jyotirao phule क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

jyotirao phule
satyashodhak samaj

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले jyotirao phule

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले
( थोर भारतीय समाजसुधारक )
     रामचंद्र सालेकर


   ११ एप्रिल १८२७ ला भारतभुमीत उदयाला आलेल्या क्रांतीसुर्याचा म्हणजे सामाजिक  शोषणव्यवस्था असलेल्या गुलामीच्या शृंखला तोडणाऱ्या एका  महायोध्याचा जन्म झाला.भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरानेच नव्हे तर या देशाच्या खऱ्या मालकांला गुलामीच्या शृंखलेने करकचून बांधलेल्या शोषित पिढीतांच्या ह्रदयात कोरुन ठेवलेलं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.
   भारतीय समाज हा राजकीय गुलामी पेक्षा एका भयंकर सामाजिक गुलामगीरीत मरनयातना भोगत होता मुठभर प्रस्थापितांच्या छळाने आणि शोषणाने पुरता नांगवला होता.त्याच्या मेंदुची चेतनाच नष्ट करुन मानसिक गुलाम केला गेला होता. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी या क्रांतीसुर्याने घडवून आणलेल्या क्रांतीचा हा उजाळा.

satyashodhak samaj
satyashodhak samaj


   भारतीय समाजाला गुलाम करण्यासाठी मनुस्मृती नावाचं एक भारतीय समाजव्यवस्थेच संचलन करणारं नियमावलीचं एकप्रकारे कायद्याचं पुस्तक निर्माण केल गेलं. त्यानुसार समाजाची विभागणी चार वर्ण तयार करुन  करण्यात आली.१,ब्राम्हण २,वैश ३,क्षत्रिय ४,शुद्र यातला चवथा वर्ण शुद्र म्हणजे आपला ९०% भारतीय बहुजनसमाज वरील तिन्ही वर्ण हे बाहेरुन आलेले विदेशी.

या व्यवस्थेने प्रत्येक वर्णाचे काम वाटून दिलेले होते.ब्राम्हणाकडे धार्मिक सामाजिक राजकिय सांस्कृतिक या व्यवस्थांचं व्यवस्थापण करनं हे काम होतं या व्यवस्थापनाची नियमावली म्हणजे मनुस्मृती त्यांनी तयार केली.वैश्याने व्यापार करावा व क्षत्रियांनी ब्राम्हणाच्या मार्गदर्शनात एक राजा व सैनिक म्हणून राज्याच व ब्राम्हणाचं रक्षण कराव.शुद्राने या तिघांची सेवा करावी.अशी व्यवस्था निर्माण केली.आज सुद्धा त्यात फारसा फरक नाही.

महात्मा ज्योतिबा फुले जयंती
महात्मा ज्योतिबा फुले जयंती


   यामध्ये शुद्र हा नव्वद टक्के भारतीय समाज होता या बहुसंख्य म्हणजे बहुजन समाजाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी व त्यांच्याकडून सेवा करुन घेण्यासाठी तो समाज एकसंघ कधीच राहणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक होतं यासाठी तो जी जी सेवा देण्याचं काम करतं त्यावरुन जाती तयार केल्या गेल्या.जातीचे, व्यक्तीचे,आडनाव ही सर्व नावे देण्याचा अधिकार ब्राम्हणालाच असे कारण व्यवस्थापन त्यांच्याकडे होतं.

जातीमध्ये विभागणी केली तरी एकेका जातीचा समुह सुद्धा एकसंघ राहने हितावह नसल्याचे बघून पुढे प्रत्येक जातीत निरर्थक असे शब्द जोडून पोटजाती तयार केल्या गेल्या.अशातर्हेने भारतीय समाज जातीव्यवस्थेत बंदिस्त झाला.इथूनच त्याच्या शोषणाची व यातनाची सुरुवात झाली.

satyashodhak samaj
सत्यशोधकी लिखाणातून दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज


  शुद्रामध्ये निर्माण केलेल्या ज्या जाती वरील तिन्ही वर्णाला त्यांच्या  जीवनावश्यक गरजा भागवत त्यांना त्यांनी जवळ केलं त्यांच्या स्पर्शा शिवाय त्यांच काम भागणं कठीण होतं अशां शुद्रांना स्पृश्य संबोधले जसे धान्य कुणब्याशिवाय,भाजीपाला माळ्याशिवाय,दुध गवळ्याशिवाय,तेल तेल्याशिवाय,झोपायला खाट सुताराशिवाय राहायला घर गवंड्याशिवाय,अवजार शस्त्र लोहाराशिवाय…

