kavita sangrah marathi मराठी कविता संग्रह
Table of Contents
तशी येगं सरसर मराठी कविता
….तशी येगं सरसर….
सरी बाई तुझी सय
येते बघ सरसर
तशी याविस वाटते
सदा तुही सरसर॥धृ॥
बालपण ची आठवे
एक झोक्याचीही सर
गेले बालपण तरी
नाही पडत विसर॥१॥
सय तिची येते पण
पुन्हा येईना ती सर
तिच्यापरी भावते ग
तूच पावसाची सर॥२॥
वाट पहायला पण
नको लावूस तू बरं
तरसली तुझ्यासाठी
बघ सांगते मी खरं॥३॥
तुझ्या विना कवितेला
माझ्या कुठला बहर
सृष्टी बहरता येतो
बघ तिला ही बहर॥४॥
जशी कविता येते ग
नित्य माझी सरसर
तशी येगं येगं सर
तुही पावसाची सर॥५॥
— निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड,एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
::::::::::::::::::::……○……::::::::::::::::::::

गाणे स्वरात भरुया
🌧गाणे स्वरात भरुया🌧
येरे पावसाला गाणे
चला म्हणूया म्हणूया
सान थोर एकसाथ
पावसाला विनवूया॥धृ॥
बालपणीचे दिवस
म्हणतांना आठवूया
थेंब थेंब पावसाचा
चला आणि साठवूया॥१॥
पाणी जीवन विचार
चला सार्यांना सांगूया
बीज हेच मनोमनी
चला सारे रुजवूया॥२॥
झाडे लावूही वाढवू
हित ह्यातच सांगूया
झाडे लावू जगवूया
अन् सारेच जगूया॥३॥
जगा आणखी जगवा
अन् संदेस पेरुया
सवे सुखाचे दिवस
चला आधीचे स्मरुया॥४॥
दिन सुखाचे स्मरता
नवे जीवन तरुया
म्हणूनच पावसाचे
गाणे स्वरात भरुया॥५॥
–निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर,धरणगांव चौफुलीरोड,एरंडोल जि.जळगांव .
दूरध्वनी क्रमांक :-९३७१९०२३०३
🌧🌧🌧🌧 🌧🌧🌧🌧🌧 🌧🌧🌧🌧

माझी नात
🌸🌺माझी नात🌸🌺
नात माझी नात माझी
नात माझी ग भार्गवी
बोली हिची साखरेची
मला भावते लाघवी॥धृ॥
गोष्टी साठी आजी आजी
अशी आजीला आर्जवी
गोष्टी मधलीच परी
जशी माझी ग भार्गवी॥१॥
आजी माझी आजी माझी
माझी म्हणते भार्गवी,
नातं आजी नातीचं हे
सार्या नात्यांस लाजवी॥२॥
असं नातं हे जीवन
आजी नातीचं सजवी
नाती साठी शब्द शब्द
आजी गाण्यात रुजवी॥३॥
अशी नात ग गुणाची
माझी भार्गवी भार्गवी
नात माझी नात माझी
नात माझी ग भार्गवी॥४॥
–निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक-:९३७१९०२३०३
❤💖🥰🤗🌸

द्यावे घ्यावे आणि द्यावे
📚द्यावे घ्यावे आणि द्यावे📚
म्हणे माझी बहिणाई
ज्ञान मस्तकात आलं
ज्ञान तेथलं तेथलं
सारं पुस्तकात आलं॥धृ॥
मस्तकीच्या ज्ञानामृते
म्हणे पुस्तक नहालं
पुस्तकाने मस्तकाला
पुन्हा केलं ते बहाल॥१॥
पुस्तकाने त्या शहाणं
जन एक एक झालं
केले त्याने पुस्तकाचे
पहा काय कसे हाल॥२॥
काय दिधले घेतले
सारं व्यर्थच जहालं
काना कोपर्यात पहा
पुस्तकाचे झाले हाल॥३॥
देत राहिला देणारा
घेणार्याने ते घेतलं
भान देणार्याचे पण
कसं कधी न राखलं॥४॥
ज्ञान देणार्याने दिलं
घेणार्याने ते घेतलं
थोड तरी अवघ्यांना
दिलं पाहिजे त्यातलं॥५॥
-निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७ ब, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगाव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚…………………………………………………📚

चांदोबाच्या खिशात
[आता थोडं छोट्यांसाठी. कंटाळले असतील ना घरात बसून. शाळांना सुट्ट्या लागल्या. चला तर मग आज पाहू आपण ससुल्याला चांदोबाच्या खिशात…]
🌝🐰चांदोबाच्या खिशात🐰🌝
एक ससुला ससुला
होता बसला घुश्यात
दूर बसला जाऊन
लाकडाच्या तो भुश्यात॥धृ॥
त्याने पाहिले तेथून
चांदोबाला आकाशात
आला मनात विचार
तसा हसला मिशात॥१॥
थेट बसला जाऊन
चांदोबाच्या तो खिशात
ससोबाला मिरविले
चांदोबाने आकाशात॥२॥
त्याने पाहिले तेथून
धरतीच्या नकाशात
नदी नाल्यात पाहिले
जणु काही आरशात॥३॥
बिंब पाहून स्वतःचे
पुन्हा हसला मिशात
मौज अशी ससुल्याची
चांदोबाच्या हो खिशात॥४॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
🌝🐇🌝🐰🌝🐇🌝🐰🌝🐇🌝

मेघ मल्हार
🎵🌧मेघ मल्हार🌧🎵
जाता जाता कोकिळेने
दिली माधुरी गळ्याला
गोड गळ्यात जुळून
मेघ मल्हारही आला॥धृ॥
गेला बनवून मला
नको म्हणता गायिका
तुझ्या पावसा थेंबाला
काय सांगू आख्यायिका॥१॥
येरे घेऊन सोबत
तुझी संगिताची शाळा
तुझ्या आधी चिमण्यांची
सुरु झाली बघ शाळा॥२॥
एक तुझाच बहाणा
आता सुट्टी मिळण्याला
सुट्टी साठी तरी त्यांच्या
तुला हवे रे येण्याला॥३॥
अति उष्म्यात उन्हाच्या
मिळेनाच खेळण्याला
तुझ्या सवे पावसारे
मौज यावी भिजण्याला॥४॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
🌧🎵🌧🎵🌧🎵🌧🎵🌧🎵🌧

माझे बहरले गीत
[माझे हसीं खुशी चे दिवस माझ्या मिरची मसाल्याच्या(कांडपच्या) उद्योगात व्यतीत झाले. त्यावेळी मला सावरले माझ्या गीतांनी(कवितांनी). त्या आशयाची ही कविता ⬇️….]
🌞🌤माझे बहरले गीत🌤🌞
दिन माझ्या तारुण्याचे
मिरचीत झाले चीत
तरी निभविली मीही
जीवनाची जशी रीत॥धृ॥
मन माझे तारण्यास
आले ओठावर गीत
गीतावर माझ्या केली
अहा! अवघ्यांनी प्रीत॥१॥
रात सरेल जाईल
बदलून ही प्राचीत
नाही रहात अंधार
प्रकाशाच्या सोबतीत॥२॥
दिली समज मनाला
मीही माझ्या अशी नित
साथ देत होते त्यात
माझे एक एक गीत॥३॥
माझ्या परी गीतांवरी
केली वाचकांनी प्रीत
नित् नवी वाखाणणी
माझे बहरले गीत॥४॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी*, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३
🌞🌤🌞🌤🌞🌤🌞🌤🌞🌤🌞🌤