महात्मा ज्योतिबा फुले जयंती
महात्मा ज्योतिबा फुले जयंती
मधु सिंधू रचना
महात्मा ज्योतिबा
सावित्री पती
महात्मा ज्योतिबा
सदैव पाठिंबा
सेवेला गती ।।
पहिली शाळा
पुण्यात काढली
संधी निर्मियली
शिकल्या बाळा ।।
ज्योतिबा घरी
सेवेचा आरंभ
ज्ञानाचा प्रारंभ
शेतात करी ।।
हौद पाण्याचा
सारा खुला केला
लोकांच्या हाकेला
मार्ग जाण्याचा ।।
सावित्री आई
सर्वांची साऊली
प्रेमळ माऊली
सेवेला जाई ।।
लढा सत्याचा
ज्योतिबा लढले
शिखर चढले
बंध नात्याचा।।
व्रत घेतले
समाज सेवेचे
स्रीच्या जाणिवेचे
दैन्य मिटले।।
ललिता जाधव /बिरारीस
पिंपळनेर- धुळे
महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले
होऊन गेले महान नायक
दीन दलितांची सेवा करत
झाले हो थोर समाज सेवक ।।
स्री जीवनात ज्ञानज्योत
प्रज्वलित केली ज्योतिबांनी
प्रत्येक क्षेत्र काबीज केले आज
सावित्री ज्योतीच्या लेकिंसुनांनी
महात्मा ज्योतिबांनी मनी
धरली स्री शिक्षणाची कास
सावित्री बाईंपासूनच करुया
श्रीगणेशा हा एकच ध्यास।।
ज्योतिबांच्या खंबीर पाठिंब्याने
नाही खचल्या सावित्रीआई
शेणगोटे झेलत उच्च ध्येय
गाठत शिकवू लागल्या बाई।।
व्रत घेतले उभयतांनी
अविरत हो जनसेवेचे
दैन्य मिटले समाजात
शिखर गाठले हे समतेचे।।
ज्योतिबा सावित्रीआई
अमर झाले हेच सत्य
त्यांनी केलेले निरपेक्ष
कार्य हेच खरे अपत्य।।
ललिता जाधव/बिरारीस
पिंपळनेर -धुळे
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त तेजो ज्योतिर्मय हार्दिक शुभेच्छा
Pingback: jyotirao phule क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले - मराठी
Pingback: महात्मा ज्योतिबा फुले - मराठी 1
Pingback: महात्मा ज्योतिबा फुले - मराठी 1