चला जाऊया गड किल्ल्यांव वर्धनगड
वर्धनगड किल्ला
वर्धनगड भाग-०१
चला जाऊया गड-किल्ल्यांवर
(वर्धनगड भाग-०१)
नानाभाऊ माळी
छातीची केली होती ढाल
लढले शत्रूचा बनूनी काल
उंच मारीला होता भाला
भगवा फडकवीत होते लाल!
सह्याद्री मावळा होता शूर
करुनी शत्रूवरती चाल
खणखण चालल्या तलवारी
शत्रूचें केले होते हाल…!
तुफान कधी न हो थांबलें
दुश्मनास ठोकली होती नाल
कातळ किल्ला जिंकला होता
चतुर खेळली होती चाल…!
शत्रूवर केले होते प्रहार
महाराष्ट्र भगवा धन्य झाला
मावळे मर्द लढले होते
शौर्याने किल्ला काबीज केला
कणखर कातळावरती हिंदवी भगवा फडकत होता!तेव्हा स्वराज्यासाठी अग्नी तो हृदयात भडकत होता!किल्ल्याच्यां बुरुजांवरती तोफांचें गोळे धडकत होते!ढालीवर तलवारी त्वेशाने खडकत होत्या!स्वअस्तित्वासाठी मावळे शूर लढत होते!विशाल सह्याद्रीसाठी राजे लढत होते!घोरपडीला दोर बांधून किल्ल्यावर चढत होते!प्राणांची बाजी लावुनी शत्रूशी लढत होते!हिंदवी स्वराज्यासाठी सारे सारे दिव्य घडत होते!
मावळ्यांनी लढता लढता प्राण गमविला होता!बलिदान करता करता किल्ला जिंकून दिला होता!मावळ्यांची स्वामी भक्ती,राज्यभक्ती, देशभक्ती प्राणाहून मोठी होती!विशाल होती!महान होती!शूर मावळे लढले होते!हृदयातल्या लढवय्यांना वीर मरण आले होते!शूरवीरांच्या, लढवय्यांच्या,साथीदारांच्यां बलिदानाने छत्रपती शिवाजीराजे अंतःकरणी दुःखी झाले होते!जीवाहूनही जवळचें मित्र,सखा गमावला होता!राजांनी एकांती अश्रू ढाळले होते!दुःख छातीत दाबून ठेवले होते!हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान पुण्य होतं!राजे हतबल झाले नव्हते!मावळ्यांमध्ये मातृभूमीचा जोश भरला होता!
दररोज जिंकता जिंकता मरणावर स्वार झालेल्या राजांच्या अंगी भगवं वादळ संचारलं होतं!देवभूमीच्या रक्षणासाठी, आई-बहिणींच्या रक्षणासाठी, प्राचीन संस्कृती रक्षणासाठी अस्तित्वाची लढाई होती!मंदिराच्या रक्षणाची लढाई होती!अनेक शूर विरांनी बलिदान दिले!तें व्यर्थ जाऊ नये म्हणून ‘जिंका किंवा मराची’ हाक दिली होती!प्रचंड त्वेशाच्या अग्नीत शत्रूसं जाळले होते!स्वराज्याची चिनगांरी चौफेर भडकत होती!राजांच्या शत्रूभेदक कुटनीतीनें सह्याद्री जागा झाला होता!जंगलं-खोरे तोफा, तलवारी,ढाली युद्ध दनाणून गेल होतं!शूर मावळे शत्रूचा कर्दनकाळ बनलें होते!
बरोब्बर खिंडीत गाठून शत्रूला गारद करीत होते!शत्रूचा निप्पात करीत होते!सळो की पळो करून सोडत होते!यमसदणी पाठवत होते!शत्रूच्या मनात प्रचंड धडकी भरली होती!दहशत बसली होती!दुश्मनाला अद्दल घडवीत होते!घनदाट जंगलातील पर्वताच्यां उंच शिखरावरील किल्ला मावळे जिंकत होते!’छत्रपती शिवाजीराजे’ नावाच्या प्रचंड विशाल वादळानें शत्रूला यमसदणी पाठविले होतें!छत्रपती शिवाजीराजे हिंदवी स्वराज्याचीं भक्कम बांधणी करीत होते!
