गझल माझी बोलते
मैना
केली माझी नजरेने तू शिकार मैना
सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना
सरीसारखी सरसर येते निघून जाते
ओले करते मन अन् होते पसार मैना
हळूच ये ना हृदयामधल्या बागेमध्ये
बघ दरवळते तूच तिथेही अपार मैना
आयुष्याचा कागद केला तुझ्या हवाली
मिलनाचा तू त्यावर लिहला करार मैना
‘देव’ जाणतो खरी ‘भावना’अंतरीतली
सात नव्हे मी जन्म मागतो हजार मैना
सुगंधानुज
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.