दसरा सण एक परंपरा एक आनंद

दसरा सण एक परंपरा एक आनंद

दसरा सण एक परंपरा एक आनंद

दसरा सण: एक परंपरा, एक आनंद

“दसरा सण मोठा” असं म्हणताना नेहमीच आपल्या मनात एक उत्साह आणि आनंद जागतो. आपला हा सण अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी साजरा केला जातो. नवरात्र संपल्यानंतर दहाव्या दिवशी येणारा दसरा म्हणजे विजयादशमी. हा दिवस केवळ परंपरा नाही, तर विजय आणि साहसाचं प्रतीक आहे. याच दिवशी आपण रावणवध, शस्त्रपूजन, सरस्वती पूजन, आणि पराक्रमाचे उत्सव साजरे करतो.

दसऱ्याच्या मुहूर्तावर मी केलेला संकल्प

“दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा” असं म्हणताना आपल्याला लक्षात येतं की, ह्या सणामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा आहेत. त्यातील काही प्रसिद्ध कथा म्हणजे प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी राक्षस राज रावणाचा वध केला आणि विजय मिळविला. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेचा उत्सव आणि शत्रूंवर स्वारी देखील याच दिवशी केली होती.

महिषासूरचा वध आणि विजयादशमी

महिषासूर नावाचा राक्षस जो तिन्ही लोकांवर विजय मिळवू इच्छित होता, त्याच्या वधाचीही कथा या सणाशी जोडलेली आहे. महिषासूराने १२ वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि एक असा वर मागितला की, कोणत्याही देव, मानव किंवा दानवाला त्याला मारता येणार नाही. पण त्याच्या अत्याचारांमुळे देवी दुर्गाने त्याचा वध केला. नऊ दिवसांच्या घनघोर युद्धानंतर देवीने त्याला मारलं, म्हणून आपण नऊ दिवस घट बसवून देवीची पूजा करतो आणि दहाव्या दिवशी दसरा साजरा करतो.

खान्देशातील नवदर्गा सप्तशृंगी माता खान्देशातील नवदर्गा मुधाईदेवी खान्देशातील नवदर्गा पाटणादेवीचे वरदहस्त शक्तीपीठ श्री चंडीकादेवी खान्देशातील नवदर्गा धनदाई माता

आपट्याच्या पानांचा महत्त्व

दसर्‍याच्या दिवशी आपण आपट्याच्या पानांचा सोन्यासारखा सन्मान करतो. यामागे देखील एक जुनी कथा आहे. वरतंतू नावाचे ऋषी आणि त्यांच्या शिष्य कौत्स यांच्याशी संबंधित हि कथा आहे. गुरु दक्षिणा म्हणून कौत्साने राजाकडून सुवर्ण मुद्रा मिळवल्या आणि त्या आपट्याच्या झाडाच्या पानांवर सोडल्या. म्हणूनच आपट्याच्या पानांना सोनं मानलं जातं.

दसरा सण

दसऱ्याचा ऐतिहासिक महत्त्व

पांडवांनी अज्ञातवासातून परतल्यावर आपली शस्त्रं शमीच्या झाडाखाली लपवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी ती शस्त्रे शमीच्या झाडाखालून काढून त्यांची पूजा केली. याच कारणास्तव शस्त्रपूजन आणि शमीच्या झाडाची पूजा दसऱ्याला केली जाते.अशा अनेक परंपरांच्या संगमामुळे आपला दसरा सण प्राचीन काळापासून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे पराक्रमाचा, विजयाचा आणि आनंदाचा प्रतीक आहे. म्हणूनच म्हणतात:

“दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा!”

विश्राम बिरारी, धुळे

विजयादशमी

आपट्याची पाने वाटू
सुखाचं सोनं लुटुया
प्रेम आलिंगणे भेटीगाठी घेऊ
दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून
रावण दहन करूया
मना मनातले महिषासुर पळवू
चला विजया दशमीला
दसरा सण साजरा करूया

सीमोल्लंघन करून
कुप्रथा कुविचारांना दूर सारू
सुविचार नवनिर्मितीचा ध्यास धरूया
दसरा सण साजरा करूया

करूया प्रण विजयादशमीला
अत्याचारी भ्रष्टाचारी बलात्काऱ्यांना
वाम मार्गापासून दूर सारूया
शिस्त सभ्यता प्रथा परंपरांचा
आदर भाव मनी ठसवूया
दसरा सण साजरा करूया

गुन्हेगार अतिरेकी आतंकवादी
यांच्या अपप्रवृत्तींना आळा घालू
देश आमचा समृद्ध करून
जनास अभयदान देऊन
स्वच्छ भारत निर्मल भारत
प्रगत भारत घडवूया
दसरा सण साजरा करूया

सुखाचं सोनं लुटु
आनंदाने उत्साहाने विश्व जिंकूया
चला विजया दशमीला
दसरा सण साजरा करूया

कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
          (चांदवडकर ). धुळे.
        7588318543.

दसरा

दसरा सण मोठा
तोटा नाही आनंदाला
सुवर्णप्रभा फाकली चोहीकडे
हास्य घेऊनी दसरा आला

रावणाशी वधले रामाने
दुर्गेने वधले महिषासुराला
दुष्ट शक्तींचा होतो संहार जगी
संदेश घेऊनी दसरा आला

भ्रष्टाचाराचा बिमोड करा
देऊ नका थारा दहशतवादाला
प्रेम सदभाव जपा मनी
आज दिन सोनियाचा आला

देऊ आज आपट्याचे सोने
पुजू या आज लोखंडाला
संस्कृृृतीचे महत्व सांगण्याला
सण हा दसर्‍याचा आला

शुभ कामे घेऊया हाती
संकल्प नवे नवे करूया
माणुसकीचा हात देऊ एकमेका
प्रगती राष्ट्राची साधूया


डाँ.शैलजा करोडे©®
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *