आता करिन आदेश kavita sangrah marathi
🌧आता करिन आदेश🌧 मराठी कविता
कालिदासाच्या यक्षाचा
मेघ जसा मेघदुत
तसा माझ्या धरतीचा
वारा वाहतो हा नित॥धृ॥
जारे वार्या घोंगावत
मेघराजाच्या सभेत
सांग घेऊन आदेश
आलो धरेचा सेवेत॥१॥
झाले देऊन संदेश
ऐक आता एक बात
बात माझी ही एकच
पण सांगतो लाखात॥२॥
येरे करिन आदेश
सांग असा घोंगावत
तुझ्यासह आभाळच
माझ्या आणिन सोबत॥३॥
बर्या बोलानं ऐक रे
मेघा माझी एक बात
नाही तर आणिन मी
एक नवे झंझावात॥४॥
मित जरी तुझ्या साठी
गीत नित् आलो गात
तुझ्या सारख्या सख्याचं
मग विसरेन नातं॥५॥
–निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.