नव वर्ष मराठी कवीता

नव वर्ष मराठी कवीता

नव वर्ष मराठी कवीता

स्वप्नातली कविता

अशीच एक कविता मी
लिहीली होती स्वप्नात
प्रातःप्रहरी नदी किनारी
ती आली होती स्वप्नात

नयनसुंदरी राजकुमारी
हसली हळूच गालात
बघता क्षणीच घायाळ होऊनी
पडलो तिच्या प्रेमात

असा मी असामी असलो जरी
राजकुमार तिच्या नजरेत
मग तिही भुलली मजवर भाळली
पडली माझ्या प्रेमात

एकमेका प्रती आकर्षणाने
बदलली चाल पायात
हळूच तिने केला हात पुढे
मी ही दिला हात हातात

गालावर मारून टिचकी
मुका घेतला हवेत
अंतर सरले तंतर जुळले
एकमेकां घेणार होतो कवेत

सकाळी सकाळी कुणीतरी
उठविता भंग पडला स्वप्नात
अधूरीच राहीली स्वप्नातली कविता
उठूनी बसलो अंथरूनात

अशीच एक कविता मी
लिहीली होती स्वप्नात
सकाळी सकाळी माझी परी
समोर उभी पुढ्यात. ..

अशीच भेट घडत राहो
नित्य माझ्या स्वप्नात
प्रेमावर मी लिहीन कविता
रोज ती येता माझ्या स्वप्नात. ..

कवी:- चंद्रशेखर प्रभाकर कासार
        

शाळेला जा

जा बाबा जा
शाळेला जा
शाळेला जा तू
शाळेला जा

शाळेला जाऊनी
खूप सारे शिक
अभ्यास सारा कर
खूप ज्ञान मिळव
मोठा साहेब होऊन
देश सेवा कर

जा बाबा जा
शाळेला जा
शाळेला जा तू
शाळेला जा

शाळेला जाऊन
खूप खेळ कष्टाने शिक
मोठा खेळाडू होऊन
देशाचे नाव उज्वल कर

जा बाई जा
शाळेला जा
शाळेला जा तू
शाळेला जा

शाळेला जाऊन
खूप सारे शिक
खूप मोठी हो
अन्
सावित्री आनंदी
कल्पना सुनिता हो

जा हो जा
शाळेला जा
शाळेला जा तुम्ही
शाळेला जा

अभिनय कला क्षेत्रात
नाव कमवा
शिक्षक पत्रकार
साहित्यिक व्हा

जा हो जा
शाळेला जा
शाळेला जा तुम्ही
शाळेला जा

मोठे मोठे उद्योगपती व्हा
डॉक्टर वकील
इंजिनिअर व्हा
उंच भरारी घ्या
देशाच्या प्रगतीला
हातभार लावा

जा हो जा
शाळेला जा
शाळेला जा तुम्ही
शाळेला जा

आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करून
सधन शेतकरी व्हा
शास्त्रज्ञ व्हा
संरक्षण अधिकारी व्हा
देश रक्षणा
अभिनव आधुनिक
भारत घडवण्या
तत्पर रहा

जा हो जा
शाळेला जा
शाळेला जा तुम्ही
शाळेला जा
तुम्ही शाळेला जा….

कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार

औषध गोळ्या

घेतो आम्ही औषध गोळ्या
बरे वाटावे म्हणून
दुखण्यांचेही
ऋण फिटावे म्हणून…

कधीकधी पडतो
आम्ही आजारी
औषधांची फिटावी
उधारी म्हणून…

नको आजार वाटतो
नको दवाखाना कुणाला
तरीही पडतो आजारी
जर्जर व्याधी शरीरात
घेऊन आलो म्हणून…

निसर्गापुढे चालते का
कुणाचे कधीही
औषधाला रुसवा नको
उण थंडी पावसात
आजार येतात म्हणून…

घेतो आम्ही औषध गोळ्या…

कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार

अलविदा – २०२४

कुछ पल रह गये तुम्हारे
और वे पल गुजर जाने के बाद
तू बीत जाएगा
कुछ यादोंको समेटकर
बिता साल कहलाएगा
फिर तुझे हम भुल जाएंगे
क्योंकी
हमे वर्तमान मे जीने की
आदत जो हो गयी है
कल हम तुझे खो देंगे
और आने वाले कल के
वर्तमान के हो जाएंगे
बडी दुख के साथ
कहना पड रहा है
अलविदा २०२४

कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
.

