पंचवटी रामकुंड
🚩🚩👏🏼🚩🚩
***************
… नानाभाऊ माळी
राम पहाटे उठूनी
मला भेटतो राम नाम
दमून थकून निघतो घाम
राम करुनी घेता काम…!🚩
देवी सीता माय….
जगी आदर्शची शाळा
राम घेऊनि हृदयाशी
आई लावीतसे लळा..! 🚩
सीता माईचे राम
जग कोरीत गेलं नाव
राम राम पेहरीत
उगवती पवित्र गावं…!🚩
रामामृताचा पेला मुखे
जग पिवूनी घेती राम
सत मार्गाची संजीवनी
दुप्पट देती राम दाम…!🚩
राम नामाचा रस्ता कठीण
अश्रू डोळे धुवूनी देती..
राम रस्ते चालत चालत
पवित्र तुळशी पाने वाहती!🚩
सर्व सर्व ‘त्याला’ समर्पित करणे!स्वार्थ त्याग करणे!लोभाच्या पायरीवरून वेळीचं सावध होत खाली उतरणे!हे राम प्राप्तीचं अमृतऔषध आहे!श्रीराम वनवासात असतांना गोदाकाठी पंचवटीत होतें अशी प्राचीन श्रद्धा आहे!श्री.लक्ष्मण अन सीतामय्या सोबतीला होतें!त्यांच्याचं पद स्पर्शाने पूनीत झालेली नाशिक भूमी आहे!नाशिकला कुंभमेळा भरत असतो!पंचवटी,रामकुंड अलौकिक श्रदस्थळ आहेतं!रामकुंड अमृतस्थळ आहे!येथे भक्तीआनंद हृदयात उतरत असतो!अंतःकरण स्वच्छ धुतलं जातं असत!चांगलं घासलं जातं असतं!चकचकित,शुद्ध अंतःकरण देवस्पर्श करून देत असतो!🚩

गोदावरी नदीतील रामकुंड माणसाच्या जिवंतपणी शुद्ध जलाभिषेक करीत असतं!देह मागे ठेवून पवित्र आत्मा निघून गेल्यावरही स्वर्ग सुखाचं दार उघडचं असतं!मृत्यू पश्चात पवित्र अस्थी गोदावरीत विसर्जन केल्यावर पुण्य मिळत असतं अशी श्रद्धा मानली जाते!!सूक्ष्म आत्म्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून अस्थीसं रामकुंडावर संस्कार विधीनीं विसर्जित केले जातात!सकारात्मक ऊर्जेचा स्रोत रामकुंडातून बाहेर येतं असतो!पुण्य संचय आत्म्यासोबत स्वर्गलोकी प्रवासाला निघून जातो!वैकुंठी दिव्यत्वाचं दर्शन होऊ लागतं!पुण्यात्म्यास मोक्ष मिळतो!गोदावरीतील रामकुंड पवित्र आत्म्याचा वैकुंठ प्रवास सुखकर करीत असतं!नाशिकमधील श्री.राम स्पर्शाने पवित्र झालेलं रामकुंड शतकानुशतक पुण्यात्म्यास पुण्यप्रदान करीत आलं आहे!म्हणून त्याविषयी थोडे काही……. 🚩👏🏼
नाशिक शहर…!अतिशय प्राचीन शहर आहे!श्रद्धा हृदयी घेऊन भाव भावनांचं संचित गोदाकाठी समर्पित करण्याचं अतिशय पवित्र स्थळ आहे!तीर्थक्षेत्र आहे!गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरातील ब्राम्हगिरी पर्वतावर झाला आहे!गौतमी गंगा गोदावरी आपलं पवित्र जल नाशिक क्षेत्री रामकुंडावर घेऊन येते!नाशिक क्षेत्र ऋषी मुनींच्या पवित्र पावलांनीं पूनीत पावन भूमी आहे!श्रीराम, लक्ष्मण अन सीता मातेच्या पवित्र पावलांनी पवित्र झालेलं पावन भूमी आहे!पुण्यदान, पुण्यानुमोदन करणारी ही पवित्र भूमी आहे!गोदावरी नदी गंगामातेचं दुसरं रूप आहे!शतकानुशतकं पवित्र जल वाहून नेणारी गोदामाता दक्षिणेकडे वाहात असतें!भारतातील गंगा नदी नंतर सर्वात लांब वाहणारी दोन नंबर नदी आहे!तिची लांबी १४६४ किलोमीटर!गोदावरी नदी श्रीरामाविष्कार आहे!🚩
