गावात देव राहत होता marathikavita latest
गावात देव राहत होता….
कवी योगेश बोरसे✍️
गावात देव राहात होता
गावाच्या मधोमध,
पिंपळ, उंबर, वड
यांच्या सावलीत बसत होता
माढीतला सावकार
झोपडीतला सालदार
सर्वच तुझ्याजवळ यायचे
मनातलं दु:ख सांगायचे
तू सगळं ऐकून घ्यायचास
कोणी तुला नारळ
कोणी डब्यातली भाकर
प्रसाद म्हणून द्यायचं
हाच आमचा देव होता
आभिर गुलालात न्हालेला
माटीत राहूनही
सोन्यासारखा वाटणारा
आता तू मोठा झालास
शहरात गेलास,
मोठमोठी मंदिरं झाली तुझी
आणि तू श्रीमंत झालास
तिथं आलो होतो तुला भेटायला,
पण तू बाहेर येत नाहीस
आणि आतला माणूस
मला तुझ्या जवळ येऊ देत नाही
श्रीमंतांसाठी तूला सवळ,
गरीबाला मात्र येऊ देत नाही जवळ
गरीब जवळ आला की दरवाजे बंद होतात
असा का रे तू? इतका बदललास?
खोट्यांना तू जवळ घेतोस
आणि खर्या भक्ताला विसरतोस!
कवी योगेश बोरसे✍️
