अभंग संत मुक्ताबाई
अभंग संत मुक्ताबाई
काळीज माझ साहित्य आयोजित भक्तिभाव पंधरवडा विशेष उपक्रम अभंग लेखन
![संत मुक्ताबाई](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/07/fb_img_1720161945679836668620909183519-704x1024.jpg)
संत मुक्ताबाई
विषय = संत मुक्ताबाई
शीर्षक = मुक्ताई
लाडाची लाडकी | मुक्ताई माऊली |
भावांची सावली | मुक्ताबाई ॥१॥
रुक्मिणी ची लेक | बा विठ्ठलपंत |
झाले भाग्यवंत | पुत्रीप्राप्त ॥२॥
तीन भावडांच्या | पाठीवर झाली |
घरी ताई आली | कन्यारत्न ॥३॥
सन्याशाची मुले| हिणवत गेले |
दुख हे सहिले | अन्यायास ॥४॥
मुक्ताईने दिला | मंत्र हा शिष्यास |
लाभले भाग्यास | संतगण ॥५॥
ज्ञानाची कवडे | बंद केले आत |
मुक्ता हाक देत | ज्ञानोबास ॥६॥
मुक्ताई नगरी | समाधी घेतली |
अमर ती झाली | खान्देशात ॥७॥
ठेवूनिया माथा | मुक्ताई चरणी |
एक चित्त ध्यानी | लागे मन ॥८॥
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक =०५-०७-२०२४
![संत मुक्ताबाई](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/07/fb_img_17201619055035593057359440928060-794x1024.jpg)
संत मुक्ताई
काळीज माझं साहित्य आयोजित भक्ती भाव पंधरवाडा विशेष उपक्रम दिनांक 6 जुलै 2024 शुक्रवार
विषय_||संत मुक्ताई|| शीर्षक_||मुक्ताबाई||
बा विठ्ठल पंत|मा रुखमाबाई|
त्यांच्या पोटी येई|चौघेजण||१||
तीन पुत्र त्यांचे|चौथी मुक्ताई|
माता पिता जाई|स्वर्गवासी||२||
चारही भावंड|धरूनिया हट्ट|
ब्रह्मविद्या पाठ|निरंतर||३||
विश्वाचा उद्धार|मुक्ताई शिकवी|
पासष्टी दाखवी|शिकवून||४||
आठव्या वर्षीच|चांगदेवा ज्ञान|
दिली शिकवण|मुक्ताईने||५||
गोरक्षनाथ हा|आशीर्वाद देई|
संत मुक्ताबाई|कृपावंत||६||
अमृताची धार|प्राप्त संजीवनी|
आत्मसात मनी|करोनिया||७||
तापी नदीकाठी|वीज चमकली|
मुक्ता लुप्त झाली|देव वाशी||८||
कवी अशोक गुट्टे सालेगावकर हिंगोली
![संत मुक्ताबाई](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/07/fb_img_17201619613458009901669266250356-694x1024.jpg)
संत मुक्ताबाई माउली
वडील विठ्ठल l
रुख्मिणी माउली ll
चौघात धाकली l
मुक्ताबाई ll१ll
श्री विठ्ठलपंत l
सोडून सन्यास ll
संसारी प्रवेश l
त्यांनी केला ll२ll
कर्मठ लोकांनी l
सन्याश्याची मुले ll
सदा हिणविले l
भावंडाना ll३ll
जगाचा निरोप l
मातापिता घेई ll
झाली मग आई l
मुक्ताबाई ll४ll
ज्ञान भक्ती मुक्ती l
रूप विरक्तीचे ll
गुण भावंडांचे l
हि मुक्ताई ll५ll
चांगदेव पाही l
मुक्ताईचे ज्ञान ll
गर्वाचे हरण l
त्यांच्या झाले ll६ll
छोट्या मुक्ताईचा l
अनुग्रह घेई ll
धन्य त्यांचे होई l
दीर्घायुष्य ll७ll
स्त्री संत मुक्ताई l
कार्य मोठे तिचे ll
विश्व उद्धाराचे l
अलौकिक ll८ll
क्रोधीत ज्ञानाला l
विनविले तिने ll
ताटी अभंगाने l
भल्यासाठी ll९ll
आद्य कवयित्री l
संत मुक्ताबाई ll
विजेच्या प्रवाही l
लुप्त झाली ll१०ll
संतांचे विचार l
जीवनाचे कार्य ll
दाखवी पर्याय l
जगण्याचा ll११ll
सदर रचना माझी स्वरचित आहे.
© ® श्री.प्रकाश भि पाठक,
छत्रपती संभाजी नगर
(८३७८८७८८२१)
![](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/07/fb_img_17201617697081128893597112292059.jpg)
बहीण मुक्ताई
शीर्षक : बहीण मुक्ताई
संत मुक्ताबाई । धाकटी बहीण l
सर्वात लहान । भावंडात ।।१ll
ज्ञानेशांना बोध । दिला अभंगात ।
ताटीच्या शब्दात । मुक्ताईने ।।२ll
ज्ञानबोध ग्रंथ । लिहिला स्वकरू ।
चांगदेवा गुरू । मुक्ताबाई ।।३ll
ब्रह्मगिरी फेरी । अल्पवयी केली ।
ज्ञानेशांनी दिली । सनद ती ।।४ll
मांडे भाजताना । जेंव्हा पाहियले ।
शरणची आले । विसोबा ते ।।५ll
गोरक्षनाथांनी । कृपावृष्टी केली ।
प्राप्त त्यांना झाली । संजीवनी ।।६ll
तीर्थयात्रा वेळी । वीज कडाडली ।
प्रवाहात झाली । लुप्त मुक्ता ।।७ll
तापी नदीकाठी । मुक्ताईनगर ।
समाधी शहर । मुक्ताईचे ।।८ll
मुक्ताई पालखी । विठ्ठल भेटीला ।
दर आषाढीला । नित्य जाते ll ९ll
प्रकाश महामुनी बार्शी
मुक्ताई
मुक्ताई
चौघे ही भावंडे |वारकरी संत|
थोर हे महंत| महाराष्ट्री|१|
संत मुक्ताबाई| लहान बहिण|
निवृत्ती सोपान| ज्ञानेशाची२|
थोर कवयित्री |अभंग लिहिले|
ज्ञान मुक्ताईले |अलौकिक |३|
विनवणी केली| ताटी उघडावी|
विनंती ऐकावी| ज्ञानदेवा|४|
पाठीवर मांडे| भाजले दिव्यांने|
किती सामर्थ्याने |खरोखर|५|
चांगदेवाचाही| गर्व घालवला|
गुरुच मानला |मुक्ताईस|६|
भावंडा साठीच| झाली मुक्ता आई|
खरी मुक्ता बाई| थोर संत|७|
अंगीकारावी ती| संत शिकवणं|
मिळे समाधान |अनु म्हणे|८|
सौ अनुराधा रत्नाकर उपासे
मंगरुळ ता तुळजापूर.
Pingback: संत ज्ञानेश्वर - मराठी 1
Pingback: पांडुरंग मराठी अभंग - मराठी 1