नारीशक्ती
पुरे आता संघर्षणं
नारी आम्ही नारीशक्ती
घ्यावी आमुची जाणून
नको वंदन घ्यावीच
समानता समजून॥धृ॥
पुरे झाला अबलाचा
आता तबला वादन
हवे निर्भय जीवन
अन् थांबावे रुदन॥१॥
केले आजवरी आम्ही
पतिदेव आराधन
हवी आता आम्हासही
मुक्ती अशा दास्यातून॥२॥
नको आम्हास केवळ
आता रांधन वाढणं
उंबर्यातलच नको
सदा गाडूून रहाणं॥३॥
किती काळ दास्यत्वात
आम्ही रहावे रुतून
किती काळ बंधनात
अन् ठेवावे बांधून॥४॥
कर कर कारावास
किती सहावा हसून
किती काळ आम्हा असे
अन् घेणार कसून॥५॥
खरे घडावे आमुच्या
नारी शक्तीचे दर्शन
अन् थांबावे आमुचे
सर्व काळ संघर्षणं॥६॥
फुले आंबेडकरही
गेले हेच हो सांगून
पहा जरा संविधान
सारे येईल कळून॥७॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३.