सह्याद्रीसिंह छत्रपतींनी गुप्त मोहिमा आखून बलाढ्य,ताकदवर शत्रूचा पराजय केला होता!साम, दाम,दम, दंड,बुद्धीने काटा काढून रयतेच्या काळजाचं राज्य स्थापन केलं होतं!शिवाजी राज्यांचं संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेलं!आराम, विश्रांती नव्हती!जिंकणे,तह करणे,लढून पुन्हा किल्ला जिंकणे हेचं त्यांचं आयुष्य बनलं होतं!रयतेच्या राज्यासाठी लढणाऱ्या छत्रपती राजांमुळे अवघा महाराष्ट्र घुसळून निघाला होता!
सह्याद्रीच्या कडे-कपारी,कृष्णा,कोयना,पवना, इंद्रायणी अशा अनेक खोऱ्यातून, घनदाट जंगलातून सिंहासारखे गड-किल्ले जिंकत राहिले!छत्रपतींच्या भीतीने दिल्ली तख्त हादरले होते!तख्त मागे सोडून दक्षिणेत आलेला मुघल बादशहा पुन्हा दिल्लीत पोहचला नव्हता!मोघलांना प्रचंड दहशत बसविली होती! औरंजेबाच्या मनात शिवछत्रपती राजांविषयी नेहमीचं भीती होती!दक्षिणचा सिंह दिल्ली सलतनत पर्यंत येण्याची भीती होती!
राजांनी एक नाही,दोन नाही तब्ब्ल ३५० किल्ले आपल्या अधीपत्याखाली आणले होते!असा चतुर,शूर,पराक्रमी, प्रजाहितकारी,लढवय्या राजा महाराष्ट्र भूमीत जन्माला आला होता!सह्याद्री रांगेत,कोकणात,खान्देश,मराठवाड्यात भगवा फडकवत ठेवला होता! सह्याद्री कुशीतील सातारा जिल्ह्यात अनेक गड-किल्ले आहेत!छत्रपती शिवरायांनी अनेक भक्कम किल्ले
बांधले,दुरुस्त केलेतं!
त्यातील एक “वर्धनगड”…वर्धनगड गावाच्या पायथ्यापासून किल्ल्यावर जाता येतं!छत्रपती शिवरायांनी बांधलेला अन राजांनी काही काळ व्यास्तव्य केलेला वर्धनगड पाहायला गेलो होतो!धाडसने सर करायला गेलो होतो!आम्ही ‘चला जाऊया गड-किल्ल्यांवर’चें मुख्य आयोजक आदरणीय श्री.वसंतराव बागुल सरांच्या सोबत गेलो होतो!एकूण ८५ मावळ्यांना घेऊन दोन बसेस दिनांक ३०जून २०२४ रोजी पहाटे ५-३० वाजता चंदननगर, पुण्याहून निघाल्या होत्या!
दोन्ही बसेस एकमेकांचां पाठलाग करीत हडपसर, दिवे घाट, सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा, लोणंद, वाठार, सातारा रोड, कोरेगावमार्गे पुढे वर्धनगडावर गेलो होतो!वर्धनगडगाव गडाच्या पायथ्याशीचं आहे!भारतीय प्रत्येक माणसाच्या मनामनावर राज्य करणाऱ्या छत्रपती राजांनी बांधलेल्या किल्ल्यावर गेलो होतो.
