पांडुरंगा
पांडुरंगा, जीव तुझ्यात रंगला
जीवनाच्या नाना रंगा
जीव माझा कंटाळला
अखेरीस पांडुरंगा
जीव तुझ्यात रंगला
निसर्गाच्या देखाव्यात
रंग आले, रंग गेले
ऊन सावल्यांचा खेळ
असा क्षणोक्षणी चाले
रंग गुलाबी प्रेमाचा
मना वाटला हवासा
वय वाढता वाढले
तसा झाला पुसटसा
संसाराच्या मायेमध्ये
काही काळ रमलोही
समाधान काही केल्या
कधी मिळालेच नाही
योग याग विधी केल्या
काही फायदा ना झाला
परी वारकरी होता
जीव तुझ्यात रंगला
सर्वसाक्षी अविनाशी
एक तूच पांडुरंगा
तुझ्या भक्तीत आनंदे
गातो संतांच्या अभंगा
काशीनाथ महाजन, नाशिक
फोन ९८६०३४३०१९