शपथ kavita sangrah marathi
•••शपथ•••
सोपी सदा सर्वाहून
पहा शपथ शपथ
सोपा सुविध करते
अवघड अति पथ॥धृ॥
येवो कोणतीही गत
येवो कोणती आफत
तुझ्या माझिया गळ्याची
ओठी येतेच शपथ॥१॥
तुझी माझी याची त्याची
हिच राखतेच पत
पत राखते सांगते
सत्यासत्य पटवत॥२॥
कधी आईची बापाची
आणि कुणाची कुणाची
रेषा बनते ही एक
ओलांडून न जाण्याची॥३॥
येते होऊन सहज
ओठावर ही शपथ
ठेव सदा ठेवतेच
सर्वकाळ ही जपत॥४॥
शब्द एकच व्यापतो
पुरं जीवनाचं नातं
श्वास असे तो देतसे
खर्या विश्वासाची साथ॥५॥
—निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७ ब,नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल, जिल्हा जळगाव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