वर्धनगड किल्ला भाग-०२
चला जाऊया गड-किल्ल्यांवर (वर्धनगड भाग-०२)
नानाभाऊ माळी
गढी-दुर्ग-गड-किल्ला या शब्दांची ओढ कित्येकांना लागून राहिलेली असतें!ही औत्सुक्याचीं ठिकाणं आहेतं!स्मृती स्थळं आहेत!किल्ला शब्दात ताकद आहे!प्रतीकं आहेत स्वाभिमानाची!शक्ती अन अस्तित्वाला जन्म देणारे गड-किल्ले मानवी मनाला आतून ओढतं असतात!मन किल्ला चढत असतं!किल्ले ऊर्जास्रोत वाटतात!इतिहासातील खोल हुंकार वाटतात!राजकीय साठमारीचीं ठिकाणं वाटतात!कट कारस्थानाची ठिकाणं वाटतात!प्रजेवर वचक ठेवणारी केंद्र बिंदू वाटतात!कधी ओरबाडलेली, बळकावलेली राजसत्तेची मुकी केंद्र वाटतात!राजमहालातल्या नाते-गोते संबंधांचीं… कपट,कट करस्थान, हेवेदावे,बंडखोरीची लागण लागलेली सडलेली मने भक्कम किल्ल्यातून जाणवत असतात!कधी आत्मिक हुंकार फुटत असतो!भक्कम भिंती फोडून चव्हाट्यावर आलेला दिसतो!
वर्चस्ववाचीं गुपित मसलत येथूनच झाली असावी!बुद्धीचातुर्याचं गुप्तगू येथेच रंगलं असावं!भक्कम तटबंधींच्या आत,उभ्या बुरुजांच्या आत दबलेले-दाबलेले अनंत हुंकार ऐकल्याचा भास होत असतो!जिंकणे, हारणे,लढणे!लढाईत मरणे-मारण्याची मूकसाक्ष असणारे किल्ले आजही गुपित कोडे वाटतात!किल्ल्यातील कित्येक ठिकाणं,तळघरं छळ छावणी वाटते!बंडखोरीची लागणं येथूनच सुरु झाली असावी!डावपेच,कब्जा अन मुत्सद्दीगिरी अनुभवलेले किल्ले गुमनाम वाटत असतात!खंडंर वाटत असतात!टकमक टोक डोळ्यासमोर दिसत असतं!तरीही…किल्ले आश्वासक वाटतात!गत इतिहास जाणून घ्यावासा वाटतो!आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊन उभी आजही आपले अवशेष अंगावर घेऊन उभे आहेत!
कित्येक पिढ्याचं वैभव अनुभवलेले किल्ले आता जीर्ण-शिर्ण,ढासळलेले, पडके वाटत असलें तरी नवीन कात टाकत आहेत!किल्ल्याच्या अनंत खाणाखुणा बोट धरून गत इतिहासाकडे नेत आहेत!आपण त्या खाणाखुणातं डोकावून पाहतो तेव्हा इतिहास जीवंत झाल्याचीं जाणीव होऊ लागते!छत्रपती शिवाजीराजांचीं पवित्र पाऊले दिसू लागतात!
त्यांचा पराक्रम दिसू लागतो!विपरीत परिस्थितीतं जिंकलेली लढाई दिसू लागते!प्रतापगडावरील महाप्रताप दिसू लागतो!अवघ्या १५ दिवसात सह्याद्री शिखरावर भगवा फडकू लागतो!आदिलशाहीतील किल्ले जिंकत मानदेश दिसू लागतो!चंदन-वंदनगड, वर्धनगड किल्ला जिंकलेला दिसू लागतो!डोळ्यासमोर सह्याद्री दिसू लागतो!त्याची उंच शिखरं दिसू लागतात!मर्द-लढवय्ये मावळे दिसू लागतात!आपण इतिहासाची इतिहाचीं पानं चाळू लागतो अन अंगात वीरश्री संचारल्यागत तलवारीचीं मूठ आवळू लागतो!
