शब्द स्पंदन चित्र चारोळी
चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचा आगळा वेगळा चित्र चारोळी संग्रह शब्दस्पंदन चित्रकार
शब्द स्पंदन चित्र चारोळी
७ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन
खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
खान्देश कला रत्न दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश

कवी दिनेश चव्हाण यांच्या चित्रांना,कलेला दिलेली आरोळी आणि त्या चित्रांवर आधारित सुचलेली चारोळी.
अतिशय संवेदनशील चित्र चारोळीचा गुणगौरव करणारा हा चित्र चारोळी संग्रह.

असं म्हणतात की शब्द जगायला शिकवतात .
शब्द माणसाला उभं करतात.
शब्दांमुळेच शब्दांचा होतो घात. पण शब्दांमुळेच कुणीतरी आपला धरत असतो हात,
आणि या शब्दांमुळेच कुणीतरी देत असतं साथ, म्हणूनच या निर्जीव असणाऱ्या चित्रांना सजीव बनवण्याचे काम केलं ते म्हणजे चित्रकार ,
कवी मनाच्या दिनेश चव्हाण यांनी ….
आयुष्य जगत असताना संघर्ष हा कोणाच्या वाटेला नसतो. जन्माला आलो त्याच दिवसापासून आपला संघर्ष हा लिखित असतो.
आईच्या उदरातून बाहेर पडण्यासाठीचा सुद्धा एक संघर्ष असतो.
या संघर्षमय जीवनावर चारोळी लिहिताना
कवी या ठिकाणी म्हणतात की ,
संघर्षाच्या वाटेत मी
खूप काही गमावलं
कुणाचा घात करून
नाव नाही कमावलं…
आयुष्याच्या वाटेवर अनेक वळणं असतात अनेक माणसं भेटतात काही लक्षात राहतात काही विसरून जातात,अनेक नाते धरून आपण जीवन जगत असतो.
आयुष्य असंच खडतर असतं सर्वांची मनं जपता जपता नाकी नऊ येऊ लागतात.अशातच कोणीतरी कुणालातरी डावलायचं आणि पुढे जायचं.
नातेवाईकांमध्ये खोटेपणाने वागायचं आणि नकळतपणे दुसऱ्याला बदनाम करायचं ही लोकांची मानसिकता.

पण या जगाचा विचार न करता दुसऱ्याचा घात करून स्वतःचा स्वार्थ साधणारी ही लोकं …
यांचा जेव्हा कवी विचार करतो .
तर तेव्हा ही चारोळी उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते .
कवी इतका स्वाभिमानी आहे.
तो म्हणतोय की,
मी कुणाचा घात
केला नाही
आणि माझं नाव
तसं मी कमावलेलं नाही..
पुढच्या एका चारोळी मध्ये कवी लिहितो पावसाचं वर्णन करतोय.पाऊस हा सर्वांचा आवडता, लाडका.

पण ह्या पावसाला सुद्धा माझा हेवा वाटावा आणि म्हणून तो तुझ्यासोबत मला पाहून जास्त पेटला असावा …
अशीही पावसाबद्दलची कुठेतरी केलेली तक्रार.
त्याला वाटलेली घृणा, तिरस्कार , जलसी या चारोळी मधून दिसून येते.
पाऊस कधी कमी
तर कधी जास्त
कधी रिमझिम
तर कधी मनसोक्त बरसतो
आणि म्हणूनच त्यादिवशी थोडा पावसाचा जोर वाढला असावा.
आणि कवीने या चारोळीला जन्म दिला असावा.
सखे ग !
तुला काल वाटेत
बघ पाऊस
भेटला होता
तुला माझ्यासोबत
पाहून
आज तो जास्त
पेटला होता ..
मंडळी आपली बाळाची आई असो किंवा प्राण्याची आई असो .
माया , ममता , वात्सल्य हे प्रत्येक आईला लावून दिलेलं आहे.
आणि म्हणूनच सर्वांची ती असते सारखीच आई .
जगातील सर्वश्रेष्ठ दैवत आहे.
आई ही सुसंस्कारांची जननी आहे .
असेही म्हटलं जातं .
या आई बद्दल लिहिताना कवी दिनेश म्हणतात…
असेही तुझ्या सुखासाठी मला नाही वाटत ओझे,
तुझ्याच रे भविष्यासाठी रक्तही आटवेल माझे …
तसंच आईची महिमा अपरंपार आहे किती कौतुक केलं, कितीही गुणगान. गायलं…
तर ते कमीच आहे.
आई ही आईच असते.
त्या आईरुपी देवतेचं वर्णन करणाऱ्या चित्र चारोळी या पुस्तकात लिहिलेलं आहे…ते म्हणतात,
लेकरांच्या भुकेसाठी
पाहिलं तिला झिजताना अंगात त्राण नसताना
तरीही दूध पाजताना
अशा अनेक प्रकारच्या चित्र चारोळी शब्द स्पंदन या संग्रहात आलेल्या आहेत.त्यात शोषण, गरिबी, भेदभाव , प्रेम , स्नेह , जिव्हाळा , आपुलकी , विद्रोह , नकार , तिरस्कार , निसर्ग , शेतकरी , कष्टकरी, भूक , यातना . या विविध प्रसंगांच्या माध्यमातून व्यक्त झालेला हा चित्र चारोळी संग्रह अप्रतिम असा आहे.
















एकापेक्षा एक सरस
चित्र, चारोळी यात आहेत .
प्रत्येक चित्र आणि चारोळी आपल्याला विचार करायला भाग पाडते .
इतकं अप्रतिम लिखाण करून आजच्या या साहित्यिक जगात एक नवा आदर्श घडवण्याचा हा दिनेश चव्हाण यांचा प्रयत्न आपल्याला दिसून येतोय .
हा शब्दस्पंदन चित्र चारोळी संग्रह आपण नक्कीच सर्वांनी घ्यावा.
मनापासून वाचावा.
कलेचं बारकाईने निरीक्षण करावं .
कारण हा अतिशय प्रेरणादायी असा संग्रह आहे .म्हणूनच दिनेश चव्हाण या कला तपस्वी साठी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून अशा या अवलिया कलाकाराला आपण शुभेच्छा देऊयात…..
सौ पुनम चंद्रकांत बेडसे.
संसारवेडी .
अभिनेत्री, आकाशवाणी निवेदिका, प्रसिद्ध सूत्रसंचालक, धुळे
दिनेश चव्हाणजी…
नमस्कार, आणि मनःपूर्वक अभिनंदन