Happy birthday PM Narendra Modi
(“विकास पुरुष”)
~~~~~~~~
विकास पुरुष आला
जन्मास ह्या भारतात
नांवारूपासही आला
आज संपूर्ण जगात //१//
मिळाली सर्वांची साथ
वाढला आहे विश्वास
बळकट झाले हात
देशाला मिळाले दास //२//
नमोंचा एकच ध्यास
सर्वव्यापक विचार
होई दीनांचा विकास
हेच योजनांचे सार //३//
देशाच्या नशिबी आला
सर्वांगीण जो विकास
नांवलौकिकही झाला
अनं सर्वस्वी झक्कास //४//
देशवासियांना आला
आहे संपूर्ण विश्वास
विचार हा रूढ झाला
देश घेई दिर्घश्वास //५//
देशाला मिळाला जणू
चोरांसाठी चौकीदार
विकास पुरुष म्हणू
तोच देशाचा आधार //६//
सुज्ञ झाले भारताचे
स्त्रीपुरुष मतदार
हाकलले हातच्याचे
भालदार,चोपदार //७//
ऱ्हास पावत चालली
देशाची घराणेशाही
अनं बळकट झाली
विश्वगुरु लोकशाही //८//
जागतिक स्तरावर
निभावून शिष्टाचार
देशांर्गत स्तरावर
संपवला भ्रष्टाचार //९//
भारत उभा सर्वत्र
सर्व जगाच्या आधारा
आज गुंजे एकमात्र
“नमोनमों” हाच नारा //१०//
(से.नि.प्रा.प्रकाश बिरारी.खमताणे,सटाणा)
{मोबाईल नं.- 9403307521)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
#HappyBirthdayPM #विकासपुरुष # #भारत #India #Leadership #प्रधानमंत्री #Development #Progress #विश्वगुरुभारत #StrongIndia #देशाचा_आधार #NationFirst #लोकशाही #Democracy #NewIndia