कविता संग्रह मराठी

कविता संग्रह मराठी
कविता संग्रह मराठी

कविता संग्रह मराठी

कविता संग्रह मराठी

मावळतीच्या रंगांचे

॥वो शाम कुछ अजीब थी॥

       —_©MKभामरेबापु

मावळतीच्या रंगांचे हे एक दृश्य..
सहज टिपलेले …
“नो रेड्डी…नो अॅक्शन”
डायरेक्ट
नैसर्गिक फोटो. 

दुरवर कुठे तरी पाहतांना मनन चिंतनात गढलेले भाव चेहर्‍यावर आहेत.
अशावेळी नक्कीच मनात काय चालले असेल बरे?
हा आमच्या संशोधनाचा छंद…

मन नावाच्या रणांगणावर चाललेल्या युध्दाचे वादळे.
भुतकाळातल्या आठवणींचे मंथन.

कधी गुढ हसायचे,
कधी रुसायचे,
कधी रडायचे,
कधी कुढायचे.

मनाच्या कागदात गुंढाळलेल्या एकेक आठवणींची पुरचुंडी उघडायची.
एकादी पुरचुंडी मिलनाचा आनंद देते.
तर दुसरी विरहाचे शल्य.
लग्न सोहळ्याचे क्षण आठवतात.
शुभ मंगल सावऽऽधाऽऽनऽऽ
च्या शब्दात गुंफलेली शहेनाईचे सुर आठवायचे.
पहिल्या रात्रीचा अनोखा मिलनाचा प्रसंग आठवायचा.
अंगावरच्या शहार्‍यांनी फुलुन जावे.मऊ मुलायम मयुरपंखी स्पर्शांच्या अनुभुतीने अंगांग फुलावे.
पहिल्या अपत्याचा गोड टॅहॅ टॅहॅ ने कान तृप्त व्हावेत,
बाप बनण्याचा अद्भुत आनंद आठवावा.
ईवली ईवली मुले हां हां म्हणता मोठी होतात.

दुडुदुडु चालणारे त्यांचे पाय धावायला लागतात.
बोबड्या बोलातुन सुस्पष्ट संवादाकडे त्यांची वाटचाल न्याहाळावी.
मुलांची लग्ने होतात,संसार सुरु होतो.पंख पसरुन तेही उडु लागतात.
आपल्या कुशीतुन आपल्या कोषातुन बाहेर पडतात.
नि
पुन्हा तटावर तेच पाय…आपण एकटे उरतो.
त्यात मग साथ असते ती आपल्या जीवनसाथीची !
एक अलौकीक साथ.
एक अजोड जोड.
दो तन एक मन.
पुन्हा कालचक्र फिरते.
दुर्दैवाने जोडीदार उडुन जातो.
माणूस एकटा होतो.

खर्‍या अर्थाने एकटा.
सुखदुःख शेअर करायला कुणी नसते.
आंतुरतेने वाट पाहणारे नसते.
सत्तेने रागावणारे नसते.
क्षणभर  कुशीत शिरायला कुणी नसते.
आपले मन मोकळे करणेसाठी टेकवायला खांदा नसतो.
अश्रु गाळायला जागा नसते.
मन मोकळे करायला माणुस नसतो.
सर्व हृदयात साठवावे.
मनात जिरवावे.
अश्रु प्यायचेत.
अश्रु लपवायचेत.

मनाच्या गाभार्‍यात सारा वेदनांचा धुर साठवावा.
मन नावाच्या नलीका तुडुंब भरतात.
तुंबतात.
साठतात.
झिरपायला कचरतात.
अशावेळी मग माणुस असा दुरवर कुठेतरी पाहत बसतो.
शुन्यात पाहतो.
निसर्गाला पाहतो.
आकाशाला पाहतो.
सुर्याला पाहतो.
या अबोल वाटणार्‍या दृश्याच्या आंत अनेक संवाद दडलेले असतात.
हे कुणाला दिसत नाही.

