पश्चाताप शेतकरी आत्महत्या

पश्चाताप शेतकरी आत्महत्या

पश्चाताप शेतकरी आत्महत्या

😭पश्चाताप😭
==============
फास गळ्याचा पाहून
दोरी   करे   पश्चाताप…
व्यवस्थेच्या नादानं मी
रोज   करते   रे   पाप……..1
खांब  धिराचा मोडला
घर    कुणब्याचं   रडे…
त्याच्या अंगणात रास
रोज  आसवांची  पडे………2
जन्म ढेकळाच्या पोटी
झाली जन्मताच माती…
तरी   पेटवीत   जातो
सदा   अंधारात  वाती …….3
पिढीजाद…..पराधीन
रेघ   भाग्याची  करंटी…
तरी   आशेपोटी  बैल
वाजे गळ्यातील  घंटी …….4
एक  पेरुनिया   दाणा
कणगीला  जो भरतो…
काही  कळतच  नाही
कास्तकार  का  मरतो ?…..5
मोल आसवांचं किती
कोण  देणार हा जाब…
संवेदना  क्षीण  झाली
किती गंभीर  ही  बाब……..6
आशा गतप्राण झाली
मेली   दुमडूनि   पाय…
खांदा द्यावयास तिला
सध्या वांझोटीच माय………7
झाली व्यवस्था मुजोर
हाके   उलटंच   औत…
तिच्या  बळावर  दौडे
रोज कुत्र्याची  रे मौत………8
===≠===============
===================
कवी… प्रकाश पाटील
पिंगळवाडेकर.