दुसऱ्या महायुद्धातील मृतातम्यांना विनम्र अभिवादन आणि त्यांना ही एक कविता समर्पित.

दुसऱ्या महायुद्धातील मृतातम्यांना विनम्र अभिवादन आणि त्यांना ही एक कविता समर्पित.



(“मानवतेला आवाहन”)
~~~~~~~~~~~
पडे घाव पहिल्यांदा
विश्व विकास मुद्द्यात
नाश झाला दुसऱ्यांदा
द्वितीय महायुद्धात //१//
युद्धात लांघल्या सीमा
ठेवले ना काही बाकी
नष्ट केले हिरोशिमा
ऱ्हास झाले नागासाकी //२//
मित्रांचा विरला मोह
भरून काही उणीव
अल्पसा देऊन स्नेह
निर्माण झाली जाणीव //३//
दुसऱ्या महायुद्धाने
वैश्विक मानवतेला
अणुबॉम्बच्या मुद्द्याने
डागंच लागला तिला //४//
टाळून युद्धाचा मार्ग
सौजन्यानेच वागावे
मनवता हा स्वधर्म
मानून सदा जगावे //५//
अरे मानवा येऊ दे
आतातरी अल्प जाग
सर्वांना सुखी राहू दे
कर तु युद्धाचा त्याग //६//

(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.- 9403307521}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

शाळा

(“यावे ह्या शाळेत माझ्या”)
———————————-
शिष्यास जे गुरुगृही,
उपदेश कधी मिळाले
सर्वही ते प्राप्त झाले,
यावे ह्या शाळेत माझ्या //१//
बाकांवरती बसावे,
फळ्याकडेही जे पाहावे
वहीत सर्व ते लिहावे,
यावे ह्या शाळेत माझ्या  //२//
मुले अनं मुली ज्या खऱ्या,
बसतील एकत्र साऱ्या
भरतील ज्ञान तिजोऱ्या,
यावे ह्या शाळेत माझ्या //३//
जातांना तया घराला,
“मज्जाव”शब्द ही आला
भीतीही न यावयाला,
यावे ह्या शाळेत माझ्या //४//
बहाली घरी मऊ बिछाने,
विद्युल्लता हीच आदाने
आम्हां नसे काहींही देणे,
यावे ह्या शाळेत माझ्या //५//
येता तरी सवे या,
जाता तरी सवे जा
कुणालाही न होई सजा,
यावे ह्या शाळेत माझ्या //६//
पाहून ज्ञानार्जन माझे,
सूर्य,चंद्र तेही लाजे
विद्यादेवी सदा विराजे,
यावे ह्या शाळेत माझ्या //७//
( ता.क.= राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या “या झोपडीत माझ्या” या प्रार्थनेवर आधारित तोडकी मोडकी “शब्द रचना किंवा कविता” )
(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.- 9403307521}
~~~~~~~~~~~~~~~~~~~~