निरोप सरत्या वर्षाला

“अरे यार..काय करतोय? “
नवीन वर्ष संपायला दोनच दिवस बाकी होते म्हणून दाराच्या पायरीवर विचारात मग्न असतांनाच मित्राच्या आवाजाने विचारमग्न अवस्थेतून बाहेर पडलो आणि म्हटले,” काही नाही रे, थोडं एकांत मिळाला की माणूस विचारात मग्न होतो हेच विचार मग माणसाला कुठे कुठे घेऊन जातात, बघ ना यार बघता बघता हे ही वर्ष संपायला आले दोन दिवसावर आणि त्याच्याच विचारात गुरफटत गेलो, किती पटापटा संपले कधी डिसेंबर संपायला आला कळलेच नाही ह्या धावपळीच्या जिवनात संपुर्ण एक वर्ष असे आले आणि असे संपले आता निरोप द्यायची वेळ आली तेव्हा आठवतोय ३६५ दिवसांचा लेखाजोखा अगदी १ जानेवारी पासून नव वर्षाच्या स्वागतासाठी केलेली तयारी वर्षभराचे रचून ठेवलेले आराखडे, मनसुबे काय काय विचार केले होते हे करू ते करू पण सालं संसाराच्या रहाटगाड्यात सगळेच नाही जमले खूप काही करायचे होते खूप काही राहून गेले. सुखे आलीत त्यापाठोपाठ दुःखेही आली. काही गोष्टी चांगल्या झाल्या आणि काही ठिकाणी हार पत्करावी लागली. कुठे प्रवास लाभला कुठे सहवास लाभला.
तर कधी एकांतवासात राहावे लागले. एवढ्या सगळ्या आठवणी घेऊन निरोप कसा द्यायचा रे ह्या विवंचनेत विचार मग्न झालो होतो.
” बरं,ते जाऊ दे नवीन वर्षाच्या स्वागताचं काही नियोजन केले आहे की नाही.”

“मित्रा लई जय्यत तयारी आहे,
आणि ३१ डिसेंबर च्या पार्टीला यायचंय बरं का, एकदम फुल टू धमाका एंजॉय आणि फक्त एंजॉयच
ते निरोप बिरोपच्या भानगडीत नाय पडायचं
ते काय पाव्हणे आलते का की कोणी गावी निघालय निरोप द्यायला.
गेला दिवस विषय संपला, इतिहास जमा झाला नाय का ते आता? मग विसरायचं आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं एकदम जल्लोषात.
तयार रहा आणि लवकरच ये.”
एवढे बोलून तो निघून गेला.
आला तसा गेला.
तसेच वर्षे येतात जातात.
मग निरोप द्यायचा की स्वागत करायचं?
विचार केला जमाने के साथ आए है जमाने के साथ चलना है….
एक बार अलविदा कह के
आगे का सफर तय करना है…

चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.

वर्ष संपून जाते

निरोप तुजला सरत्या वर्षा देऊ कसा आता
बांधावरल्या क्षितिजा पल्याड सुर्य  डूबला होता

गेले वर्ष सरून सारे कळले नाही आता
गत वर्षाचा एक एक दिवस महत्त्वाचा होता

कसा गेला एक एक दिवस काय सांगू मी कथा
तूच समजून घे आता आमच्या जीवनाची व्यथा

आनंदात दुःख दुःखात आनंद तुच दिले आम्हास
असेच जीवन जगण्याचा आहे आमचा प्रयास

गेल्या वर्षांत अनेक घटना जीवनात घडल्या होत्या
निरोप देतांना आज त्या आठवणीत राहिल्या होत्या

श्रृष्टिचे हे जीवनचक्र सदा असेच फिरत असते
एक एक दिवस संपत जातो वर्ष संपून जाते

कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर, धुळे.
७५८८३१८५४३.