भेट

भेट

भेट

💕💕💕भेट💕💕💕
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
******************************

होते अचानक जेव्हा
दोन  मित्रांमध्ये  भेट…
मन  उल्हासात  दौडे
       भीडे काळजात  थेट………..1

मग  वर्तमान  काळी
खातो भूतकाळ गोते…
विरलेल्या  आठवांचे
       मस्त  झटकतो  पोते………..2

प्रश्न  दोघांचाही एक
कसं काय  बरं आहे…?
व्यथा दडवीती  दोघं
       हेच  मात्र  खरं  आहे………..3

जरी    रिटायर   तरी
पेन्शनही  सुरू आहे…
अर्धा भरलेला खिसा
       तोच सध्या  गुरु आहे……….4

घेती   उधारीने  शब्द
म्हणे,ऑल वेल आहे…
पण अंतरीचा आत्मा
       त्यांची  घालमेल साहे……….5

होई    उराउरी    भेट
कड  रडवेली  झाली…
दिली  पायखुटी  तरी
       सल  पापणीत आली……….6

एक  दुसऱ्याला  पुसे
आहे खरं का रे  मस्त …?
गड्या  चटणीला तेल
       आहे आसवांचं स्वस्त ………7

लागे  मनामधी  आग
विझवाया अश्रू आले…
दोघांचेही   आश्रमात 
       म्हणे  स्थलांतर झाले……….8

¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥¥
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कवी…प्रकाश जी पाटील(पिंगळवाडे)
=======================