हाताची मूठ घट्ट होऊ लागते!अंगातलं रक्त सळसळू लागतं!’जय भवानी,जय शिवाजी’ गर्जना ऐकू येते!घोड्यांच्या टापांचा आवाज कानी पडू लागतो!अंगात शूर मावळा संचारतो!सर्व शक्तिनीशी अवतरु लागतो!…
…….आमच्या हातात तलवार-ढाल आहे!समशेरी आहेतं!समोर शत्रू दिसतो आहे!आम्ही मावळे हजारोनीं आहोत!शत्रू लाखांनीं आहेतं!… आमच्या अंगात जोश आहे!अंगात रक्त सळसळतं आहे!हातातली तलवार शत्रूवर उपसतो आहोत!सपासप वार सुरु होतो!किल्ला दानानून जातो!मरण समोर आहे!शत्रू तोंडावर आहे!आता घाबरणे नाही!मारूनच लढाई लढणे आहे!लढून जिंकणे आहे!शत्रूवर तुटून पडण्यासाठी डोळ्यात रक्त उतरलं आहे!त्वेश अंगात संचारला आहे!शत्रूला यमसदणी पाठवतो आहोतं!आत्मिक बळ अंगात संचारलं आहे!दोन्ही हातात तलवारी घेऊन वार सुरु आहेत!अंगात वारं संचारलं आहे!
अंगात छत्रपती शिवरायांविषयी निष्ठा भक्ती अन बळ आहे!आता फक्त बलिदान….नाहीतर विजय हेचं साध्य आहे!मरणावर स्वार होऊन शत्रूवर तुटून पडलो आहोत!शत्रू रक्ताच्या थारोळ्यातं पडला आहे!भक्कम पावलं पुढे सरकत आहेत!घनदाट जंगलातील मावळ्यांनी किल्ल्याची उंच दगडी तटबंदी फोडली!
किल्ल्यात प्रवेश केला!किल्ल्याच्या बुरुजांवर तोफ डागली!महादरवाज्यावर तोफ डागली!धडाम!!!धडाम!!आवाज होऊ लागला!शत्रू सैरावैरा पळतो आहे!किल्ल्यावरून उडी मारून जीव वाचवायचा प्रयत्न करतो आहे!लढवय्ये मावळे लढत आहेत!’हर हर महादेव’ गर्जना होत आहे!त्वेशाने, शक्तीने,एकजुटीनें लढणाऱ्या मावळ्यांनी किल्ला काबीज केला! किल्ल्यावर भगवा ध्वज फडकू लागला!मावळ्यांच्या एकमुखी शिवगर्जनेने किल्ला दनानून गेला “छत्रपती शिवाजी महाराज की जय!”.
…. महापराक्रमी राजा छत्रपतीनीं बांधलेला ‘वर्धनगड’ सर करण्यासाठी गेलो होतो!पराक्रमाची साक्ष देणाऱ्या वर्धनगडावर चढत होतो!हातात भगवा ध्वज होता!३० जुनच्या रविवारी किल्ला वर चढत होतो!हातात तलवारी नव्हत्या!भगवे झेंडे हाती फडकत होते!पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावापासून मोहिमेला सुरुवात केली होती!समुद्रसपाटी पासून १०४०मिटर उंचावर असलेल्या,सह्याद्रीच्या अनेक डोंगरांपैकी एका उंच डोंगरावर वर्धनगड किल्ला आहे!वर्धनगड गावापासूनचं पायऱ्यांना सुरुवात होतें!गावाच्या वेशीसमोर दोन भव्य तोफा ठेवलेल्या आहेत!वर्धनगड किल्ल्यावरील या तोफा सर्वांच स्वागत करतांना दिसतात!निम्मे अंतर पार करेपर्यंत चांगल्या सिमेंटच्या पायऱ्या होत्या!पुढे शिवकालीन दगडी पायऱ्या होत्या!३५० वर्षं मागे गेली!किल्ल्याच्या पायऱ्या तशाच आहेत!दगडं निखळलेले होते!एक एक पावलं जागा शोधून पुढे पडत होते!शिवगर्जना सुरु होती!
