधचं नाही मुळी!तर चला… उद्यापासून श्रावण सुरू होतोय!गतहारी…गटारी होणार नाही!यांची काळजी घेत गटारीतून गतहारीहोत अनेक दिव्यांची दीपमाळ तेजाळूया! लोळणारे पुन्हा सतमार्गांवर येऊन पाठीमागचं विसरून पुढे जातील! उपास तापास करुन देव्हाऱ्यातील देवाशी एकरूप होतील!शुद्ध भाव श्रद्धेलाअर्पित करतील!आखाडाला विसरून जातील!श्रावणाला पूजतील!मंदिरातील घंटानाद कानी पडत राहिलं!आज आषाढी अमावस्या आखाडाच्या मुखी घालून साजरी करतो आहें!सौभाग्यवतीला नवऱ्याची खात्री असल्याने शब्द ओंजळ भरतो आहें!🌹
(दीप अमावस्या हार्दिक शुभेच्छा!)
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
*****************************
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४ जुलै २०२५
      (दीप अमावस्या)

आखाड गटारी अमावस्या
आखाड गटारी अमावस्या