हे असं पाहणं ही एकप्रकारे विरहाचा निचरा करणारेच असते.
म्हणुनच आमचे मिशन आहे की मावळतीच्या रंगांना खुलवावे,हसवावे नि त्यांच्या मनात तुंबलेल्या वेदनांना वाट मोकळी करुन द्यावी.
आम्ही
आऊटलेट बनतो.
आम्ही डस्तबीन बनतो.
आम्ही विदुषक बनतो.
आणि या वृध्द जगताला आनंदी करतो.

“वो शाम कुछ अजीब थी
यह शाम भी कुछ अजीब है
वो कल भी पास पास थी
वो आज भी करीब है

असे गीत गात गात हरवलेल्या सुरांना शोधावे.
गमावलेल्या क्षणांना वेचावे.
गेलेल्ल्या आठवणींना गोळा करावे
नि
पुन्हा नव्या दमाने

खुशियाॅं ही खुशियाॅं हो
दामन मे जिसके
क्युॅं न खुशीसे वो दिवाना बन जाये,
असे गीत गात फुलावे.
कारण

जो बीत गया है वो
वो दौर न आयेगा
जो निकल गया है वो
वो और न आयेगा

जो है अपने हाथोमे
उसमे ही जीना है
जो गीत है ओठोपे
उसको ही अब गाना है

आमच्या हातात या पेक्षा दुसरे काय आहे?
म्हणुन हेच भरभरुन देतो.
   ——©MKभामरेबापु
           शिरपुर
संस्थापक अध्यक्ष
गौरव फाऊंडेशन शिरपुर
      ज्येष्ठ साहित्यिक,विचारवंत.

मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह

रे मना

रे मना
            ज्याचे त्याला कळे मन
म्हणे आभाळा एवढं
एक बहिणाचं मन
मन खाकसचा दाणा
            म्हणे बहिणाई अन्॥धृ॥
मन ठाऊक मलाही
एक आनंदाचं बन
मन दु:खाचा सागर
              एक म्हणे माझं मन॥१॥
नित् नवाच बहार
येतो फुलता हे बन
येता भरती सागरा
                पार बुडते हे मन॥२॥
मन उडतं आभाळी
जरी पाखरु होऊन
पिंजर्यात हे देहाच्या
              बंद होते परी मन॥३॥
मन जनांस कळेना
आकळेना कुणा मन
ज्याचे त्यालाच त्याचेच
            येते कळून हे मन॥४॥
        निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी,प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.

मराठी कविता संग्रह
मराठी कविता संग्रह

माझी कविता

कविता दिनानिमित्त
माझी कविता
      (वर्ण संख्या १०)  
माझी  कविता शब्द सरिता
स्वच्छतेचा   संदेश   देणारी
आहे शब्द गंगा साहित्याची
पापी  मनं  स्वच्छ करणारी..

माझी कविता आरसा आहे
दिसे  त्यात समाजाचं चित्र
दुःख, नैराश्य  घालविणारी
रसिक – वाचक यांची मित्र..

भाषा, लय,आशय सौंदर्य
तिचे  सोळा  शृंगार दाटते
मोनालिसा हिचं सौंदर्यही
कविते  पुढे  फिके  वाटते..

देते ऊर्जा, उत्साह, प्रेरणा
मिळे त्यातून कसं वागावं
माझी कविताच शिकविते
आयुष्यामध्ये कसं जगावं..

आई,  बाप,  प्रेमी, शेतकरी,
निसर्ग  यांची  जाणीव  राहे
माझी  कविता जणू वकील
त्यांची बाजू मांडणारी आहे..

जोडा  भारत  नारा होतांना
म्हणते आधी माणसं जोडा
प्रत्येक    कडवे    संदेशाचे
सांगते  विचार  करा  थोडा..