गडाच्या बुरुजापाशी पोहचलो!मुख्य बुरुज गोमुखी होता!शत्रूला भुलभूलय्या करेल असा होता!थोडा वळसा घेऊन पुढे गेलो!मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडलं!शत्रूला चकवा देण्यासाठी हा भुलभूलय्या होता!छत्रपती शिवाजीराजेंच्या स्थापत्य शास्त्रीय दृष्टी दूरदृष्टीचीं होती!त्यासाठी हा अवघड बुरुज बांधला असावा!बुरुजाला लागून किल्ल्यासभोवती साधारण तीन किलोमीटरचीं भक्कम दगडी तटबंदी बांधलेली दिसली!आम्ही महाद्वारासमोर उभे होतो!मोठं मोठ्या दगडातं भक्कम बुरुज बांधलेला दिसला!दरवाजा अलीकडच्या काळात बनवला असावा!बुरुजाच्या खाली दरवाजा आहे!बुरुजाआत पाहरेंकऱ्यांसाठी एक देवळी बांधलेली दिसली!..आम्ही पुढे निघालो!तीव्र चढ संपला होता! हळूहळू महादेव मंदिरासमोर आलो!मंदिरं जुनं असावं!गाभाऱ्यात जाऊन पिंडीचं दर्शन घेतलं!बाहेर नंदीच दर्शन घेतलं!शेजारी दगडाची दिपमाळा होती!शेजारी पाण्याचं टाकं दिसलं!त्यात भरपूर पाणी होतं!आम्ही जोशात एकमुखी गर्जना ‘हर हर महादेव’ अशी गर्जना केली!आमची मोहीम पुढे निघाली होती!
घनदाट जंगलातून मार्ग काढीत पुढे निघालो होतो!एका उंच झाडापलीकडे मारुतीचं मंदिरं दिसलं!मूर्ती प्राचीन होती!मंदिर अलीकडे बांधलं असावं!आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो!जाता जाता मध्येच चुन्याच्या घाण्याचं दगडी चाक पडलेलं दिसलं!कदाचित बैलांच्या साह्याने चुण्याचा घाना चालवून किल्ल्यासाठी चुना
वापरला असावा!पुढे पुन्हा शिवकालीन पायऱ्यांवरून पुढे जात होतो!उंच उंच घनदाट झाडांनी किल्ला व्यापलेला दिसला!पायऱ्या चढत असतांना पावसाच्या सरीनीं भिजवायचा प्रयत्न केला!टिपटीप भिज पाऊस सुरूचं होता!किल्ल्याच्या मध्यभागी उंच टेकडावर मंदिर दिसलं!वर्धणीमातेचं हे प्राचीन मंदिरं असावं!वर्धनगड गावाची ग्राम दैवत असलेली देवी भक्तांना पावते असा गावातील लोकांची श्रद्धा आहे!मंदिरात जाऊन दर्शन घेतलं!तेथे पुजाऱ्यांनी मातेची सेवा केलेली होती,त्याचं समाधी मंदिरंही शेजारी बांधलेलं दिसलं!तेथे जाऊन दर्शन घेतलं!आमच्यावर पावसाची मेहरनजर होती!ढगांनी गर्दी केली होती!काही काळ आम्ही देखील ढगांच्या गडद उर्वरित महत्वपूर्ण भाग-०३मध्ये पाह.
वर्धनगड भाग-०३
चला जाऊया गड-किल्ल्यांवर (वर्धनगड भाग-०३)
बालपणी शाळेच्या बालभारती पुस्तकातील कवितेच्या काही ओळी अजूनही आठवतात!आठवून गुणगुणत असतो!हृदयात जाऊन बसलेल्या या ओळी शूर मर्दाचां, लढवंय्याचां इतिहास सांगत असतात!….’खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या!!!…
…. उडवीन राई राई एवढ्या!’
