मराठी कविता मी भिडे वाडा बोलतोय
मी भिडे वाडा बोलतोय
इतिहास हा खोलतोय
ज्योतिबा सावित्रींची क्रांती
मिटविली अज्ञान भ्रांती
मी भिडे वाडा बोलतोय
आठवणींनी हळहळतोय
मुलींची पहिली शाळा काढली
समाजाची स्थिती सुधारली
मी भिडे वाडा बोलतोय
शिक्षणाचा झेंडा डोलतोय
सावित्रीने शेणाचा मारा झेलला
दीन-दलितांचा उध्दार केला
मी भिडे वाडा बोलतोय
महात्म्यांचा छळ सलतोय
दूर केल्या अनिष्ट रुढी
उभारली सुधारणेची गुढी
मी भिडे वाडा बोलतोय
सुधारकांचे कार्य तोलतोय
पाण्यासाठी साऱ्यांना आड खुला
सत्य समतेसाठी लढा दिला
मी भिडे वाडा बोलतोय
आव्हान नवे पेलतोय
पुण्यात आली रोगराई
रुग्णांची सेवा करे सावित्रीबाई
मी भिडे वाडा बोलतोय
गदगदून हो रडतोय
पुन्हा या ज्योतीबा सावित्री
म्हणत उभा हलतोय
राष्ट्रकवी– संजय मुकूंदराव निकम
गायत्रीनगर, मालेगांव कॅम्प,
मालेगांव जि. नाशिक
मोबा. 8657488426
Pingback: मराठी कविता (Marathi Kavita) कशी समजून घ्यायची माणसं - मराठी 16/03/2024
Pingback: मराठी कविता (Marathi Kavita) वहिवाट - 16/03/2024
Pingback: पाणीपुरीची मौज (Marathi Kavita) - मराठी 16/03/2024