बाप

बाप

बाप

बाप
  प्रत्येकाला बाप असतो पण तो प्रत्येकाला कळत नाही. आई समजून घेण्यासाठी ह्रदय लागते आणि बाप समजण्यासाठी बुद्धी लागते.मुळात बाप कुणालाच कळत नाही. कारण आई जे करते ते तिचे प्रेम असते आणि
बाप जे करतो ते त्याचे कर्तव्य! इथेच सगळी गफलत होते.
बाप फक्त मुलाचीच काळजी घेतो असे नाही,तो मुलाच्या आईचीही काळजी घेतो पण उपकार करत नाही ,असे उद्धटपणे बोलून आपण मोकळे होतो.बाप आईपेक्षा कठोर वाटतो.चुकांबद्दल बोलतो,शिक्षा करतो.आई गोंजारते,आपल्यापदराने अश्रु पुसते म्हणून ती मायाळू वाटते.
आई घरातल्या घरात स्वयंपाक करते.प्रत्येक
वस्तू बाप पुरवतो.दिवसभराचे काम आटोपून
घराकडे जातांना आपल्या लेकरांसाठी खाऊ
घेऊन जातो.आजारी पत्नी,मुले यांचा उपचार
करवितो.रात्री जागून काढतो.बाहेरअपमानाचे
घाव सोसतो.आपल्या कुंटुबाला सुरक्षित ठेवतो.
बापच असतो जो आपल्या मुलीसाठी वर शोधतो.हुंड्यासाठी पैसे जोडतो .मुलीला सासरी पाठवतांना ढसाढसा रडतो .


मुलाच्या शिक्षणासाठी अमाप खर्च करतो.डोनेशन भरतो.मुलाच्या सुखाचे स्वप्नबघतो तो बाप कधी कुणाला कळलाच नाही.कधीतरी मुलांना  याची जाणीव व्हावयास हवी.आपल्यासाठी कुणी खस्ता खाल्ल्या,कुणी त्याग केला,कुणी अश्रु वाहिलेहे.जर मुलांना कळत नसेल तर असले शिक्षण तरी काय कामाचे!फक्त स्वार्थ आणि स्वार्थ
शिकवणारे शिक्षण कुचकामी आहे.
आईचे प्रेम जन्मदात्री म्हणून स्वाभाविक आहे, सर्व प्राण्यांत हे प्रेम असते पण बापाचेप्रेम अदभूत ,अलौकिक आहे इतर कुठल्याही प्राण्यात बापाचे प्रेम लाभत नाही.


प्रत्येकाच्या जडणघडणीत बापाचा सिंहाचा वाटा असतो.सगळे कवी आईच्या प्रेमाची महती गातात.कटु पण सत्यआहे ,आईशिवाय मुले बापाने सांभाळली पण बापाशिवाय कशी वाताहत होते याची अनेक उदाहरणे आहेत.
ऊन,वारा,पाऊस बाप अनुभवतो.बापाला आईसारखे सारखे रडता येत नाही कारण तोअश्रु पुसणारा असतो.
सगळी कामे बापाला करावी लागतात.पत्नी चे मन सांभाळावे लागते.बायकोसारखे माहेरी
जाता येत नाही. तारेवरची कसरत असते.
मुलांना बापाच्या कष्टाची जाणीव होणे गरजेचे आहे. लग्न झालेली, स्वावलंबी मुले पंचवीस वर्षे सांभाळ करणाऱ्या बापाला विसरतात.हा नतभ्रष्टपणा आहे.
बाप कधीच मुलांना काही मागत नाही. फक्त. तु सुखी रहा
एवढेच म्हणतो.तरीही तो उपेक्षित! साधे बोलणे नकोसे. मुलांचे असे वर्तन निश्चितच बापाला आतून खचवित असेल.
कधीतरी बापाच्या आवडीचे कपडे आणा,खायला आणा.जवळ बसा.गप्पा करा.विचारपूस करा.बायकोला सांगा ,तुझ्या बापासारखे माझेही माझ्या बापावर प्रेम आहे. सुनेला मुलीप्रमाणे वागवणारा बाप पाहिजे तसे सासऱ्याला बापाप्रमाणे समजणारी सूनही हवी.शेवटी काय समजून घेण्याचा विषय आहे. आपले अश्रु ज्याने कायम पूसले एकदा तरी त्याचे अश्रु पूसून बघा .तेव्हाच कळेल बाप काय असतो.


     नारायण खराद