या गर्व अन गौरवपूर्ण ओळी मनाला जागे करीत असतात!देशभक्तीची स्फूर्ती देत असतात!
छत्रपती शिवबांच्या पवित्र पावन भूमीत,महाराष्ट्र देशात जन्मलो, आम्हास अभिमान वाटतो!आपण पोवाडे, शौर्य गीतातून,गौरव गीतातून छत्रपतीं शिवरायांना वंदन करीत असतो!त्यांच्या समोर नतमस्तक होत असतो!अभिवादन करीत असतो!स्फूर्ती घेत असतो!त्यांच्या तेजस्वी मूर्तीचं अंतःकरणातून स्मरण करीत असतो!त्यांचं गगनाहून विशाल कार्य हृदयात साठवीत असतो!छत्रपती शिवाजीराजे नसते तर आपण कोण राहिलो असतो बरं ? कल्पना करवत नाही!
आपण शक्ती-भक्तीने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत जन्मलो!महाराष्ट्र देशात वाढलो!आम्हाला अभिमान वाटतो!छत्रपतींच्या पौलादी शौर्य शक्तीने,संतांच्या पवित्र उपदेशांनें,ज्ञानोबा-तुकोबांच्या अध्यात्मिक भक्तीने महाराष्ट्र कणखर बनलेला आहे!महाराष्ट्र देशाची भक्ती-शक्तीचीं,आध्यत्मिक वाटचाल प्राचीन काळापासून सुरूचं आहे!छत्रपती शिवराजे यांच्या पावण स्पर्शाने पुनीत,सह्याद्री पर्वतरांगा धन्य धन्य झालेंल्या आहेत!शौर्याची गाथा गात उभ्या आहेत!त्याकाळी अनेक किल्ल्यांचं भाग्य उजळलं होतं!
छत्रपती शिवरायांनी शौर्य गाजवलेल्या किल्ल्यांवर जाण्याचं भाग्य आम्हा सर्वाना लाभलं!पावण भूमीची पवित्र माती मस्तकी लावण्याचं भाग्य लाभलं!अशाचं एका दूर्ग किल्ल्यावर आम्ही गेलो होतो!आम्ही ३० जून २०२४ रोजी ‘वर्धनगड’ किल्ल्यावर गेलो होतो!महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावर गेलो होतो!….
गड किल्ले दूर्ग उभे
देती स्फूर्तीची ग्वाही
खात्री होती जगण्याचीं
सांगती दिशा दहाही…..
सह्याद्रीचां सिंह शिवाजी
साडे तीनशे किल्ले हाती
घोडदौड रोजचीं होती
शिवपोवाडे शाहीर गाती..
शत्रू संकट उभे ठाकती
… निप्पात त्यांचा केला
हर हर महादेव गर्जती
…. किल्ला हाती आला..
प्रजाप्रिय शिवराजांच्यां
… भगव्याची होती छान
वर्षं साडेतीनशे राज्याभिषेक
..आम्ही गर्वाने गातो गाण!
चाळीत असतो पुढूनी मागे
इतिहास उघडूनि पान..
आलेतं गेलेत कित्येक येथूनी
गड किल्ले आमुची शान….
छत्रपती शिवराजांच्या वास्तव्याने पुनीत वर्धनगडावर गेलो होतो!… किल्ल्याच्या अभ्यद्य तटबंदीतून अनेक छोटे मोठे चौकोनी आकाराचे बोगदे दिसतात!कदाचित तोफगोळं डागण्यासाठी बनवली असावीत! संरक्षणाच्या दृष्टीने काळजी घेतलेली असावी!अखंड चिरेबंदी दगडं रचून मजबूत तटबंदी बांधलेली दिसते!आत अनेक पाण्याचे टाके आहेत! किल्ल्यातून गुप्तपणे बाहेर पडण्यास तटबंदीच्या आतून चोर रस्ते काढलेले दिसतात!साधारण चार फूट बाय पाच फुट दगडी चौकोणी चोर रस्त्यातून बाहेर पडल्यावर खोल दरी दिसते!कोणाच्याही नजरेत येणार नाहीत असे तें दोन गुप्त चोर रस्ते आहेत!!छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पक दूरदृष्टी चा हा महत्वपूर्ण हिस्सा होता!
वर्धनगड किल्ला शत्रुवर नजर ठेवण्यासाठी हा टेहळणी बालेकिल्ला बांधला असावा!किल्ल्याच्या उंच शिखरावर पोहचलो तेव्हा पावसाची फवारणी सुरु होती!वारा ही सुटला होता!आम्ही किल्ल्याच्या तटबंदी आतून फिरत होतो!पाऊस, थंडी उन्हाळामुळे झिज झालेली तटबंदी अनेक ठिकाणी ढासळलेली दिसत होती!पडझड झालेली दिसते!तटबंदीचे प्रचंड मोठे दगड किल्ल्या बाहेरील पर्वत उतारावर अडकलेंली दिसली!
आदिलशाहीच्या अफझलखान वधानंतर सह्याद्री रांगेतील जवळपास सर्वचं किल्ले शत्रूला गारद करून शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले होते!प्रतापगडापासून पन्हाळा, तें वर्धनगड पर्यंतचें सर्व किल्ले ताब्यात आली होती!खटाव मान तालुक्यातील पर्वत रांगेतील हा किल्ला कोरेगाव पासून जवळ आहे!किल्ला कदाचित पुरातत्व विभाग अन फ़ॉरेस्ट खात्याच्या ताब्यात असल्याने अनेक फलक लावलेले दिसतात!अनेक वन्य प्राणी, पक्षांविषयी तीं माहिती आहे!
वर्धनीमातेच्या नावाने परिचित वर्धनगड किल्ला निसर्गसंपत्तीने श्रीमंत आहे!किल्ल्यावर चौफेर नजर टाकावी तिकडे हिरवाईची मुक्त्तहस्त उधळण दिसते!उंच गडावरून दूरवर नजर टाकावी तिकडे लांबवर अनेक पर्वतरांगा दिसतात!घनदाट जंगलं दिसतं!खोल जमीन दिसते!खोल खोऱ्यात लहानमोठी अनेक गाव-खेड वसलेली दिसतात!असा हा निसर्ग अविष्कार डोळ्याने पित राहावासा वाटतो!छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत निसर्गाचं सुंदर ताट वाढून ठेवले आहे!आम्ही मनसोक्त आनंद घेत आहोत!…
निसर्गाचा अनमोल ठेवा जपून ठेवण्यासाठी त्याकाळी शिवाजी महाराजांनी कष्ट उपसले,प्राचीन धनसंपदा जपून ठेवली!प्राचीन संस्कृती जपून ठेवली!निसर्ग देव असतो हे सांगितलं!निसर्गदेवता किल्ला रूपात नजरेस पडतं आहे!त्याचें रक्षण करणारे राजे होते म्हणून प्राचीन गड-किल्ले आपले वाटतात!आपले आहेत म्हणून किल्ले सर करण्यासाठी अनेक शूर मावळे जात आहेत!आम्ही वर्धनगड पाहिला!निसर्ग डोळ्यात भरून घेतला!साहस अन पर्यटनातून ‘जगणे’ शिकायला गेलो होतो!
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८९९९५४६
दिनांक-११ जुलै २०२४
.
खूप छान लिहीत आहात सर… या कामासाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन जय शिवराय 🙏🚩😇💐
Pingback: मांजरसुंभा किल्ला - मराठी