जगणं marathi kavita sangrah
जगणं
उदास मनाला
फुल म्हणतंय
बघ जरा माझ्या कडे…
तुझ्या सारखी
मी धरतीच्या पोटातून
रोपट्याच्या कुशीतून
कधी ऊन पांघरूण
कधी वारा झेलून
कधी पावसात भिजून
कधी दवबिंदू पिऊन
मीही उमललेय…
अगदी ताठ मानेने…
हे जग खूप सुंदर आहे
हे बघण्यासाठी…
मी ही उद्या
मावळणार आहे….
हे जग सोडून जाणार आहे..
पण आजच जगणं
आनंदात मात्र
जगणार आहे …
पुढच्या चितंनाने
मी मात्र झुरणार नाही…
अलगद वा-याच्या
झुळकेवर डोलेल…
स्वच्छंदी होऊन
आयुष्य आहे
तेवढ आनंदांने
भरभरून जगेल…
इवल्याश्या फुलाच
केवढ देखण रूपड…
हताश
माझ्या मनाच्या
मरगळीला छोट्याशा
सुंदर फुलाने
जणू क्षणात
झटकून टाकल.
कवयित्री
गितांजली कोळी.धुळे
दि 27/7/2024