श्रद्धाहृदयी प्रत्येक व्यक्ती गोदामातेच्या पवित्र जलात डुबकी मारून पुण्यप्राप्तीचं अमृतफळ घेऊन घरी जात असतो!श्रद्धा आंतरिक अनुभूतीचं मानसशास्र असावं!अस्सल शुद्ध तुपासारखी भावना जपणारी अनुभूती आहे!ही श्रद्धा आत्मिक सुख मिळवून देत असतें!जिवंतपणी मनासारखे घडल्याचां शिखरानंद मिळत असतो!ही अतूट श्रद्धा प्राचीन परंपरेची शिदोरी आहे!आपलं हृदय अर्पण करून श्रद्धाद्वारी जात असतो!त्यात वाहात असतो!वाहता वाहता एकरूप होऊन जात असतो!ती अनुभूती सर्वांग सुंदर असतें!तृप्तीनुभव ईश्वरीय असतो!स्वर्गीय असतो!प्रसन्नानंद असतो!ज्योतिर्लिंग क्षेत्र त्र्यंबकेश्वरातून उगमाचा प्रारंभ करणारी,दक्षिणमुखी वाहणाऱ्या गोदावरी नदी नाशिक क्षेत्री येते!राम प्रसाद मिळाल्याची अनुभूती होत असतें!नाशिक तपोभूमी आहे! रामकुंडावर हजारोंच्या संख्येने लोकं येतात!श्रद्धेनें विधी होत असतात!स्वर्गीय पवित्र आत्म्यास वैकुंठ प्राप्तीसाठी अस्थी विसर्जन,गंधमुक्ती विधी पार पाडून श्रीरामस्पर्श करून घेत असतात!🚩
श्रीरामांनी गोदातटी आपलें स्वर्गीय पिताश्री राजा दशरथांचं पिंडदान तर्पण केले होतें अशी प्राचीन मान्यता आहे!पुरुषोत्तम श्रीरामांच्या पद स्पर्शानी पावन तपोभूमीसं श्रद्धापूर्वक डोळे भरून पहावे, प्रत्यक्षात हस्त स्पर्शाची अनुभूती लाभावी म्हणून भारतातील लाखो लाखो श्रद्धाळू रामकुंडावर येतं असतात!प्रत्येक सश्रद्ध व्यक्तीस श्रीराम, श्रीलक्ष्मण, सीतामय्या यांच्या वनवास काळातील निवासक्षेत्री जाऊन माथा टेकवावासा वाटतो!पुण्य पदरी पाडून घ्यावसं वाटतं!लाखो भाविक तपोवन,सीता गुफा,रामकुंडावर येतं असतात!दर्शन घेऊन कृतकृत्य होत असतात!
रामकुंडावर रामायणाशी संबंधित अनेक संदर्भ साक्षात्कारी स्वरूपात आहेत!प्राचीन मानवी श्रद्धा आहे,की जीवंतपणी गोदावरीतं पवित्रस्नान करीत पुण्य गाठीशी बांधावं!देह ठेवल्या नंतरही रामकुंडावर अस्थी विसर्जित व्हाव्यात!आत्म्यासोबत नर देहासही गोदावरीत पुण्य लाभावे ही अतूट श्रद्धा असावी असं हे रामकुंड!समोरच भगवान विष्णू स्थापित कपालेश्वर महादेव मंदिर आहे!अंतःकरणात वेगळीचं अनुभूती होत असतें!आयुष्य जगता जगता पुण्य पदरी पडल्याच समाधान वेगळंच असतं!उत्तरकाळ मोह मायेच्या घट्ट बंधातून मुक्त होण्यासाठी मन व्याकुळ होऊ लागतं!रामकुंडाशी नाळ जुळू लागते!जीवन सार भक्तीभावाने विसर्जित करावेसे वाटतात!…🚩
नाही राहिला हो लोभ
राहिला ना मोह आता
जीवन सुख अतिझाले
सोडूनि जावं गावं आता!🚩
🚩🚩🚩👏🏼🚩🚩🚩
***********************
… नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक- ०८ फेब्रुवारी २०२५