आजचा अभिष्टचिंतन सोहळा

आजचा अभिष्टचिंतन सोहळा
आजचा अभिष्टचिंतन सोहळा

आजचा अभिष्टचिंतन सोहळा

आजचा अभिष्टचिंतन सोहळा
                                                                                                                       
आज १ जून. आजचा दिवस खासच. कारण आज  जगातील सर्वाधिक लोकांचा वाढदिवस नोंदवणारा विक्रमी दिवस. भारतातील लोकांचा तर नक्कीच, कारण भारतीय लोकसंख्या जगात मोठ्या प्रमाणात आहे. आज वय वर्षे पन्नास-साठ वरच्या लोकांच्या  वाढदिवसाचे प्रमाण मोठे आहे. हे प्रमाण बघून पु. ल. देशपांडे म्हणाले होते की जवळजवळ अर्धा महाराष्ट्रच १ जुनला जन्माला आलाय.

या १ जून दिवशीच्या वाढदिवसाचे श्रेय द्यावे लागते ते आधीच्या पिढीला. कारण तो पण एक काळ होता जेव्हा पालक निरक्षर.अल्पशिक्षीत होते. सरकारी दप्तरात नेमकी जन्मदिनांक नोंद नसायची. पण मुलांनी शिकावे.. प्रगती करावी असे पालकांना वाटायचे. शाळेत पाल्याला घालायची अट होती ६ वर्ष वय पुर्ण झाल्याची. त्यासाठी वय जुळावे म्हणून तमाम मुलांचा जन्म मग तो जवळपास कधीही असो, पण तो १ जून दाखवला जायचा.

आजचा अभिष्टचिंतन सोहळा
आजचा अभिष्टचिंतन सोहळा

६ वर्षे वय पूर्ण झाले की नाही.. हे ठरवायचे ते शाळामास्तर.. गावाचे सरपंच. तर कधी मुलांना एका हाताने डोक्यावरून दुसरीकडचा कान पकडता आला की झाला सहा वर्षाचा.. असे मानले जायचे. यामुळेच १ जून वाढदिवस असणाऱ्यांकडे थोडे चेष्टेने बघण्याचा सूर असतो. लोक ‘सरकारी वाढदिवस’ संबोधतात.

एकमात्र खरं की यामध्ये मुलांनी शिकून सुशिक्षित व्हावे.. स्वप्नपूर्ती करावी हा पालकांचा उदात्त हेतू होता. याचा लाभ घेणारी ही पिढी आज सेवानिवृत्तीच्या जवळपास आहे किंवा सेवानिवृत्त झाली आहे. या जेष्ठ नागरिकांची संख्या ही वाढत्या आरोग्य सुविधांमुळे लक्षणीय आहे. यामध्येही महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

या १ जुनच्या वाढदिवसामुळे अनेकांचे भले झाले. म्हणजे शिक्षण झाले.. लवकर नोकरी मिळाली.. पण काहींना मात्र बराच काळ आधी नोकरीतून सेवानिवृत्त व्हावे लागले त्यांना याची खंत वाटते.वाढदिवसाचे महत्त्व हल्ली फारच वाढलेय, कारण भौतिक सुखे वाढली. तरीही बाह्य जगतातील घटना बघता क्षणभंगूर जीवनाचे नित्य प्रत्यंतर येते, मग वाढदिवसाची ‘आनंदी पहाट’ बघितल्याचा हर्ष जो तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो.

वाढदिवस शब्द व्यापक झालाय. तो वयाचा.. लग्नाचा साजरा होतो. तसेच व्यक्तीगतच काय पण संस्था.. पक्ष सारेच त्यांच्या वर्षपूर्तीचे वाढदिवस धडाक्यात साजरा करतात. प्रत्येक जण आर्थिक  कुवतीप्रमाणे वाढदिवस साजरा करतो. त्यामुळेही अनेकांना रोजगार मिळतो.. अर्थचक्राला गती मिळते. कुणी जमीनीवर.. कुणी पाण्यात तर कुणी हवेत उडत वाढदिवस साजरा करतात.वाढदिवस कुठेही साजरा केला तरीही महत्त्व आहे ते दिवे ओवाळून औक्षण करायला. वाढदिवसाच्या दिवशी औक्षण हे केलेच जाते. मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि लहानांच्या शुभेच्छा स्विकारल्या जातात.

आजच्या अत्यंत व्यस्त जीवनात इष्ट मित्र.. स्नेही.. नातेवाईक यांच्या भेटीसाठी वाढदिवस हे निमित्त झालेय. वाढदिवसाच्या दिवशी कौटुंबिक संमेलन भरते. यामध्ये शुभेच्छा.. आशीर्वादाचे मोल असते.पण काहीही असो.. आज वाढदिवस सरकारी असो वा खरोखरीच या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरामय आणि उदंड आयुष्य लाभो !!

असाच आजचा सरकारी वाढदिवस माझा सुद्धा होता त्याचबरोबर माझ्या काही स्नेही मान्यवरांचा सुद्धा होता, त्यात आज सकाळपासून आपण सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला, शुभेच्छांचा वर्षाव इतका वेगवान होता की, आम्ही त्यात भारावून निघालो..अश्याच प्रकारे माझ्या सर्व स्नेहींचे सदोदित प्रेम मिळावे हिच अपेक्षा करतो आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

आजचा अभिष्टचिंतन सोहळा
आजचा अभिष्टचिंतन सोहळा