यांचे हात लागल्याशिवाय ह्या जीवनावश्यक वस्तु त्यांच्यासाठी बणूच शकत नव्हत्या व त्यांना मिळू शकत नव्हत्या त्यामूळे या शुद्रांना स्पृश्य संबोधून त्यांना जवळ ठेवले म्हणजे गावाच्या वेशीच्या आत ठेवून त्यांना अंगनात व गरजेनुसार घरात प्रवेश द्यावा लागला.


   उच्च वर्णीयांनी करुन ठेवलेली घाण, सहसा माणुस घाणीजवळ जात नाही. ती घाण उचलणार्याजवळही जायची आवश्यकता पडत नाही अशी काम करणार्यांना स्पर्श न करणारे म्हणजे अस्पृश्य संबोधून त्यांना अतीशुद्रामध्ये विभागले.या अतीशुद्रांना वेशीच्या बाहेर ठेवून त्यांचा स्पर्श निशिद्ध करुन अनेक बंधनात त्यांना बांधून त्यांच्यावर पुढे पुढे अनन्वीत अत्याचार केले हे अत्याचार छ.शिवराय,छ.संभाजी,छ.शाहु, व इंग्रज यांच्या राज्यात काही प्रमाणात कमी झाले.

परंतु धर्म संस्कृती समाज राजकारण शिक्षण ह्याच संचालन ब्राम्हण या वर्णाकडेच असल्याने ह्या स्थितीत फारसा फरक पडला नाही. याकरिता महात्मा ज्योतिबा फुलेंना धार्मिक,सांस्कृतिक सामाजिक तथा राजकिय आघाड्यावर फार मोठा संघर्ष करावा लागला.

ही संघर्षगाथा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचं नेत्रदिपक कार्य, पुढे हा वारसा छ.शाहु महाराज यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करुन चालविला व आज शुद्रांची (स्पृश्य अस्पृश्य) जी थोडीफार परिस्थितीत सुधाराणा दिसते ती म्हणजे हा वारसा पुढे डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी चालवून या देशाला दिलेलं मानवतावादी आदर्श संविधान.


   महात्मा ज्योतिबा फूलेंचा काळ म्हणजे भारताला इंग्रजांच्या राजकिय वर्चस्वातून दूर करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाचा काळ होता.तत्कालीन सामाजिक परिस्थिती बघता महात्मा फुलेंना विश्वास होता की खरे स्वातंत्र्य हे इंग्रजांच्या राजकीय गुलामीतुन सुटका नसुन ब्राम्हणांच्या सामाजिक गुलामीतून सुटका हेच आहे.त्यासाठी या सामाजिक धार्मिक व्यवस्थेवर आपल्या साहित्यातून आसूड ओढले.

आपली खरी गुलामी ही राजकीय नसुन ती सामाजिक आहे त्यासाठी त्यांनी समाजाच्या मेंदुला भेदून निघेलं असा आपल्या गुलामगीरी पुस्तकातून धोंडीबा आणि ज्योतिबा या पात्राच्या संवादातून या ब्राम्हणी वर्णव्यवस्थेचा पर्दाफास केला.स्वतः हंटर कमिशन पुढे या देशातल्या शेतकऱ्यांच्या अंगावरच्या चिंध्या परिधान करुन आपबीती कथन करणार्या ज्योतिबाने शेतकर्यांचा आसूड सारखे या व्यवस्थेच्या विरोधात बंड करुन उठणारे साहित्ये दिले.

आपल्या स्वातंत्र्याचा मिटवून टाकलेला छ.शिवरायांचा खरा इतिहास महात्मा फुलेंनी आपल्याला परत मिळवून दिला.रायगडावर छत्रपतीची समाधी शोधून शिवजयंती महोत्सवाची सुरुवात केली.खरा कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक अशा छ.शिवरायांवरील प्रदीर्घ पोवाड्यातून आपल्या महान राजाचा इतिहास समाजापुढे आणला.

धार्मिक अत्त्याचारातून समाजाची सुटका करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.परंतु पाहिजे तसे यश येत नव्हते आणि याचे मुख्य कारण हा भारतीय समाज विद्येपासून कोसो दूर होता.

या शोषक समाजव्यवस्थेच्या विरोधात हा शोषित शुद्र भारतीय समाज व समाजाचा अर्धा घटक महिला यांच्यासाठी शिक्षणाची दारे मातृसत्ताक निसर्गपुजक प्राचीन अशा समृद्ध सोन्याचा धूर निघणाऱ्या, सोन्याची चिडियाॕ म्हटल्या जात  असलेल्या हडप्पा महेंजोदारो या सिंधु बळी शिवसंस्कृतीच्या विनाशानंतर,परकिय निसर्गविध्वंसक पितृसत्ताक आर्य वैदीक यज्ञ संस्कृतीच्या आक्रमणापासुन या देशात बहुजनासाठी शिक्षणाची दारे कायमची बंद करण्यात आली होती.

ज्योतिबांनी लिहिलेल्या साहित्यात एवढी ताकद आहे की हा समाज बंड करुन ही शोषण व्यवस्था उध्वस्त करणार एवढी आग त्यात आहे.परंतु अविद्देमुळे हे साहित्ये या भारतीय समाजापर्यंत पोहचतच नव्हते. कठीण परिस्थितीत डाॕ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने जेव्हा विद्या मिळवून या साहित्याचा अभ्यास केला तेव्हा त्यांना गुरुस्थानी ठेवून या व्यवस्थेच्या विरोधात बंड करुन समाजाला या शोषणातून सोडविले यावरुन महात्मा ज्योतिबा फुलेंच्या साहित्यात असलेल्या ताकदीची कल्पना येईल.


   सर्व समस्याचे मुळ हे अविद्याच असून त्यांनी समाजाला संदेश दिला की,
“”विद्देविना मती गेली,मतीविना निती गेली, निती विना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्देने केले.”
  हा संदेश देवून थांबले नाही तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी अतिशय कठीण अशा सामाजिक परिस्थितीत शाळा सुरु करुन बहुजनांच्या शिक्षणाची बंद असलेली दारे उघडली.

स्री शिक्षणाचा फार मोठा यक्ष प्रश्न होता.तेव्हा प्रथम आपली पत्नी सावित्री ला शिकवून तिच्याद्वारे पुण्यात मुलींची १ जानेवारी १८४८ ला पहिली शाळा काढली. माॕ.सावित्री ने समाजकंटकांचे दगडधोंडे शेण पोयटे झेलून ज्योतीबांना या कार्यात हिंमतीने साथ दिली.या देशातल्या तमाम महिला भगीनींच्या जीवनातला १ जानेवारी हा दिवस स्री मुक्तीचा असून माॕ.सावित्री ही स्रीमुक्तीदाती आहे.


   समाज सुधारणेचा हा महारथ फुले दांपत्यांनी इंग्रज सरकारच्या व या ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधातील काही सुधारणावादी ब्राम्हण मुस्लीम ख्रिश्चन मित्रांच्या थोड्याफार मदतीने या विषमतावादी समाजव्यवस्थेला टक्कर देत हा रथ एकतर्फा ओढून काढला.

सत्य शोधक समाजाची स्थापना,विधवा पुनर्विवाह,नाव्यांचा संप,अस्पृश्यता निवारण,मोफत आणि सक्तीचं शिक्षणासाठी आग्रह,शाळा काढणे,शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडणे,शेतकऱ्यांना कर्जमाफी,प्रस्थापित शोषकांच्या विरोधात गुलामगीरी,शेतकऱ्याचा आसूड,ब्राम्हणाचे कसब…. यासारखे प्रखर साहित्ये लिहणे……

हा सर्व संघर्ष करतांना समाजकंटकाकडून जीवघेणे हमले या सर्वांवर मात करत २८ नोव्हेंबर १८९० ला भारतमातेचा हा क्रांतीसुर्य मावळला.त्यांच्या “सत्य शोधक समाजाचे” अधुरे राहिलेले कार्य मराठा सेवा संघ ही वर्तमानयुगातली पुरोगामी चळवळ आपल्या महान प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक समृद्ध अशा सिंधु शिवसंस्कृतिच्या सत्ये इतिहासाचे संशोधन करुन “शिवधर्माच्या” माध्यमातून त्यांचे अधुरे राहिलेले हे कार्य जोमाने पुढे नेत आहे.


   या क्रांतीसुर्याच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *