वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
अभिष्टचिंतन.
मोरपंखी जीवनाचा गोषवारा मित्र माझा
काळजाच्या वावराचा सातबारा मित्र माझा
रात्र सरली लुप्त झाले सर्व तारे ‘देवदत्ता’
फक्त उरला सोबतीला शुक्रतारा मित्र माझा
वाढदिवसाच्या गझलपंखी आभाळभर हार्दिक शुभेच्छा गझलगुरु मित्रवर्य जयराम दादा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मित्रवर्य
अभिष्टचिंतन
प्रिय मित्रवर्य संजू दादा,
अंतरंगी तेवणारी
काव्यमयी वात आहे
साहित्याचा हा प्रवासी
जगताला ज्ञात आहे..!
प्रसिद्धीची हाव नाही
मनी फक्त पुण्य आहे
भाऊ एैसा स्वाभिमानी
मन माझे धन्य आहे..!
मातृसेवा परायण
पुत्र तू महान आहे
मज अनुज बंधूचा
सार्थ अभिमान आहे..!
दीर्घायुष्य लाभो तुला
हीच मनी इच्छा आहे
वाढदिनी काव्यपंखी
मित्रा ही सदिच्छा आहे..!
प्रिय मित्रवर्य
मा.संजू दादा धनगव्हाळ
आपणांस वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !
सुगंधानुज
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
Pingback: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता - मराठी 1