वैशाख वणव्यात कविता
होते तेव्हा पावसाची सर
स्वार्थ, अहंकार  दाखवून
करे   मनात   प्रेमाचे  घर..

कवी माणिकराव गोडसे, नाशिक
दिनांक: २१-३-२०२४

kavita sangrah marathi मराठी कविता संग्रह
kavita sangrah marathi मराठी कविता संग्रह

शाहिरांच्या पोवाड्यामधून

कविता दिनानिमित्त रचना
   माझी कविता भाग-२
        (वर्ण संख्या १०)

शाहिरांच्या पोवाड्यामधून
वाढते   देशभक्तीचं   हुरुप
ओवी, अभंग, भारुडामध्ये
माझी  कविता भक्तीचं रुप..

अभिमन्यू   सारखं   अडके
कवी काव्याच्या चक्रव्यूहात
सुख   दुःखात  साथ  देऊन
शब्द    तारणहार     होतात..

आयुष्यामध्ये    गुदमरता
माझी  कविता होते श्वास
भ्रष्ट,पापी,वासना मार्गात
जागवते   माझा  विश्वास..

शब्द  फुलातील   मधुरस
मन   भ्रमर  गोळा  करते
त्याच गोड-मधुर शब्दांची
मग  सुंदर  कविता  बनते..

कवी-लेखक  सोडून गेले
तरी   शब्द  अमर  असते
बालक,तरुण,वृध्द यांच्या
काळजात  कविता वसते..

कुठे  कधी अन्याय घडता
होते लेखणी शब्द आसूड
माझी कविता साधी सरळ
घेत   नसते  कुणाचा  सूड..

गूढ, गुपित  माणसातील
मांडतांना  वाटे अवखळ
मिळे  मनातील शब्दझरे
वाहते  कविता खळखळ..

कवी माणिकराव गोडसे, नाशिक
दिनांक २२-३-२०२४

kavya sangrah
kavya sangrah

माणुसकीची शपथ

….माणुसकीची शपथ….

मनुष्याला मणुष्याची भिती वाटावी…?
माणवता निभावतांना शंका वाटावी…?
सत्कर्मे करतांना हजार वेळा..
विचार करावा वाटणे…?

दया आणि धर्माच्या नावाचा
काटा फुटावा अंगावर…?
कुणाच्या मदतीला धावतांना –
पाय आपले थांबावे…?
सेवा भाव निभावतांना –
सेवा करणाऱ्या हातांना –
कोणी चटके द्यावे की फुकंर घालावे…?

अनेकविध शंका धर्म निभावतांना याव्यात..?
कली युगाच्या युक्ती प्रमाणे…
धर्म करा आणि चावडी चढा .
जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात….
तेव्हा वाटतेच की…
सत्कर्मांची फेड कोणीही –
सत्कार करुन करीत नाही.
तर तिरस्कार करुन करतात.

मग कारे देवा..!!
तुझा धर्म कुठे लपणार..?
अधर्मच आता बोकाळणार..!!
तु तर अंधळाच असतो जीवनभर.
तुला जाग येते भक्तांच्या शेवटच्या क्षणी.
भक्तांचे प्राण येतात तेव्हा नयनी…!!

ते क्षण,वाट पाहणारे फार थोडे आहेत रे..!
ह्या त्रासाला कंटाळून जमिनीत दडणारे फार आहेत रे..!
तुकोबांना सारेच ओळखतात.
तुकोबांची सहनशीलता कुणाकडे नाही रे..!
काय ही अवस्था तुझ्या कलीमधील भक्तांची..!
देव तर समजतो पण देवा पर्यंत जायला धिर निघत नाही रे……!!!

श्री स्वामी समर्थ.श्री नरहरी महाराज.

सौ ज्योतीताई दुसाने
पाचोरा.साईपार्क.
गिरना पंपिंग रोड पाचोरा …
दि २१/३/२०२४ गुरुवार.