nag panchami marathi kavita

nag panchami marathi kavita
nag panchami marathi kavita

nag panchami marathi kavita

कसा राहू वारुळात

॰॰॰॰॰ 🐍कसा राहू वारुळात🐍 ॰॰॰॰॰
श्रावणाच्या पावसात
धरा भिजते जळात
जल साचते साचते
         नागोबाच्या वारुळात॥धृ ॥
कसा राहिल नागोबा
जलमय वारुळात
जन डुंबले डुंबले
        अंधश्रद्धेच्या  जळात॥१॥
आली पंचमी पाहिला
म्हणे नाग वारुळात
येऊ म्हणे हा बाहेर
            कसा राहू वारुळात ॥२॥
हवे उंदीर नि घुशी
नागोबाला आहारात
कसा राहिल तो खूष
            दुध साखर लाह्यात॥३॥
किती काळ राहतील
जन असे अज्ञानात
सार्या कल्पित कथा ह्या
       कधी व्हावे त्यांना ज्ञात॥४॥
    —निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
      🌧🐍🌧🐍🌧🐍🌧🐍🌧
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

nag panchami marathi kavita
nag panchami marathi kavita

सत्य आणआचारात

🐍सत्य आणआचारात🐍
मैत्री म्हणे निभवितो
बळी राजाशी रे नाग
एक सजीव जीव तो
        देव कसला रे नाग ॥धृ ॥
कधी येईल माणसा
तुला वास्तवाची जाग
कथा कल्पियली कुणी
        माणसारे आता जाग॥१॥
जरा येरे वास्तवात
सत्य शोधुनिया बघ
येरे माणसा सत्यात
          काळ बदलला बघ॥२॥
मला एकच ठाऊक
पंचमी रे फाल्गुनात
रंग भरते नात्यात
          नातं तिचं जीवनात॥३॥
नाग वन्य जीव त्याचं
कसं जुळावं रे नातं
कसा नेईल बहिण
         इवल्याशा वारुळात॥४॥
नवा जोडून विचार
घ्यावा तुही विचारात
सत्य पडताळून हे
       आण जरा आचारात॥५॥
   -निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
     🐍🐍   🐍🐍🐍  🐍🐍

नागपंचमी कविता मराठी
नागपंचमी कविता मराठी

नागपंचमीचा झोका बाई जातो दूर दूर

         ॥श्री॥

      आठवणी.. आठवणी…

नागपंचमीचा झोका बाई जातो दूर दूर
आज आठवणींचा हो आला आहे मनी पूर
मन गेले हो माहेरी आई सामोऱ्यात उभी
वाटतच नाही बघा गेली आहे आता नभी…

माजघरात सालदार भाऊ बांधी दे रे झोका
दोर सालदार आणे माझा चुकतसे ठोका
परकरातली पोर दिसते हो समोरंच
कुठे हरवलं माझं धनगोत माहेरचं…

आईचीच नऊवारी दिसभर ती नेसून
माझं गबाळ बघून बघतसे ती हसून
याच्या घरी त्याच्या घरी झोका मनसोक्त होई
सारे कौतुकाने माझे माझी बघतसे आई…

सण कळत नव्हते बालपण निरागस
हुंदडणे हो माहित पुरी होई सारी हौस
पाने वाटून मेंदीची हात बांधून दे आई
लाल रंग पाहताच वाटे सकाळी नवलाई..

किती सुंदर दिवस फुलपांखरू मी होते
बालपणाशी जडले असे सुंदरसे नाते
नाही येत परतून बालपण नि ती आई
नाही वाटत हो आता सणांची पुर्वीची
अपुर्वाई…

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २९ जुलै २०२५
वेळ: दुपारी २/२८