एक कविता अशीही pavsachi kavita
एक कविता अशीही
एक कविता अशीही
चिंब चिंब भिजणारी
रिमझिम पावसात
गाणे हर्षाचे गाणारी
एक कविता अशीही
ब्रम्हांडात फिरणारी
माझ्या हाताला धरुन
पर्यटण करणारी
एक कविता अशीही
माझे अश्रू पुसणारी
धीरोदात्तपणे मज
साथ संकटी देणारी
एक कविता अशीही
घेई गगन भरारी
क्षणार्धात सागराच्या
तळी घेऊन जाणारी
एक कविता अशीही
संवेदना जपणारी
मनातील भावनांना
अलगद टिपणारी
एक कविता अशीही
विद्रोहाने पेटणारी
हाती घेवून मशाल
क्रांती बीज पेरणारी
डाॅ. शैलजा करोडे ©®
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391
