सखा पांडवांचा kavita marathi latest
सखा पांडवांचा
कुठे शिंपडावा, सडा आसवांचा,
कुठे पाझरावा, झरा भावनांचा.
कुणी लाविल्या, दीव्य ज्योती मनाने,
तिथे गंध यावा, उमलत्या फुलांचा.
असावी प्रवाही, जगातील नाती,
नको त्यात खोटा, दिखावा जनांचा.
जगाला प्रकाशीत, केले तयांनी,
कसा लोपला दीप, त्यांचा घरांचा.
किती सोस आहे, जगाला गुणांचा,
नसे दोष तेथे, कुणा लेकरांचा.
सदा जीव लावी, मुक्या वासरांना,
असे प्रिय गुराख्यास, गोठा गुरांचा.
नको चंद्र तारे, नको हार मोती,
तिला छंद, कानी फुलांच्या डुलांचा.
सश्यांनी स्वतःहून, व्हावे निगर्वी,
धडा तो शिकावा, गुणी कासवांचा.
नसे स्वार्थ जेथे, तिथे मैत्र फुलते.
सखा कृष्ण शोभे, जगी पांडवांचा.
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)
