Pavsachi Kavita पाऊस रंग
🌿पाऊस रंग 🌿
🌷जुनी रचना, परिस्थिती तीच 🤨
पाऊस रंग
गडद आभाळात
चिंब धरणी
बळीचे दुःख
शिवारच बुडाले
सांगेल कुणा?
गुरे कोरडे
बाहेर महापूर
हंबर सुका!
पिल्ले घरात
घर थेंबाळलेल
भांडी भांडती.
वेळ काळाचा
संबंध तुटलेला
गर्द मळभ.
कंबर कसा
लागा आता कामाला
वेळ कुणाला?
कसं व्हायचं?
स्मशान तयारीला
दुसरे काय?
🤨कवी🤨
मझिसु ✍️🌷प्रा. मगन सुर्यवंशी
