गुरुपौर्णिमा

guru purnima
Guru Purnima

गुरुपौर्णिमा

डोळे,वाचा कान उघडणारे ‘गुरुजन’

मित्र माझा गुरु आहे!अनुभव माझा गुरु आहे!घटित घटना गुरु आहे!उठता बसता नाम घेतो तोही माझा गुरु आहे!गुरूंकडून शिकत असतो!शिकता शिकता जगत असतो!समाधानाने बघत असतो! सकारात्मक होऊन वागत असतो!श्वास माझे गुरु आहेत!शब्द माझे गुरु आहेत!डोळे माझे गरू आहेत!कान माझे गुरु आहेत!अशा सर्व गुरुजनांसाठी.

गुरु म्हणजे!गुरु म्हणजे… जिथून सुरुवात करतो,पुढे समारोप करतो तें संपूर्ण अनुभवचित्र माझा गुरु आहे!सतगुरु हे जन्मापासून निरोपापर्यंत ज्ञान देऊन अलिप्त राहात असतात!….स्वतः आपली आईच्या गर्भात वाढ होते!कशी होते? श्वास, प्राण हे कोण असतात बरं ?आपली जन्मण्या आधीपासून सुरक्षित वाढ होत राहते!तिथे कोण बरं असतं?

गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा

साक्षात ईश्वरी कलाकृतीतून बळ मिळतं राहात!नऊ महिण्याच्या वाढीतून श्वास घेऊ लागतो!असा हा चमत्कारी अदृश्य गुरु सतत पाठीशी असतो!हृदयात सतत निवास करतो!क्षणोक्षणी साथ असतो…तोचं हा गुरु असतो!आई नऊ महिने गर्भात ठेवून,कळा सोशून जन्म देते!जन्मोजन्मी उपकार करते!आईचे विशाल ऋण सोबत घेऊन जगत असतो!असा पहिला गुरु ‘आई’ असतें!मला या जगात आणलं त्या मातेस!कोटी कोटी प्रणाम करतो!सदैव ऋणात राहतो!मातेस हृदयात ठेवतो!

guru purnima
Guru Purnima



प्रत्येक अनुभव क्षण गुरु असतात!खूप शिकवून जात असतात!ठेचकाळण्यापूर्वी उभे राहायला सांगतात!आपण त्यांचा बोट धरून जगाला ओळखू लागतो!ओळख देखील गुरूचं आहे!आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकजन उभा राहतो!नाम संस्काराने ‘नाव’ मिळतं असतं!नाव ठेवणाऱ्या त्या गोतावळ्यास काय म्हणावं बरं?

तेंचं सर्व गुरु आहेत!भूमिका भले वेगवेगळ्या असतील!प्रार्थनेचं फळ आपण असतो!सर्व आप्त, स्नेही, आत्या, काकू-काका, बाबा,आजी-आजोबांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असतात!पाठीवर असतात!आशीर्वाद जिथे मिळत असतात तें स्थान गुरूंचं असतं!गुरु आशिर्वादामुळे आपल्या सभोवती सुरक्षेची भक्कम तटबंधी उभी राहते!अशा सर्व वंदनीय गुरूंना वंदन करतो!

आई कोमल हृदय ओतून!ममता ओतून!कधी काळीज देऊन!कनवाळू संस्कार शिकवित असतें!नाजूक संस्कार शिकवितं असतें!डोळ्यात प्रकाश ओतते!माया करणे शिकवीत असतें!हळवेपण तीं शिकवीत असतें!बोट धरून चालायला शिकवित असतें!

हळूहळू मुलाचं बोट वडलांच्या हाती जातं असतं!घराच्या बाहेर लांबवर दुडूदुडू पावलं पडू लागतात!आई चालता चालता मुलाला खाली पडू देत नाही!पडला तर छातीत धस्स होतं!बाप चालता चालता पडू देत असतो!नंतर उचलत बाप उचलत असतो!पडल्यावर चालणं शिकवत असतो!बाहेर ढाल होणं शिकवीत असतो!ठेचकाळणंही शिकवित असतो!बाप ताठ उभं राहणं शिकवित असतो!

गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा



‘आरे’ म्हटल्यावर ‘कारे’ बोलायला बाप शिकवित असतो!अवघड प्रसंगास तोंड द्यायला बाप शिकवित असतो!भीतीला पिटाळून लावणं संस्कार बाप शिकवित असतो!मोठ्यांशी अदबीने वागायला बाप शिकवित असतो!धाडस अन आचार संस्कार बाप शिकवित असतो!

असा हा जन्मदाता बाप मुलांचा ‘गुरु’ असतो!बाप कडू गोळी असतो!गुणकारी न्यामी औषध असतं!बाप धर्यशील बननं शिकवीत असतो!दुःख सहन करीत वडाची सावली देत बाप उभा असतो!असा हा ‘बाप-वडील’ मुलांचा ‘दुसरा गुरु’ असतो!कणखर छातीवर,वार झेलण्या बाप शिकवीत असतो!दुःखी ओझं सहन करणे जन्मदाता शिकवीत असतो!अशा बापास मी शत शत नमन करतो!

जग खूप विशाल आहे!जगणं खूप अगाध आहे!जीवन विस्मयकारी आहे!खेळ सारा चमत्कारी आहे!सृष्टी पृथ्वी गूढ आहे!ज्ञान अति विशाल आहे!जगणं मात्र अधांतरी आहे!अधांतरी जगण्याला कोणी टेकू देणारा भेटत असतो!अगाध अज्ञानाची उकल करुनी देत असतो!अशा ज्ञानियास ‘गुरु’ म्हणत असतात!अनेक अज्ञानाची उकल गुरुजन करून देत असतात!जगणं आमुचं समृद्ध केलं कोणी त्यांना संत म्हणतात!कोणी त्यांना महंत म्हणतात!कोणी त्यांना साधू म्हणतात!कोणी त्यांना गुरुदत्त म्हणतात!

कोणी त्यांना ज्ञानदेव म्हणतात!कोणी त्यांना तुकोबा म्हणतात!कोणी ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात!कोणी रघुनाथ माशेलकर म्हणतात!कोणी ज्ञानसागर म्हणतात!कोणी त्यांना गुरुजी म्हणतात!कोणी त्यांना सर म्हणतात!कोणी टिचर, प्रोफेसर म्हणतात!… ज्ञान देऊन प्रकाश दाखवित गुरुजन हे कृतार्थ होतात!अशा या गुरुजनांचे पूजन आम्ही दररोज करीत असतो!हृदयी त्यांना बसवीत असतो!उपकार त्यांचे शतजन्मीचे हृदयी घेऊन हिंडत असतो!आज गुरु पौर्णिमेंनिमित्त साऱ्या गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम करतो!

नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-२१ जुलै २०२४
            (गुरुपौर्णिमा)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *