मृगजळ the deer
मृगजळ
“””””””””””””””
मृगजळ होतं.
धावत होतो,
ज्याच्या मागे मागे.
भ्रांती फिटता,
डोळे उघडता.
हाती काही न लागे.
नात्यांचेही,
असेच आहे.
तकलादू हे धागे.
धक्के खातो,
फसविला जातो.
होशील कधी जागे ?
सख्य करुनी,
गळे कापती.
जो तो ऐसा वागे.
दुनियादारी,
अशीच असते.
कां जगता रागे रागे ?
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगाव.