असा आडमुठा होतो मराठी कविता संग्रह
असा आडमुठा होतो
दारापुढे झाडावर
‘काव’ कावळा कोकतो
येरे येरे पावसाचे
गाणे तरी ना घोकतो॥धृ॥
घर शेणाचे वाहिल
काय म्हणून हा भितो
‘काव’ ‘काव कोकलतो
अन् उडूनिया जातो॥१॥
कुणी म्हणती उगाच
पाहुणे हा बोलावतो
घरावर दारावर
बसून हा कोकलतो॥२॥
पाहुणाच पाऊसही
पैशा वाचून ना येतो
खोट्या पैशाला पाहून
पहा पळून हा जातो॥३॥
शेतकर्याच्या डोळ्यात
आपसुकच हा येतो
आसू डोळ्यामधे आस
आभाळाला हा लावतो॥४॥
कधी अनाहुतापरी
कधी बोलावता येतो
कुठे अति कुठे माती
असा आडमुठा होतो.॥५॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक : ९३७१९०२३०३.