खान्देश आराध्य दैवत श्री. कानबाई माता महोत्सव

खान्देश आराध्य दैवत श्री. कानबाई माता महोत्सव
खान्देश आराध्य दैवत श्री. कानबाई माता महोत्सव

खान्देश आराध्य दैवत श्री.कानबाई माता महोत्सव


खान्देश आराध्य दैवत श्री. कानबाई माता महोत्सव

कवी शरद (अण्णा)


श्री कानबाई माता की जय हो…
श्री रानबाई माता की जय हो…


खान्देशातील कानबाई माता उत्सव: परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक

श्रावण महिन्यातील नागपंचमी सणानंतर आणि श्रावण महिन्यातील पहिला शनिवार, रविवार, आणि सोमवार या तीन दिवसांमध्ये खान्देशचे आराध्य दैवत, आई कानबाई मातेसाठी उत्सव दिवाळीसारखा साजरा केला जातो.

खान्देश आराध्य दैवत श्री. कानबाई माता महोत्सव
खान्देश आराध्य दैवत श्री. कानबाई माता महोत्सव

खान्देश भागाला प्राचीन काळापासून “कान्हदेश” असे ओळखले जाते. खान्देशातील सर्व लोक कानबाई व रानबाई या दोन देवींचे भक्त आहेत. या देवींचे पूजन खान्देशातील लोक साधारणतः चार हजार वर्षांपासून करत आहेत, अशी मान्यता आहे. हा परंपरा आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे. खान्देशी लोक कृष्णवंशी होते आणि गोपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. राधा आणि चंद्रावली या खान्देशी कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांची पूजा करत, आणि त्यांनाच कानबाई व रानबाई या नावाने संबोधले जाते.

अहिराणी भाषा: चार हजार वर्षांची परंपरा

अहिराणी ही खान्देशी मूळ भाषा आहे. ह्या भाषेचा इतिहासही चार हजार वर्षांपूर्वीचा आहे. राधा (कानबाई) व चंद्रावली (रानबाई) यांना त्यांच्या सखींसहित पूजन केले जाते. कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी, श्रीमती राधिका, आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय राणी रुक्मिणी अर्थात वृंदावनातील चंद्रावली.

रोट महोत्सव: खान्देशातले दिवाळी सारखा सण

श्रावणातील नागपंचमीनंतर पहिल्या शनिवारी, रविवारी, आणि सोमवारी कानबाई आणि रानबाईचा (अर्थात राधा आणि चंद्रावली) उत्सव खान्देशात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. याला “रोट” या महोत्सवाचे नाव दिले जाते. हा महोत्सव दिवाळी सारखा साजरा केला जातो. घराला रंगरंगोटी, स्वच्छता, नवीन वस्त्र आदी कामे केली जातात. विशेषतः चण्याच्या दाळीचा वापर जेवणात केला जातो. पुरण पोळी, खीर, कटाची आमटी, आणि गंगाफळ/लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो.

संपूर्ण गावात उत्साहाचा जल्लोष

शनिवार, रविवार, आणि सोमवार या तीन दिवसात हा सण साजरा केला जातो. कानबाईच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत केले जाते. तीन दिवसांचा हा सण साजरा करण्यासाठी काम किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी गावात परत येतात. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटसाठी गावात येतोच. परदेशात असणारे लोकसुद्धा या सणासाठी गावात येतात. या काळात गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते, आणि मित्रमंडळी एकत्र येऊन सण साजरा करतात.

कानबाईची मुख्य सेविका: गवरणी

कानबाईची मुख्य सेविका “गवरणी” म्हणून ओळखली जाते. ही गवळणी राधाच्या मुख्य सेविका ललिता आणि विशाखा ह्यांचे प्रतीक आहे.


खान्देशची कुलस्वामिनी श्री आई कानबाई माता की जय हो!

मनी माय कानबाई माय…

कवी, लेखक व समाजसेवक शरद (अण्णा)
संस्थापक अध्यक्ष व उद्योजक
छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *