जय जिजाऊ गीत जिजाऊंचे गाऊ

जय जिजाऊ
जय जिजाऊ

जय जिजाऊ गीत जिजाऊंचे गाऊ

राजा शिवबांची आऊ

राजा शिवबांची आऊ
माय जिजाऊ जिजाऊ
कन्या आम्हीही आऊंच्या
माय आमुची जिजाऊ ॥धृ॥
नव्या युगाच्या आम्हीही
होऊ आजच्या जिजाऊ
शक्ति रुप माऊलीच्या
अभिवादनाला गाऊ॥१॥
थोरा मोठ्यांची थोरवी
शिवबांना सांगे आऊ
जिजाईने शिवबांचे
केले बळकट बाहू ॥२॥
मुला बाळात आदर्श
आम्ही तसाच जागवू
शक्ति रुप जिजाऊ चे
धडे आम्हीही गिरऊ॥३॥
राजा शिवाजी सारखे
आम्ही सुपुत्र घडवू
नव्या भारताचे स्वप्न
अन् तयात जडवू॥४॥

जय जिजाऊ

जय माऊली जिजाऊ

       धडे आदर्शाचे घेऊ
जय बोलू शिवबाला
जय माऊली जिजाऊ
चला करु जयकार
         कार्य तयांचे आठवू॥धृ॥
माय शिवबाची आऊ
राज माऊली जिजाऊ
हिने केले बळकट
         बाल शिवबाचे बाहू॥१॥
सुभेदाराच्या स्नुषेला
म्हणे, जशी माझी आऊ
पूत्र असा घडवूया
      होऊ सार्याच जिजाऊ ॥२॥
हिच काळाची गरज
हाती काळासही घेऊ
सांगू नव्या दुनियेला
    आम्ही आजच्या जिजाऊ ॥३॥
धडे आदर्शाचे असे
चला सख्यांनो गिरवू
नव्या युगाचा नव्याने
               इतिहास या घडवू॥४॥
जयघोष  घुमवूया
जय शिवबा जिजाऊ
जय बोलू शिवबाजी
         जय माऊली जिजाऊ॥५॥
    
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.

जय जिजाऊ

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *