रक्षाबंधन
…….सांगावा…….
आली श्रावणात आली
आली राखीची पुनवं
आली राखीची पुनव
सवे घेऊनी आठवं ॥धृ॥
दाट दाटले मनात
आठवं ते साठवावं
माहेराचं धन आता
भाऊ वहिनीचं गावं॥१॥
सोनियाच्या स्वरांमधे
भाव गीत ते गुंफावं
अन् राखीच्या धाग्यात
सारं सारं साठवावं॥२॥
पंख टपाल खात्याने
माझ्या राखीला अर्पावं
सखी बाई माझी राखी
हिने माहेर गाठावं॥३॥
भाव भरलं कुशल
माझं कथन करावं
औक्ष चिंतिते बहिण
बंधु राजास सांगावं॥४॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.