खेळ स्वास्थ्य समृद्धीचा महामार्ग
नानाभाऊ माळी
खेळ जगातील सर्वात श्रेष्ठ व्यायाम आहे!मन अन शरीर स्वास्थ्यांसाठी खेळ विधायक भूमिका पार पाडीत असतात खेळातून माणसं, समाज अन देश जोडला जात असतो!खेळातून राष्ट्रीय भावना वाडीस लागतं असतें!खेळाचे अनेक प्रकार आहेत!प्रत्येक खेळातून मन,बुद्धी अन शरीराचा कस लागतो!त्यातून सुदृढतेचं सुंदर बक्षीस मिळत असतं!खेळातून आपुलकी, मैत्रीभाव, सांघिक भावना, राष्ट्रप्रेम वाढीस लागत असतं!खिलाडू वृत्ती खेळातून निर्माण होतं असतें!असं म्हणतात ‘ज्या देशात विविध खेळ खेळले जातात ते राष्ट्र बलशाली असतं!’
आपल्या देशात प्राचीन काळापासून खेळांची परंपरा होती!अलीकडे देश बांधवाना खेळाविषयी प्रचंड ओढ अन उत्साह, उत्सुकता वाढायला लागली आहे!अनेक तरुण खेळ म्हणजे पॅशन समजत आहेत!प्रोफेशन समजत आहेत!खेळ जेव्हा profession होतॊ तेव्हा समृद्धीकडे झेप असतें!
शाळा, कॉलेज,विविध अकॅडमीतून खेळाडू घडत आहेत!भारत बलदंड व्हावा!शक्तिशाली व्हावा यासाठी अनेक नोकऱ्यांमध्ये खेळाडुंमधून निवड होत असतें!शाळा, कॉलेज या पायऱ्या आहेत!उत्तम आरोग्यासाठी विशेष खेळ शाळांमध्ये खेळवले जातात!तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्यपातळीवर खेळाडू चमकल्यावर!त्यातून देशपातळीवर खेळाडूंची निवड होते!
शाळा,कॉलेज प्रोत्साहन देत अनेक खेळाडू घडवीत आहेत!अशाचं एका क्रीडास्पर्धेत पाहुणा म्हणून हजेरी लावण्याची संधी मिळाली होती!पुण्यातल्या महात्मा फुले संस्थेच्या शाळांतर्गत ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती!विध्यार्थी आपलें कसब पणाला लावून खेळत होते!अनेकविध खेळ पाहात होतो चुरस होती!शालेय क्रीडास्पर्धा शक्ती, युक्ती, उत्साह अन आनंद देणारा उत्सव होता!संस्थापक आदरणीय रतनजी माळी सर,संस्थेच्या अध्यक्षा सौं.स्मिताताई वाघ,सचिव प्राचार्य रवींद्रजी वाघ सर,अन भारत विकास परिषदचें अनेक मान्यवर विध्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते!विध्यार्थी देशाचा भावी नागरिक असतो!संस्कार, संस्कृती अन खेळ यातून व्यक्तिमत्व घडत असतं!आम्ही चपळ,सशक्त भावी नागरिकांची ओळख करून घेत होतो!
खेळ!….कुदून कुदून घाम गाळणे!पोटाला भूक लागणे अन मजबूत जेवणे!मनसोक्त जगणे….थकव्याने ‘घोडे बेच के’ घोरत झोपणे!माणसाचं शरीर असचं असावं नाही का?उत्तम आरोग्य जीवन समृद्धीची ओळख असतें!सुदृढ स्वास्थ्य घाम अन कष्टाने मिळत असतं!त्यात खेळाचा ७०% हिस्सा असतो!उमलत्या मुलांचं!शाळा,कॉलेजमधील तरुणांचं जगणं, बलशाली देशाचें भावी नेतृत्व पाहात होतो!
खेळ सन्मानाची पावती असतें!खेळ जीवनाचा आधार असतो!मी मुलांकडे पाहात होतो!मनाने बालपणात गेलो होतो!स्वतः खेळाडू होऊन खेळत होतो!त्यात इतका रमून गेलो होतो की मी सेवानिवृत्त व्यक्ती आहे हेचं विसरून गेलो होतो!मी आतून बाल खेळाडू होतो, तरुण होतो!मुलांमध्ये समरसून खेळाडू झालो होतो जणू!असा मुलं होऊन खेळण्यातला आनंद प्रत्येकाच्या जीवनात यावा अशी ईश्वराकडे प्रार्थना केली!ज्या खेळाडूंनी दैदीप्यमान कामगिरी केली होती त्यांचा गौरव सन्मान चिन्ह देऊन, ट्रॉफी देऊन करण्यात आला!मुलं गौरव स्वीकारून आनंदीत होत होती!आमचही बालपण त्यातून पाहात होतो!असा हा अविस्मरणीय सोहळा अनुभवण्याचं भाग्य लाभलं म्हणून मी ही आनंदून गेलो होतो!
… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं-९९२३०७६५००
दिनांक-१९ डिसेंबर २०२४